Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : केन विल्यमसनची नाबाद अर्धशतकी खेळी, हैदराबादची बंगळुरुवर 6 विकेट्सने मात, क्वालिफाय 2 सामन्यात दिल्लीविरुद्ध भिडणार

जेसन होल्डर आणि केन विल्यमसनने 65 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली.

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : केन विल्यमसनची नाबाद अर्धशतकी खेळी, हैदराबादची बंगळुरुवर 6 विकेट्सने मात, क्वालिफाय 2 सामन्यात दिल्लीविरुद्ध भिडणार
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 11:45 PM

अबुधाबी : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात (Eliminator 2020) सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Bangalore) 6 विकेट्सने मात केली आहे. हैदराबादने या विजयासह क्वालिफायर 2 सामन्यात धडक मारली आहे. तर बंगळुरुचे आव्हान संपुष्टात आले आहे. बंगळुरुने हैदराबादला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादने हे विजयी आव्हान 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. केन विल्यमसन आणि जेसन होल्डर हे दोघे हैदराबादच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 65 धावांची विजयी भागीदारी केली. केन विल्यमसनने नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर जेसन होल्डरने 24 धावांची महत्वाची खेळी केली. बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अॅडम झॅम्पा आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट मिळवला. ipl 2020 Eliminator srh vs rcb live score update today cricket match sunrisers hyderabad vs royal challengers bangalore  स्कोअर

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची निराशाजनक सुरुवात झाली. हैदराबादला 2 धावांवर पहिला धक्का लागला. सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी शून्यावर बाद झाला. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने दुसऱ्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. यानंतर वॉर्नरच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का लागला. वॉर्नर 17 धावांवर बाद झाला. वॉर्नरनंतर काही षटकानंतर मनिष पांडेही 24 धावांवर बाद झाला. पांडेनंतर प्रियम गर्गला युजवेंद्र चहलने अॅडम झॅम्पाच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे हैदराबादची 11.5 ओव्हरमध्ये 67-4 अशी स्थिती झाली.

होल्डर-विल्यमसनची नाबाद विजयी भागीदारी

हैदराबाद अडचणीत असताना जेसन होल्डर आणि केन विल्यमसनने 65 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान केन विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केलं. केनने 44 चेंडूत 2सिक्स आणि 2 फोरसह नाबाद 50 धावा केल्या. तर होल्डरने 20 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावांची नाबाद खेळी केली.

बंगळुरुचा डाव

त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडले. बंगळुरुने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 131 धावा केल्या. बंगळुरुकडून ‘मिस्टर 360’ एबी डी व्हीलियर्सने सर्वाधिक 56 धावा केल्या. तर अॅरॉन फिंचने 32 धावा केल्या. मोहम्मद सिराजने नाबाद 10 धावा केल्या. मोईन अली फ्री हिटवर दुर्देवीरित्या रन आऊट झाला. मोईन डायमंड डक बाद झाला. डायमंड डक म्हणजे एकही चेंडू न खेळता बाद होणं.

फिंच, एबी आणि मोहम्मद या तिघांचा अपवाद वगळता बंगळुरुच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. सलामीला आलेला विराट कोहली 6 धावावंर बाद झाला. देवदत्त पडीक्कलने 1 धाव केली. शिवम दुबेला जेसन होल्डरने 8 धावांवर बाद केलं. वॉशिंग्टन सुंदरला थंगारसु नटराजनने अब्दुल समदच्या हाती कॅच आऊट केलं. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर थंगारसु नटराजनने 2 विकेट्स घेत होल्डरला चांगली साथ दिली. शहबाद नदीमने 1 विकेट मिळवला. फिरकीपटू रशीद खानला विकेट घेण्यास यश आले नाही. मात्र त्याने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देत बंगळुरुच्या फलंदाजीवर नियंत्रण ठेवलं.

क्वालिफायर 2 मध्ये हैदराबाद विरुद्ध दिल्ली

हैदराबादने बंगळुरुचा पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. त्यामुळे हैदराबाद दिल्लीविरुद्ध 8 नोव्हेंबरला क्वालिफायर 2 सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत.

