IPL 2020, DC vs MI : सातत्याने निराशाजनक कामगिरी करणारा पृथ्वी शॉ सोशल मीडियावर ट्रोल, मीम्स व्हायरल

या सामन्यात मुंबईने दिल्लीवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

IPL 2020, DC vs MI : सातत्याने निराशाजनक कामगिरी करणारा पृथ्वी शॉ सोशल मीडियावर ट्रोल, मीम्स व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 12:26 AM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 51 वा सामना दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात मुंबईने दिल्लीवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. मुंबईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा सलामीवर पृथ्वी शॉ  पुन्हा अपयशी ठरला. पृथ्वी शॉ मागील काही सामन्यांपासून निराशाजनक कामगिरी करतोय. यामुळे त्याला चांगलेच ट्रोल केलं आहे. पृथ्वीला मीम्सद्वारे ट्रोल केलं जात आहे. तसेच पृथ्वी ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आला आहे. ipl 2020 dc vs mi prithvi shaw consistently disappointing performance trolls on social media memes go viral

सुरुवातीच्या काही सामन्यात पृथ्वी चांगली खेळी करत होता. मात्र त्यानंतर पृथ्वीला संघर्ष करावा लागला. वारंवार संधी दिल्यानंतरही पृथ्वीला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पृथ्वीला काही सामन्यातून डच्चू देण्यात आला. मात्र त्यानंतरही आजच्या सामन्यात पृथ्वीने निराशाजनक कामगिरी केली.

पृथ्वीने आयपीएलच्या 13 व्या मोसमात एकूण 11 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 137.73 च्या स्ट्राईक रेटने आणि 19.90 च्या सरासरीने 219 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

दिल्ली अडचणीत

मोसमाच्या सुरुवातीला चांगल्या कामगिरीनंतर दिल्लीचा सलग 4 सामन्यात पराभव झाला. दिल्ली या मोसमातील साखळी फेरीतील शेवटचा सामना 2 नोव्हेंबरला खेळणार आहे. दिल्लीची या सामन्यात ‘करो या मरो’ ची परिस्थिती असणार आहे. तसेच दिल्लीवर प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचाही धोका आहे. ताज्या आकडेवारीनुसार दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, DC vs MI : इशान किशनची शानदार खेळी, मुंबईचा दिल्लीवर 9 विकेट्सने दणदणीत विजय

ipl 2020 dc vs mi prithvi shaw consistently disappointing performance trolls on social media memes go viral

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.