लंबी रेस का घोडा, दिग्गज खेळाडूकडून ऋषभ पंतचे कौतुक, म्हणाला….

दिल्ली कॅपिटल्सच्या ऋषभ पंतने यंदाच्या आयपीएलच्या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. (Former West Indies captain Brian Lara appreciate Rishabh Pant)

लंबी रेस का घोडा, दिग्गज खेळाडूकडून ऋषभ पंतचे कौतुक, म्हणाला....
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 8:29 PM

दुबई : सध्या आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात अनेक युवा खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. तर निवृत्त खेळाडू विश्लेषण तसेच समालोचन करत आहेत. आतापर्यंत यंदाच्या आयपीएल स्पर्धेत 22 सामने खेळले गेले  आहेत. या सर्व सामन्यात युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांच्याच मनावर मोहिनी घातली आहे. दिल्लीचा युवा आणि आक्रमक फंलदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) आपल्या खेळीने वेस्टइंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला (Brian Lara) आकर्षित केलं आहे. पंतने आतापर्यंत आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीचं लाराने कौतुक केलं आहे. (Former West Indies captain Brian Lara appreciate Rishabh Pant )

काय म्हणाला लारा?

लाराने स्टार स्पोर्ट्सच्या एका विशेष कार्याक्रमात पंतबद्दल वक्तव्य केलं. “आधीच्या तुलनेत आता पंतच्या खेळीत फार सुधारणा झाली आहे. माझ्यानुसार पंत हा अष्टपैलू खेळाडू झाला आहे. पंत अनेक वर्ष क्रिकेट खेळेल. आधी पंत बहुतेक फटके मैदानाच्या लेग साईड किंवा ऑन साईडला मारायचा. पण पंत आता ऑफ साईडलादेखील फटकेबाजी करतो. या सुधारणेमुळे पंत एक परफेक्ट बॅट्समन म्हणून उदयास आला आहे” असं लारा म्हणाला. दिल्लीसाठी ऋषभ यंदाच्या मोसमातील एक्स फॅक्टर राहिला आहे. पंतने या मोसमातील 5 सामन्यात 140 स्ट्राईक रेटने 171 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाचं भविष्य

“ऋषभ पंत टीम इंडियाचं भविष्य आहे. पंतमध्ये मैदानाच्या प्रत्येक बाजूला फटके मारण्याची कुवत आहे. पंत एक्स्ट्रा कव्हरच्यावरुनही फटके लगावू शकतो. पंत बॅटिंगबाबतीत अष्टपैलू आहे. पंत लंबे रेस का घोडा आहे. पंत भारताकडून अनेक वर्ष यशस्वीरित्या क्रिकेट खेळेल”, अशी आशाही लाराने व्यक्त केली.

ऋषभ पंतची आयपीएल कारकिर्द

ऋषभ पंतने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 60 सामने खेळले आहेत. यामध्ये पंतने 160 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 907 धावा केल्या. यात 11 अर्धशतक आणि 1 शतकी खेळीच समावेश आहे. 128 नाबाद ही पंतची आयपीएलमधील सर्वोच्च खेळी आहे.

संबंधित बातम्या :

….म्हणून युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल अजून मैदानात उतरला नाही, कोच अनिल कुबंळेचा खुलासा

Virendra Sehwag | चेन्नईला सरकारी नोकरी समजलेत, वीरेंद्र सेहवागची केदार जाधव-रवींद्र जडेजावर खरमरीत टीका

(Former West Indies captain Brian Lara appreciate Rishabh Pant )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.