IPL 2020 : कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतरही विक्रम, विकेटकीपर म्हणून सर्वाधिक झेलचा विक्रम धोनीच्या नावे

एक विकेटकीपर म्हणून धोनीच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली आहे. (MS Dhoni take most catches as a wicketkeeper in IPL)

IPL 2020 : कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतरही विक्रम, विकेटकीपर म्हणून सर्वाधिक झेलचा विक्रम धोनीच्या नावे
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 5:17 PM

अबुधाबी : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) 7 ऑक्टोबरला 10 धावांनी पराभव केला. चेन्नईच्या पराभवाला केदार जाधवला (Kedar Jadhav) कारणीभूत ठरवले जात आहे. महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) कोलकाता विरुद्ध बॅटिंगने विशेष काही करता आले नाही. एकाबाजूला चेन्नईला विजयाचा सूर गवसत नाहीये. मात्र दुसऱ्या बाजूला कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने कोलकाता विरुद्ध एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएल स्पर्धेत एक विकेटकीपर म्हणून धोनीच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली आहे. (Dhoni take most catches as a wicketkeeper in IPL)

विक्रम काय आहे ?

महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा विकेटकीपर ठरला आहे. आयपीएल (IPL) स्पर्धेत धोनीने आतापर्यंत 104 झेल घेतल्या आहेत. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात धोनीने सर्वाधिक कॅचबाबतीत दिनेश कार्तिकला मागे टाकलं आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) कोलकाताचा कर्णधार आहे. कार्तिकने आयपीएलमध्ये विकेटकीपर म्हणून 103 खेळाडूंना झेलबाद केलं आहे.

याआधी धोनीने स्टंपमागे विकेटकीपर म्हणून 100 झेल घेण्याचा विक्रम केला होता. धोनीने किंग्जस इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली होती. धोनी आणि कार्तिक या दोघांनीच आतापर्यंत विकेटकीपर म्हणून आयपीएलमध्ये 100 झेल घेतल्या आहेत.

धोनीची निराशाजनक खेळी

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात धोनीने पुन्हा निराशा केली. धोनी जेव्हा मैदानात आला तेव्हा चेन्नईला विजयासाठी 47 चेंडूत 69 धावांची आवश्यकता होती. धोनी चेन्नईला विजय मिळवून देणार, असा विश्वास चेन्नई समर्थकांना होता. मात्र धोनी अपयशी ठरला. धोनीने अवघ्या 12 चेंडूत 11 धावाच केल्या. धोनीने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 6 सामन्यात फक्त 102 धावाच केल्या आहेत. धोनीकडून त्याच्या चाहत्यांना एका मॅचविनिंग खेळीची अपेक्षा आहे.

केदार जाधव ट्रोल

चेन्नईचा फलंदाज केदार जाधवने कोलकाता विरुद्ध अतिशय संथ खेळी केली. चेन्नईच्या पराभवासाठी केदारला कारणीभूत ठरवलं जात आहे. केदारने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात केवळ 12 चेंडूत 7 धावाच केल्या. त्यामुळे चेन्नई समर्थक संतापले आहेत. चेन्नई संघातून केदारची हकालपट्टी करा, अन्यथा आम्ही चेन्नईचे सामने पाहणार नाही. अशी तंबीच नेटीझन्सने चेन्नईला दिली आहे. तसेच केदारच्या संथ खेळीवरुन त्याला सोशल मीडियावर ट्रोलही केलं जात आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, CSK vs KKR : गोलीकीपर प्रमाणं झेपावत धोनीनं घेतला कॅच, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

IPL 2020 : धोनीने ठोकलं शतक, ‘असा’ विक्रम करणारा दुसरा खेळाडू

Kedar Jadhav : चेन्नईच्या निराशाजनक कामगिरीनंतर समर्थकांची तंबी, केदार जाधवला संघाबाहेर काढा अन्यथा……

(MS Dhoni take most catches as a wicketkeeper in IPL)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.