IPL 2020: विजेत्या संघाला ‘इतकी’ रक्कम मिळणार, पॅट कमिंस आणि मॅक्सवेल अधिक मालामाल

मुंबई इंडियन्सने गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धा जिंकली होती. तेव्हा त्यांना 20 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली होती.

IPL 2020: विजेत्या संघाला 'इतकी' रक्कम मिळणार, पॅट कमिंस आणि मॅक्सवेल अधिक मालामाल
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 7:22 PM

दुबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2020) 13 व्या मोसमातील अंतिम सामना (IPL Final) आज दुबईत होणार आहे. आतापर्यंत चारवेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघ यंदा पुन्हा एकदा फायनलमध्ये दाखल झाला आहे. मुंबईसमोर दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आव्हान उभं करणार आहे. दिल्लीचा संघ आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये दाखल झाला आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी होऊन चषक उंचावणार याची जगभरातील क्रिकेट रसिकांना उत्सुकता आहे. दरम्यान यंदा आयपीएल विजेत्या संघाला किती मोठं बक्षीस (Champions prize money) मिळणार असा प्रश्नदेखील सर्वांना पडला आहे.

IPL 2019 मध्ये विजेत्या संघाला 20 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्स संघाने विजेतेपद पटकावलं होतं. यंदा आयपीएलच्या बक्षीसाच्या रकमेत 50 टक्के कपात करण्यात आल्याने विजेत्या संघाला 10 कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे. विजेत्या संघाला केवळ 10 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाणार आहे.

गेल्या वर्षी उपविजेत्या संघाला 12.5 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले होते, तर यंदा उपविजेत्या संघाला 6.25 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांना (सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर) 4.375 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. यंदाच्या आयपीएलमधील बक्षीसाची रक्कम फार मोठी वाटत नाही, कारण या स्पर्धेत खेळणारे अनेक खेळाडू 10 ते 15 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले जातात व रिटेन केले जातात.

विजेत्या संघापेक्षा कमिंस, मॅक्सवेल आणि मॉरिसची कमाई अधिक

2019 मध्ये लिलाव झालेल्या सर्वात महाग खेळाडूंना मिळणारे पैसेदेखील आयपीएल विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीसाच्या रक्कमेक्षा अधिक आहेत. आयपीएल इतिहासात सर्वात महागडला ठरलेला खेळाडू पॅट कमिंसला गेल्या वर्षी झालेल्या लिलावात 15.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. याचाच अर्थ एका खेळाडूला मिळणारी रक्कम स्पर्धा जिंकल्याबद्दल संपूर्ण संघाला मिळणाऱ्या रक्कमेपेक्षा अधिक आहे. पॅट कमिंसप्रमाणे आणखी दोन खेळाडूंना आयपीएलमधील फ्रेंचायजींनी 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम देऊन खरेदी केले होते. किंग्स इलेव्हन पंजाबने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला 10.75 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाने ख्रिस मॉरिसला 10.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज (ऑरेंज कॅप), सर्वाधिक विकेट मिळवणारा गोलंदाज (पर्पल कॅप), प्रभावशाली युवा खेळाडू (इमर्जिंग प्लेअर), प्लेअर ऑफ द टुर्नामेंट (मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर) असे पुरस्कार दिले जातात. परंतु त्यांना मिळणाऱ्या बक्षीसांची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या

IPL FINAL 2020, MI vs DC : अंतिम सामन्याआधी सचिन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्सला महत्वाचा सल्ला

IPL 2020 Final MI vs DC : हिटमॅन रोहित शर्माची आयपीएल फायनल सामन्यांमधील कामगिरी

IPL 2020 Final MI vs DC : मुंबई-दिल्ली अंतिम सामन्याविषयी 6 रंजक गोष्टी

(IPL 20 Final : Champions prize money is less than salary of Pat Cummins morris and maxwell)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.