IND vs PAK WC 2023: “आम्ही चांगलं खेळलो, पण आमच्या बॉलर्सनी…”, पराभवानंतर कर्णधार बिस्माह मारुफनं झापलं

आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारतानं पाकिस्तानला तारे दाखवले. एक षटक आणि 7 गडी राखून भारताने विजय मिळवला. आता उपांत्य फेरीसाठी भारताला तीन सामने जिंकायचे आहेत.

IND vs PAK WC 2023: आम्ही चांगलं खेळलो, पण आमच्या बॉलर्सनी..., पराभवानंतर कर्णधार बिस्माह मारुफनं झापलं
IND vs PAK WC 2023: पराभवानंतर पाकिस्तान कर्णधार बिस्माह मारुफनं सरळ खापर फोडलं, म्हणाली Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 12, 2023 | 10:19 PM

मुंबई: आयसीसी टी 20 महिला विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अतितटीचा ठरला. पहिल्या सामन्यात भारताने 7 गडी आणि 6 चेंडू राखून पराभव केला. या विजयानंतर भारताची उपांत्य फेरीकडे सकारात्मक वाटचाल सुरु झाली आहे. आता भारताने उर्वरित तीन सामने जिंकल्यास थेट उपांत्य फेरीत धडक असणार आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्ताने 4 गडी गमवून टीम इंडियाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान 3 गडी गमवून 19 षटकात पूर्ण केलं. भारताकडून जेमिमा रॉड्रिक्सनं अर्धशतकी खेळी केली.”पाकिस्तानने चांगली फलंदाजी केली पण दिवसाच्या शेवटी आम्हाला खेळ जिंकायचा होता. जेमिमा आणि रिचा यांनी खरोखरच चांगली फलंदाजी केली. सर्व खेळाडू संघासाठी चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. ज्याला संधी मिळत आहे,त्यात तो सिद्ध करून दाखवत आहे.प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो.साहजिकच पाकिस्तानविरोधात विजय मिळवणं मोठं वाटतं. मैदानात गर्दी चांगली होती. आता पुढच्या सामन्यापूर्वी आम्हाला सरावासाठी आणखी वेळ द्यावा लागेल.आम्हाला काही गोष्टींवर काम करायचे आहे.”, असं भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीनं सांगितलं.

दुसरीकडे, पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधारानं सर्व खापर गोलंदाजांवर फोडलं आहे. “आम्ही अनेक वेळा चांगले होतो,पण बॉलिंग युनिट म्हणून आम्ही काही चुका केल्या.खूप काही शिकलो,पुढचा खेळ अधिक चांगला होण्यासाठी नियोजन करू.फलंदाजीत आम्ही मुलींना दिलेल्या भूमिका,त्यांनी उत्तम निभावल्या.” असं पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारुफनं सांगितलं.

भारताचा डाव

यास्तिका भाटिया आणि शफाली वर्मानं भारताला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 38 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यास्तिका सादिया इक्बालच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 4 चौकारांच्या जोरावर 17 चेंडूत 17 धावा केल्या. त्यानंतर शेफाली वर्मानं आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला.तिनचे 4 चौकाराच्या जोरावर 25 चेंडूत 33 केल्या. मात्र एका चुकीच्या फटक्यामुळे नाश्रा सांधूच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत कौर संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण 12 चेंडूत 16 धावा करून बाद झाली. त्यानंतर जेमिमा आणि रिचा घोषनं संघाला विजयाकडे नेलं. जेमिमानं 38 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या. तर रिचानं 20 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या.

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.

पाकिस्तानः बिस्माह मारूफ (कर्णधार), आलिया रियाझ, आयमान अन्वर, आयशा नसीम, ​​फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, सदफ शम्स, नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.