IPL 2020 : फायनलच्या आधी मुंबईला दिलासा, ‘हा’ खेळाडू दुखापतीतून सावरला, नेट्समध्ये कसून सराव, दिल्लीविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज
या खेळाडूने मुंबईसाठी या मोसमात आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे.
दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात मंगळवारी (10 नोव्हेंबर) खेळण्यात येणार आहेत. या सामन्याआधी मुंबईसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. मुंबईचा स्टार गोलंदाज ट्रेन्ट (Trent Boult) दुखापतीतून सावरला आहे. ट्रेन्टला दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर 1 सामन्यादरम्यान ग्रोईन इंज्युरीचा त्रास झाला होता. ipl 2020 final mi vs dc mumbai relieved before final trent bolt recovers from injury
ट्रेन्ट बोल्ट नेट्समध्ये कसून सराव करताना दिसत आहे. त्याच्या या नेट्स प्रॅक्टीसचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर करण्यात आला आहे. ट्रेन्टच्या या व्हिडिओमुळे तो फायलन खेळण्यासाठी तयार झाला आहे, हे जवळपास निश्चित झालं आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेन्ट रोहित शर्मासह इतर फलंदाजांविरुद्ध बोलिंग करताना पाहायला मिळत आहे.
Prepping ? for our big day tomorrow ?#Believe??#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL pic.twitter.com/lVnqpxDsqp
— Mumbai Indians (@mipaltan) November 9, 2020
बोल्टला दिल्लीविरुद्धच्या क्वालिफाय 1 सामन्यात ग्रोईन इंज्युरीचा (Groin Injurey)त्रास झाला होता. बोल्टच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. 14 व्या ओव्हरमध्ये त्याला त्रास जाणवू लागला. यामुळे बोल्टला मैदानाबाहेर जावे लागले होते. दुखापतीमुळे बोल्टला आपल्या कोट्यातील सर्व ओव्हर टाकता आल्या नव्हत्या. बोल्टने या सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट्सह मेडन ओव्हर टाकली होती. बोल्टने या सामन्यात एकूण 2 ओव्हर टाकल्या होत्या. दरम्यान आता ट्रेन्ट दुखापतीतून सावरल्याने मुंबईच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.
बुमराह-बोल्टची कमाल
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ट्रेन्ट बोल्ट ही जोडी आयपीएलच्या 13 व्या मोसमात दमदार कामगिरी करत आहेत. या दोघांनी आतापर्यंत या मोसमात एकूण 49 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये बुमराहच्या नावावर 27 तर बोल्टच्या नावावर 22 विकेट्सची नोंद आहे. बोल्टने केलेल्या कामगिरीसाठी त्याला या मोसमात 2 वेळा सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
दरम्यान मुंबईची अंतिम सामन्यात पोहचण्याची सहावी तर दिल्लीची पहिलीच वेळ आहे. मुंबईने याआधी 4 वेळा विजेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे यावेळेसही दिल्लीवर मात करण्याचा मानस मुंबईचा असणार आहे. तर मुंबईला पराभूत करत ट्रॉफी उंचावण्याचा प्रयत्न दिल्लीच्या टीमचा असेल.
संबंधित बातम्या :
Photo | MI Vs DC आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईचं पारडं जड करणाऱ्या 5 गोष्टी
IPL FINAL 2020, MI vs DC : पर्पल कॅपसाठी कगिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराहमध्ये कडवी झुंज
ipl 2020 final mi vs dc mumbai relieved before final trent boult recovers from injury