IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या आयोजनासाठी बीसीसीआयकडून यूएई बोर्डाला ‘इतके’ कोटी

कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं.

IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या आयोजनासाठी बीसीसीआयकडून यूएई बोर्डाला 'इतके' कोटी
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 8:26 PM

यूएई : आयपीएलचा 13 वा मोसम (IPL 2020) नुकताच पार पडला. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 5 विकेट्सने पराभव केला. यासह मुंबईने पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. भारतातील कोरोना परिस्थितीमुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं. कोरोनामुळे 13 व्या मोसमाला 5 महिने उशिराने सुरुवात झाली. दरम्यान बीसीसाआयने (BCCI) आयपीएलच्या आयोजनासाठी यूएई क्रिकेट बोर्डाला तब्बल 100 कोटी रुपये मोजले आहे. बंगळुरु मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. ipl 2020 bcci has given 100 crore to the uae board for organizing the 13th season of ipl

आयपीएलच्या 13 व्या मोसमाची सुरुवात 29 मार्चपासून अपेक्षित होती. यासाठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केलं होतं. मात्र कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. मात्र यानंतर बीसीसाआयने या मोसमाचं यूएईमध्ये आयोजन करण्याच ठरवलं. आयपीएलमध्ये हजारो कोटी रुपयांची उलाढाळ होते. अनेक खेळाडू मालामाल होतात.जर यावेळेस आयपीएलचं आयोजन रद्द झालं असतं तर बीसीसीआयला तब्बल 4 हजार कोटी रुपयांच नुकसान झालं असतं. त्यामुळे हा नुकसान टाळण्यासाठी आयपीएलचं आयोजन करणं भाग होतं. त्यामुळे बीसीसीआयने या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये केलं. बंगळुरु मिररच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या आयोजनासाठी 100 कोटी रुपये दिले.

लवकरच 14 वा मोसम

आयपीएलच्या आगामी मोसमाची सुरुवात नियमितप्रमाणे मार्च महिन्यापासून होईल, असा आशावाद काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केला. मार्चपर्यंत कोरोनावर लस सापडेल अशी आशा करुयात. असं झालं तर नक्कीच आयपीएलला नेहमीप्रमाणे सुरुवात होईल. अन्यथा यूएईचा पर्याय आहेच, असं गांगुली म्हणाला होता.

14 व्या मोसमात संघ वाढणार?

बीसीसीआय आयपीएलच्या 14 व्या मोसमात संघ वाढवण्यासाठी उत्सुक आहे. बीसीसीआय संघवाढीसाठी हालचाल करतेय, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात आहे. मात्र या संघवाढील काही फ्रँचायझीचा विरोध आहे. संघ वाढल्यास फ्रँचायझीला आपल्या ताफ्यातील खेळाडू सोडावे लागतील, या भितीमुळे फ्रँचायझीचा या निर्णयाला विरोध आहे. तसेच आगामी मोसमात 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी मिळणार असल्याची चर्चादेखील आहे.

दरम्यान टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2021 | आयपीएलच्या नव्या मोसमात नवी टीम दिसण्याची शक्यता, बीसीसीआयची जोरदार तयारी

IPL मध्ये मोठे बदल, दोन नवे संघ सहभागी होणार, एका संघात 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडू खेळणार?

ipl 2020 bcci has given 100 crore to the uae board for organizing the 13th season of ipl

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.