[svt-event title=”हैदराबादचा बंगळुरुवर शानदार विजय” date=”06/11/2020,11:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केन विलियमन्सनचे अर्धशतक” date=”06/11/2020,11:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता, सामना रंगतदार स्थितीत” date=”06/11/2020,11:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 2 ओव्हरमध्ये 18 धावांची आवश्यकता” date=”06/11/2020,10:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 8 षटकात 64 धावांची आवश्यकता” date=”06/11/2020,10:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला चौथा धक्का” date=”06/11/2020,10:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला तिसरा धक्का” date=”06/11/2020,10:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला दुसरा धक्का” date=”06/11/2020,9:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला पहिला धक्का” date=”06/11/2020,9:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात” date=”06/11/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 132 धावांचे आव्हान” date=”06/11/2020,9:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अर्धशतकी खेळीनंतर एबी माघारी” date=”06/11/2020,9:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला सहावा धक्का” date=”06/11/2020,9:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एबी डी व्हीलियर्सचे अर्धशतक” date=”06/11/2020,9:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची पाचवी विकेट” date=”06/11/2020,9:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”15 ओव्हरनंतर बंगळुरुचा स्कोअर” date=”06/11/2020,8:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”14 ओव्हरनंतर बंगळुरु” date=”06/11/2020,8:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला चौथा धक्का” date=”06/11/2020,8:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला तिसरा धक्का” date=”06/11/2020,8:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुचा पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर स्कोअर” date=”06/11/2020,8:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला दुसरा धक्का” date=”06/11/2020,7:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला पहिला धक्का” date=”06/11/2020,7:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात” date=”06/11/2020,7:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”06/11/2020,7:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असा आहे बंगळुरुचा संघ” date=”06/11/2020,7:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद प्लेइंग इलेव्हन” date=”06/11/2020,7:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादने टॉस जिंकला” date=”06/11/2020,7:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

साखळी फेरीतील कामगिरी

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील साखळी फेरीत दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने भिडले. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे. 22 सप्टेंबरला खेळण्यात आलेल्या सामन्यात बंगळुरुने बैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला होता. तर 31 ऑक्टोबरच्या सामन्यात हैदराबादने बंगळुरुचा 5 विकेट्सने पराभव केला होता.

हैदराबादचा सलग 3 सामन्यात विजय

हैदराबादने साखळी फेरीतील शेवटच्या 3 सामन्यात सलग विजय मिळवत प्ले ऑफमध्ये धडक मारली. हैदराबादने दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरु आणि मुंबईचा पराभव केला. तर दुसऱ्या बाजूला बंगळुरुने 4 सामन्यात सलग पराभव झाल्यानंतरही प्ले ऑफमध्ये 4 थ्या क्रमांक मिळवण्यात यशस्वी ठरली.

हैदराबादचा मुंबईवर 10 विकेट्सने विजय

मोसमातील शेवटचा साखळी फेरीतील सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध हैदराबाद (Sunrisers Hyederabad) यांच्यात खेळण्यात आला. हा सामना हैदराबादसाठी ‘करो या मरो’चा होता. या सामन्यात हैदराबादने मुंबईवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवत प्ले ऑफमध्ये तिसऱ्या क्रमांकावर धडक मारली.

दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’

हैदराबाद आणि बंगळुरु या दोघांसाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघांच आव्हान संपुष्टात येईल. तर विजयी संघ क्वालिफायर 2 (Qualifier 2) सामन्यात दिल्लीविरुद्ध भिडेल. हा क्वालिफायर 2 सामना 8 नोव्हेंबरला अबुधाबीत खेळण्यात येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डी व्हीलियर्स, पार्थिव पटेल, अॅरॉन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, इसुरु उडाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झॅम्पा.

सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन एलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी.

संबंधित बातम्या :

IPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या विजेतेपदासाठी सज्ज, फायनलमध्ये कुणाशी भिडणार?

IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?

IPL 2020, SRH vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी सुरुवात, सनरायजर्स हैदराबादवर 10 धावांनी मात

IPL 2020, RCB vs SRH: हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय

ipl 2020 Eliminator srh vs rcb live score update today cricket match sunrisers hyderabad vs royal challengers bangalore

शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप.
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात.
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.