Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 Final : स्टॉयनिसला पहिल्याच चेंडूवर बाद करत ट्रेन्ट बोल्टने रचला इतिहास

आयपीएलच्या अंतिम सामन्यात हिटमॅन रोहित शर्माच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर मुंबईने दिल्लीवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

IPL 2020 Final : स्टॉयनिसला पहिल्याच चेंडूवर बाद करत ट्रेन्ट बोल्टने रचला इतिहास
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 11:31 PM

दुबई : हिटमॅन रोहित शर्माच्या (Hitman Rohit Sharma) धमाकेदार खेळीच्या जोरावर आणि ईशान किशनच्या (Ishan Kishan) नाबाद 33 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएलंच विजेतेपद पटकावलं आहे. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 5 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. ईशान किशनने नाबाद 33 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि मार्कस स्टोयनिसने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (IPL 2020 Final : Trent Boult takes wicket on first ball first time in ipl history)

तत्पूर्वी आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईचा जलदगती गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने मुंबईच्या विजयाचा पाया रचला. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून मोठा स्कोर उभं करण्याचं उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय दिल्लीच्या चांगलाच अंगलट आला. मुंबईचा आक्रमक गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने सुरुवातीलाच दिल्लीला दोन मोठे धक्के दिले. त्यामुळे मुंबईची जोरदार सुरुवात झाली. बोल्टने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दिल्लीचा सलामीवीर मार्कस स्टॉयनिसला यष्टीरक्षक क्विंटन डिकॉककरवी झेलबाद करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. स्टॉयनिसला बाद करत बोल्ट आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

हैदराबादविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीने आपल्या फलंदाजीत बदल करत स्टॉयनिसला सलामीला संधी दिली होती. हैदराबादविरुद्ध सामन्यात स्टॉयनिस-शिखर धवन जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. परंतु दिल्लीची कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक रिकी पाँटिंगची ही रणनिती मुंबईसमोर चालली नाही. मुंबईचा जलदगती गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने स्टॉयनिसला पहिल्याच चेंडूवर बाद करत दिल्लीच्या किल्ल्याला मोठा हादरा दिला.

दरम्यान, बोल्टने इनिंगच्या तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. लेग स्टम्पवर टाकलेला बॉल अजिंक्य समजू शकला नाही. त्याचा देखील झेल डिकॉकने टिपला. सुरुवातीच्या दोन ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवून बोल्टने दिल्लीला बॅकफूटला ढकललं.

संबंधित बातम्या

18 वर्षांपूर्वी विमान अपघातात आईचा मृत्यू, सावत्र आईने क्रिकेटपटू म्हणून घडवलं; ‘या’ क्रिकेटपटूची IPL Final मध्ये दमदार कामगिरी!

IPL 2020: विजेत्या संघाला ‘इतकी’ रक्कम मिळणार, पॅट कमिंस आणि मॅक्सवेल अधिक मालामाल

(IPL 2020 Final : Trent Boult takes wicket on first ball first time in ipl history)

सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.