IPL 2020 Playoffs : प्ले ऑफच्या 3 जागांसाठी 4 संघात रेस, तिकीट कुणाला?
आयपीएलचा (IPL 2020) 13 वा हंगाम रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. या हंगामातील लीग राऊंडमधील 56 पैकी 54 मॅच झाल्या आहेत.मात्र, प्लेऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या टीम निश्चित झालेल्या नाहीत. (IPL 2020 four teams in row for three places of playoff)
नवी दिल्ली : आयपीएलचा (IPL 2020) 13 वा हंगाम रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. या हंगामातील लीग राऊंडमधील 56 पैकी 54 मॅच झाल्या आहेत.मात्र, प्लेऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या टीम निश्चित झालेल्या नाहीत. मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले असून उर्वरित तीन टीम कोणत्या असतील हे पाहण्यासाठी लीग राऊंडमधील 56 व्या सामन्यापर्यंत थांबावे लागणार आहे. (IPL 2020 four teams in row for three places of playoff)
प्लेऑफच्या रेसमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या टीम रेसमध्ये आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब प्लेऑफच्या रेसमधून बाहेर गेले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या चार टीम पैकी 3 टीमला प्लेऑफचं तिकीट मिळेल आणि एका टीमला बाहेरचा रस्ता पकडावा लागणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत 13 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये 7 विजय मिळवले असून 6 पराभव झाल्यामुळे त्यांची गुणसंख्या 14 असून त्यांचे रनरेट 0.145 आहे. बंगळुरुची एक मॅच दिल्ली कॅपिटल्स सोबत होणार आहे. बंगळुरूला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. आरसीबीने हा सामना जिंकल्यास प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळेल आणि बंगळुरु थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेईल. दिल्ली विरुद्ध बंगळुरुचा पराभव झाला तरी बंगळुरूला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सपेक्षा बंगळुरुचे नेट रनरेट अधिक असावे लागेल. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी बंगळुरूला आणखी एका शक्यतेचा फायदा होऊ शकतो. सनरायजर्स हैदराबादचा मुंबई इंडियन्स विरुध्द पराभव झाला तर दिल्ली विरुद्ध पराभव होऊनही बंगळुरुचे प्लेऑफमध्ये क्वालिफाय होऊ शकते.
सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)
सनरायजर्स हैदराबादने 13 मॅचमध्ये 6 विजयासह 12 गुण मिळवले असून त्यांचे नेट रनरेट 0.555 इतके आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबादनं गेल्या काही सामन्यांमध्ये कमबॅक केले आहे. हैदराबादसमोर करो या मरो ही परिस्थिती आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. मुंबईविरुद्ध पराभव झाल्यास हैदराबादला थेट बाहेरचा रस्ता पकडावा लागेल.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals )
दिल्ली कॅपिटल्सने 13 सामन्यांमध्ये 7 विजय मिळवत 14 गुण मिळवले आहेत. मात्र, त्यांचे नेट रनरेट -0.159 आहे. बंगळुरूविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विजयी झाल्यास दिल्ली प्लेऑफमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. दिल्लीला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यास त्यांचे प्लेऑफमधील स्थान मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. हैदराबादचा पराभव झाल्यास दिल्लीला प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते.
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचे लीग राऊंडमधील सर्व सामने पूर्ण झाले आहेत. कोलकातानं 14 सामन्यांमध्ये 14 गुण मिळवले असून त्यांचे रनरेट -0.214 एवढे आहे. कोलकाताकडे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई आणि हैदराबाद यांच्या सामन्याच्या निर्णयावर अवलंबून आहे. मुंबईविरुद्ध हैदराबादचा पराभव झाल्यास कोलकाताला प्ले ऑफमध्ये जाऊ शकते. हैदराबाद विजयी झाले आणि कोलकाताचे रनरेट बंगळूरु किंवा दिल्लीपेक्षा जास्त असल्यास त्यांना प्लेऑफमध्ये संधी मिळू शकते.
संबंधित बातम्या:
IPL 2020, DC vs MI : सातत्याने निराशाजनक कामगिरी करणारा पृथ्वी शॉ सोशल मीडियावर ट्रोल, मीम्स व्हायरल
IPL : सुरुवातीला 2 सामन्यात शून्यावर बाद, नंतर लागोपाठ 3 अर्धशतकं, ऋतुराज गायकवाडची सेहवागशी बरोबरी
(IPL 2020 four teams in row for three places of playoff)