IPL 2020 | चेन्नई सुपर किंग्जसचे आव्हान संपुष्टात, साक्षी धोनीची भावूक पोस्ट

चेन्नईची यंदाच्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली.

IPL 2020 | चेन्नई सुपर किंग्जसचे आव्हान संपुष्टात, साक्षी धोनीची भावूक पोस्ट
धोनीला क्रिकेटसोबतच व्यवसायात देखील रस आहे. धोनीने एंटरटेनमेंट व्यवसायात याआधीच पाऊल टाकल आहे. 'एमएसडी एंटरटेनमेंट' असं धोनीच्या प्रोडक्शन कंपनीच नाव आहे. ज्याची हेड त्याची पत्नी साक्षी आहे.
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 5:36 PM

यूएई : आयपीएलच्या 13 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जसची (Chennai Super Kings) निराशाजनक कामगिरी राहिली. रविवारी 25 ऑक्टोबरला राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मुंबईच्या या पराभवामुळे चेन्नईच्या प्ले ऑफमध्ये पोहचण्याच्या जर तर च्या आशाही संपल्या. त्यामुळे चेन्नई औपचारिकरित्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. चेन्नई आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये पोहचली नाही. या पार्श्वभूमीवर धोनीची पत्नी साक्षीने (Sakshi Dhoni) एक भावूक पोस्ट लिहिली आहे. साक्षीने एक ट्विट केलं आहे. IPL 2020 Chennai Super Kings Out Of Tournament Sakshi Dhoni Emotional Post

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

“क्रिकेट हा एक खेळ आहे. यामध्ये कोणालाच पराभूत व्हायचं नसतं. सर्वांनाच जिंकायचं असतं. तु तेव्हाही विजेता होता, आजही विजेता आहे. योद्धांचा जन्म हा लढण्यासाठीच होतो. चेन्नई माझ्यासाठी नेहमीच सुपरकिंग्जसच असेल”, असं साक्षीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

चेन्नईने रविवारी (25 ऑक्टोबर) डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात बंगळुरुचा 8 विकेट्सने पराभव केला. यासह चेन्नईने आपला चौथा विजय साजरा केला. चेन्नई पॉइंट्सटेबलमध्ये 8 गुणांसह शेवटच्या क्रमांकावर आहे. राजस्थानने मुंबईला पराभूत केल्याने चेन्नई औपचारिकरित्या यंदाच्या मोसामातून बाहेर पडली आहे.

यंदाचा मोसम चेन्नईसाठी निराशाजनक

चेन्नईसाठी आयपीएलचा यंदाचा मोसम निराशाजनक राहिला. चेन्नईचा स्टार खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंह या दोघांनी या मोसमातून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली. चेन्नईने या मोसमाची सुरुवात विजयाने केली. मात्र त्यानंतर चेन्नईला फार संघर्ष करावा लागला. धोनीला आतापर्यंत या मोसमातील 12 सामन्यात एकदाही अर्धशतक लगावता आलं नाही. तसेच फॅफ डु प्लेसिसचा अपवाद वगळता इतर कोणत्याही खेळाडूला सातत्याने चांगली कामगिरी करता आली नाही.

धोनी आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून चेन्नईचे नेतृत्व करतोय. चेन्नईने 10 वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर धोनीने चेन्नईला 3 वेळा आयपीएलचं विजेतपद पटकावून दिलं आहे. दरम्यान चेन्नई आता या हंगामातील उर्वरित 2 सामने कोलकाता आणि पंजाबविरुद्ध खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | पाचव्या क्रमांकाआधी बॅटिंगसाठी ये, टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूचा धोनीला सल्ला

IPL 2020 Chennai Super Kings Out Of Tournament Sakshi Dhoni Emotional Post

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.