Virendra Sehwag | चेन्नईला सरकारी नोकरी समजलेत, वीरेंद्र सेहवागची केदार जाधव-रवींद्र जडेजावर खरमरीत टीका

कोलकाता विरुद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नईवर टीका करण्यात येत आहे. (Former Indian Cricketer Virendra Sehwag critisized Chennai Batsman)

Virendra Sehwag | चेन्नईला सरकारी नोकरी समजलेत, वीरेंद्र सेहवागची केदार जाधव-रवींद्र जडेजावर खरमरीत टीका
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 4:54 PM

नवी दिल्ली : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 21 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा अवघ्या 10 धावांनी पराभव झाला. या सामन्यात केदार जाधव (Kedar Jadhav) आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) निर्णायक क्षणी संथ खेळी केली. याखेळीवरुन या दोघांना भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) लक्ष केलं आहे. वीरेंद्र सेहवागने या दोघांवर खरमरीत टीका केली आहे. चेन्नईला काही खेळाडू सरकारी नोकरीसारखं समजतात, अशा शब्दात सेहवागने या दोघांवर हल्ला चढवला. (Former Indian Cricketer Virendra Sehwag critisized Chennai Batsman)

सेहवाग काय म्हणाला ?

सेहवागने क्रिकबझच्या एका विशेष कार्यक्रमात चेन्नईच्या पराभवाबाबत प्रतिक्रिया दिली. “कोलकाताने दिलेलं विजयी आव्हान चेन्नईने पूर्ण करायला हवं होतं. केदार जाधव आणि रवींद्र जडेजाने अनेक बॉल डॉट केले. यामुळे चेन्नईला विजयी आव्हान गाठता आले नाही, असं सेहवाग म्हणाला. तसेच चेन्नईचे काही फलंदाज हे फ्रेंचायजीला सरकारी नोकरी समजतात. चांगली कामगिरी करा अथवा नाही, पगार तर वेळेवर मिळतो”, अशी बोचरी टीका सेहवागने केली.

विजयी आव्हानाचं पाठलाग करताना चेन्नईने 11 ते 14 ओव्हरदरम्यान अवघ्या 14 धावाच केल्या. तसेच यामध्ये शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू हे दोन स्टार फलंदाज बाद झाले. यानंतर आलेल्या केदार जाधवने 12 चेंडूत अवघ्या 7 धावाच केल्या. या संथ खेळीमुळे केदारला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

केदारला संघाबाहेर काढा

केदारला संघाबाहेर काढा, अन्यथा आम्ही चेन्नईला समर्थन देणं बदं करु. तसेच चेन्नईचे सामनेही पाहणार नाही, अशी तंबीच नेटीझन्सनी दिली आहे. चेन्नईला विजयासाठी 21 चेंडूत 39 धावांची गरज होती. मात्र यादरम्यान केदारने अतिशय संथ खेळी केली. केदारने पहिल्या 5 चेंडूत एकही धाव काढली नाही. त्यामुळे चेन्नईच्या पराभवाला केदारला नेटीझन्सकडून जबाबदार धरले जात आहे.

चेन्नईने यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत. यापैकी पहिला आणि पाचव्या सामन्यात चेन्नईचा विजय झाला आहे. तर यामधील 3 सामन्यात चेन्नईचा सलग पराभव झाला आहे. चेन्नई 4 पॉइंट्ससह पॉइंट्सटेबलमध्ये 6 व्या क्रमांकावर आहे. चेन्नईने 3 वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. मात्र यंदाच्या मोसमात चेन्नईला विशेष कामगिरी करता आली नाहीये. दरम्यान चेन्नई या स्पर्धेतील आगामी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध शनिवारी 10 ऑक्टोबरला खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

Kedar Jadhav : चेन्नईच्या निराशाजनक कामगिरीनंतर समर्थकांची तंबी, केदार जाधवला संघाबाहेर काढा अन्यथा……

(Former Indian Cricketer Virendra Sehwag critisized Chennai Batsman)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.