IPL 2020, DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सची राजस्थान रॉयल्सवर 13 धावांनी मात

या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

IPL 2020, DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सची राजस्थान रॉयल्सवर 13 धावांनी मात
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 11:44 PM

दुबई : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 13 धावांनी पराभव केला आहे. दिल्लीने राजस्थानला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. पण राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 148 धावाच करता आल्या. राजस्थानकडून सलामीवीर बेन स्टोक्सने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर रॉबिन उथप्पाने 32 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नोर्तजे आणि पदार्पण केलेल्या तुषार देशपांडेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. (Delhi Capitals Beat Rajasthan Royals By 13 Runs)

विजयी आव्हानाची सुरुवात करायला आलेल्या राजस्थानची सावध सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी बेन स्टोक्स आणि जॉस बटलरने 37 धावा केल्या. राजस्थानची पहिली विकेट 37 धावांवर गेली. जॉस बटलरने 22 धावा केल्या. यानंतर लगेचच कर्णधार स्टीव्ह स्मिथ 1 धावांवर बाद झाला. यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने राजस्थानचा डाव सावरला. मात्र या जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही. पदार्पण केलेल्या तुषार देशपांडेने बेन स्टोक्सला 41 धावांवर बाद केले.

यानंतर ठराविक अंतराने राजस्थानने विकेट्स गमावल्या. संजू सॅमसनला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. संजू 25 धावांवर बाद झाला. युवा रियान पराग रॉबिन उथप्पाच्या चुकीमुळे रनआऊट झाला. रियाननंतर रॉबिन उथप्पा 32 धावांवर माघारी परतला. राहुल तेवतिया अखेरपर्यंत नाबाद राहिला. मात्र त्याला राजस्थानला विजय मिळवून देण्यास यश आले नाही. दिल्लीकडून तुषार देशपांडे आणि एनरिच नोर्तजेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर खगिसो रबाडा, रवीचंद्रंन आश्विन आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेत तुषार आणि एनरिचला चांगली साथ दिली.

त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ‘गब्बर’ शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक 57 धावा केल्या. तसेच श्रेयस अय्यरनेही 53 धावांची खेळी केली.

दिल्लीने झटपट 2 विकेट गमावल्यानंतर धवन-अय्यर या जोडीने दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. शिखर आणि अय्यर आऊट झाल्यानंतर मार्क्स स्टोयनिस आणि अॅलेक्स कॅरी या दोघांनी प्रत्येकी 18 आणि 14 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जयदेव उनाडकटने 2 बळी घेतले. तर कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

[svt-event title=”दिल्लीचा ‘शिखर’ विजय ” date=”14/10/2020,11:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 6 चेंडूत 22 धावांची आवश्यकता” date=”14/10/2020,11:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला सातवा धक्का” date=”14/10/2020,11:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रॉबिन उथप्पा आऊट” date=”14/10/2020,10:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 28 धावांची आवश्यकता” date=”14/10/2020,10:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला पाचवा धक्का” date=”14/10/2020,10:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संजू सॅमसन आऊट ” date=”14/10/2020,10:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 9 ओव्हरमध्ये 67 धावांची आवश्यकता” date=”14/10/2020,10:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”तुषार देशपांडेची पहिली विकेट” date=”14/10/2020,10:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 7 ओव्हरनंतर” date=”14/10/2020,10:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेमध्ये राजस्थानच्या 50 धावा पूर्ण” date=”14/10/2020,9:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 5 ओव्हरनंतर” date=”14/10/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला दुसरा धक्का” date=”14/10/2020,9:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बटलर आऊट” date=”14/10/2020,9:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 1 ओव्हरनंतर” date=”14/10/2020,9:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानच्या बॅटिंगला सुुरुवात ” date=”14/10/2020,9:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 162 धावांचे आव्हान” date=”14/10/2020,9:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”श्रेयस अय्यर आऊट, दिल्लीला चौथा धक्का” date=”14/10/2020,8:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या एक हजार धावा पूर्ण” date=”14/10/2020,8:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कर्णधार श्रेयस अय्यरचे अर्धशतक ” date=”14/10/2020,8:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गब्बर आऊट” date=”14/10/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘गब्बर’ अर्धशतक ” date=”14/10/2020,8:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानचा 10 ओव्हरनंतर स्कोअर” date=”14/10/2020,8:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”धवन-अय्यरची अर्धशतकी भागीदारी” date=”14/10/2020,8:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 8 ओव्हरनंतर” date=”14/10/2020,8:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर दिल्ली” date=”14/10/2020,8:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला दुसरा झटका ” date=”14/10/2020,7:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 2 ओव्हरनंतर” date=”14/10/2020,7:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला पहिला झटका” date=”14/10/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”14/10/2020,7:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचे 11 शिलेदार” date=”14/10/2020,7:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान प्लेइंग इलेव्हन ” date=”14/10/2020,7:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीने टॉस जिंकला” date=”14/10/2020,7:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

दिल्लीने याआधीच्या सामन्यात राजस्थानचा 46 धावांनी पराभव केला होता. तसेच राजस्थानच्या संघात अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे आगमन झाले आहे. त्यामुळे राजस्थानची बाजू मजबूत झाली आहे. “स्टोक्सच्या कमबॅकमुळे राजस्थानला मजबूती मिळाली आहे”, अशी प्रतिक्रिया कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिली.

दोन्ही संघ तुल्यबळ

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत दिल्ली आणि राजस्थान एकूण 21 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यापैकी 11 सामन्यात राजस्थानने दिल्लीचा पराभव केला आहे. तर दिल्लीनेही 10 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये दिल्ली 10 पॉइंट्सह 2 ऱ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान 7 व्या क्रमांकावर आहे.

राजस्थान रॉयल्स : जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय, महिपाल लोमरुर, ओसाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण अॅरॉन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, खगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डेनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नोर्तजे, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RR VS DC : दिल्लीचा सलग तिसरा विजय, राजस्थानवर 46 धावांनी मात

ipl 2020 dc vs rr live score update today cricket match delhi capitals vs rajasthan royals

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.