IPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी
शुभमन गिलने हैदराबाद विरुद्ध नाबाद 70 धावांची खेळी केली. | (England Former Cricketer Kevin Pietersen On Shubhaman Gill)
अबुधाबी : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 7 विकेट्सने पराभव केला. युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) हा कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने नाबाद 70 धावा केल्या. या खेळीत त्याने 2 सिक्स आणि 5 फोर लगावले. ( England Former Cricketer Kevin Pietersen On Shubhaman Gill )
या खेळीसाठी गिलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. गिलने केलेल्या या खेळीने इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Pietersen) प्रभावित झाला आहे. शुभमन गिलला कोलकाताचा कर्णधार करा, अशी मागणीच पीटरसनने केली आहे. पीटरसनने याबाबत ट्विट केलं आहे. गिल कोलकाताचा कर्णधार असायला हवा, असं पीटरसन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.
He should be the captain of KKR – @RealShubmanGill.
— Kevin Pietersen? (@KP24) September 26, 2020
शुभमन गिल कोलकाताचा युवा फलंदाज आहे. शुभमन गिलने 2018 च्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. यानंतर कोलकाताने गिलचा आपल्या संघात समावेश केला. तेव्हापासून गिल चांगली कामगिरी करतोय.
आयपीएलच्या या 13 व्या मोसमात गिलला ओपनिंग करण्याची संधी मिळाली. या संधीचाच फायदा गिलने घेतला आहे. याआधी गिलला मधल्या फळीत खेळवण्यात येत होतं. त्यामुळे गिलला मोठी खेळी करण्याची संधी मिळत नसे.
“गिल है के मानता नही”
शुभमन गिलच्या नाबाद खेळीचं कोलकाताच्या ट्विटर हॅंडलवरुन कौतुक करण्यात आलं आहे. ‘गिल है के मानता नही’ अशी भन्नाट कॅप्शन या ट्विटला देण्यात आली आहे. गिलने चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर कोलकाताच्या ट्विटर हॅंडलवरुन हे ट्विट करण्यात आलं.
"Gill" hai ki Maanta nahi! ♥️
The youngster gets his first half-century of the season with a boundary.
KKR – 95/3 (12.3)#KKRvSRH #KKRHaiTaiyaar #Dream11IPL pic.twitter.com/QuIlDOZ4mI
— KolkataKnightRiders (@KKRiders) September 26, 2020
हैदराबाद विरुद्ध केलेल्या या दमदार कामगिरीसाठी गिलचं ट्विटरवरुन कौतुक केलं जातंय. अनेक नेटीझन्सने गिलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
@RealShubmanGill what a incredible Fifty. Indian cricketing future in right hand. #shubmangill #kkr
— Prakashyab Poddar (@prakashyab) September 26, 2020
Without doubt the best young batsman in India #ShubmanGill – well played! #KKRvSRH #IPL2020 #KKR
— Sonal (@itssonall) September 26, 2020
संबंधित बातम्या :
IPL 2020 : राजस्थान रॉयल्सला मोठा फटका, बेन स्टोक्स आयपीएलला मुकण्याची चिन्हं
कॉमेंट्रीत विराट-अनुष्काविषयी आक्षेपार्ह टिप्पणी, सुनील गावस्करांवर चाहते बरसले
( England Former Cricketer Kevin Pietersen On Shubhaman Gill )