IPL 2020, DC vs MI : इशान किशनची शानदार खेळी, मुंबईचा दिल्लीवर 9 विकेट्सने दणदणीत विजय

दिल्लीचा हा सलग चौथा पराभव ठरला आहे.

IPL 2020, DC vs MI : इशान किशनची शानदार खेळी, मुंबईचा दिल्लीवर 9 विकेट्सने दणदणीत विजय
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 6:48 PM

दुबई : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 111 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे विजयी आव्हान 1 विकेट गमावून 34 चेंडूआधी पूर्ण केलं. इशान किशन मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. इशानने 47 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नॉर्टजेने एकमेव विकेट घेतली.

विजयी आव्हानाचं पाठलाग करणाऱ्या मुंबईची चांगली सुरुवात झाली. इशान किशन आणि क्विंटन डी कॉक या जोडीने 68 धावांची सलामी दिली. यानंतर क्विंटन 26 धावांवर बाद झाला. यानंतर सूर्यकुमार मैदानात आला. सूर्यकुमारने इशानला चांगली साथ दिली. या दरम्यान इशानने आपले अर्धशतक पूर्ण केलं. इशान-सूर्यकुमार या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 43 धावांची नाबाद भागीदारी केली. इशानने 47 चेंडूत 8 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 72 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव 12 धावांवर नाबाद राहिला.

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडले. मुंबईच्या आक्रमक गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 110 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 25 धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने 21 धावा केल्या. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर नॅथन कुल्टर नाईल आणि राहुल चहरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दिल्लीच्या अडचणीत वाढ

मुंबईने पराभूत केल्याने दिल्लीचा हा सलग 4 था पराभव ठरला. त्यामुळे दिल्लीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीसाठी उर्वरित सामना ‘करो या मरो’चा असणार आहे. दिल्लीला प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी या मोसमातील शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. दिल्ली हा शेवटचा सामना 2 नोव्हेंबरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध खेळणार आहे.IPL 2020 DC vs MI Live Score Update Today Cricket Match Delhi Capitals vs Mumbai Indians लाईव्ह स्कोअर 

[svt-event title=”मुंबईचा दिल्लीवर शानदार विजय” date=”31/10/2020,6:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”इशान किशनचे दणदणीत अर्धशतक” date=”31/10/2020,6:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचा 11 ओव्हरनंतर स्कोअर” date=”31/10/2020,6:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला पहिला झटका” date=”31/10/2020,6:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची शानदार सुरुवात” date=”31/10/2020,6:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”8 ओव्हरनंतर मुंबई” date=”31/10/2020,5:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोअर” date=”31/10/2020,5:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”4 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोअर” date=”31/10/2020,5:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”31/10/2020,5:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 111 धावांचे आव्हान” date=”31/10/2020,5:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला आठवा झटका” date=”31/10/2020,4:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला सातवा झटका” date=”31/10/2020,4:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला सहावा झटका” date=”31/10/2020,4:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला पाचवा झटका” date=”31/10/2020,4:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला चौथा धक्का” date=”31/10/2020,4:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला तिसरा धक्का” date=”31/10/2020,4:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचा 10 ओव्हरनंतर स्कोअर” date=”31/10/2020,4:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर दिल्ली” date=”31/10/2020,3:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचा 5 ओव्हरनंतर स्कोअर” date=”31/10/2020,3:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला दुसरा धक्का” date=”31/10/2020,3:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 2 ओव्हरनंतर” date=”31/10/2020,3:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 1 ओव्हरनंतर” date=”31/10/2020,3:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला पहिला झटका” date=”31/10/2020,3:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात” date=”31/10/2020,3:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असे आहेत दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”31/10/2020,3:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई प्लेइंग इलेव्हन” date=”31/10/2020,3:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचे अंतिम 11 खेळाडू” date=”31/10/2020,3:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईने टॉस जिंकला” date=”31/10/2020,3:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

मुंबई 16 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीला प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे दिल्लीसाठी मुंबईविरुद्धचा सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.

हेड टु हेड

दिल्ली आणि मुंबई आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 25 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 25 पैकी 12 सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला आहे. तर मुंबईने 13 सामन्यात दिल्लीवर विजय मिळवला आहे.

मुंबई इंडियन्स : कायरन पोलार्ड (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, खगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत, ईशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नोर्तजे, अॅलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव.

संबंधित बातम्या :

IPL 2020, MI vs DC : सूर्यकुमार यादव-क्विंटन डी कॉकची अर्धशतकी खेळी, मुंबईची दिल्लीवर 5 विकेट्सने मात

IPL 2020 DC vs MI Live Score Update Today Cricket Match Delhi Capitals vs Mumbai Indians

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.