हर्षा भोगले यांची IPL 2020 मधील ड्रिम टीम तयार, संघात रोहित-विराटसह पर्पल कॅप विजेत्याला स्थान नाही

IPL 2020 मध्ये अनेक मातब्बर खेळाडूंनी त्यांचा जलवा दाखवलाच, सोबत काही अनकॅप खेळाडूंनीही क्रिकेटरसिकांची मनं जिंकली.

हर्षा भोगले यांची IPL 2020 मधील ड्रिम टीम तयार, संघात रोहित-विराटसह पर्पल कॅप विजेत्याला स्थान नाही
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 5:05 PM

मुंबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील अंतिम सामन्यात (IPL 2020 FINAL) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने मात करत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. यासह यंदाच्या मोसमाचा शेवट झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक मातब्बर खेळाडूंनी त्यांचा जलवा दाखवलाच, सोबत काही अनकॅप खेळाडूंनीही क्रिकेटरसिकांची मनं जिंकली. स्पर्धा संपताच अनेक माजी खेळाडू, समीक्षक आणि समलोचकांनी त्यांची आयपीएलमधील ड्रिम टीम निवडली आहे. (IPL 2020 : Harsha Bhogle did Not selected Purple Cap Winner in his Best XI or dream team)

भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग आणि अजित आगरकर या दोघांनी त्यांची ड्रिम टीम निवडली आहे. तसेच आता समलोचक हर्षा भोगले यांनीदेखील त्यांची ड्रिम आयपीएल टीम निवडली आहे. विशेष म्हणजे हर्षा भोगले यांनी त्यांच्या ड्रिम आयपीएल टीमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णदार हिटमॅन रोहित शर्मा, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीसह यंदाच्या आयपीएलमध्ये पर्पल कॅम मिळवणाऱ्या कगिसो रबाडा या मातब्बर खेळाडूंना स्थान दिलेलं नाही.

हर्षा भोगले यांनी त्यांच्या संघात चार फलंदाज, दोन अष्टपैलू खेळाडू, दोन फिरकीपटू आणि तीन जलगदगती गोलंदाजांचा समावेश केला आहे. भोगले यांनी त्यांच्या संघात सलामीवीर म्हणून के. एल. राहुल आणि शिखर धवनची निवड केली आहे. राहुल आणि धवन या दोघांनी यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत. राहुलने यंदा 670 तर शिखरने 618 धावा फटकावल्या आहेत. भोगले यांनी त्यांच्या संघात तिसरा फंलदाज म्हणून मुंबईच्या सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. सूर्यकुमारने यंदाच्या आयपीएलमध्ये 480 धावा फटकावल्या आहेत.

भोगले यांनी मधल्या फळीत एबी डिव्हिलियर्स, मुंबईचे हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड या विस्फोटक फलंदाजांची निवड केली आहे. डिव्हिलियर्सने यंदाच्या मोसमात 454 धावा फटकावल्या आहेत. पोलार्डने 191 च्या स्टाईक रेटने 268 धावा कुटल्या आहेत, तर हार्दिक पांड्याने 178 च्या स्ट्राईक रेटने 281 धावा फटकावल्या आहेत.

भोगले यांनी त्यांच्या संघात यजुवेंद्र चहल आणि राशिद खान या दोन फिरकीपटूंची निवड केली आहे. यंदाच्या मोसमात चहलने 21 तर राशिदने 20 विकेट मिळवल्या आहेत. जलदगती गोलंदाजांमध्ये भोगले यांनी राजस्थान रॉयल्सचा जोफ्रा आर्चर, पंजाबचा मोबम्मद शमी आणि मुंबईच्या जसप्रीत बुमराहची निवड केली आहे. आर्चर आणि शमीने यंदाच्या मोसमात प्रत्येकी 20-20 विकेट मिळवल्या आहेत. तर बुमराहने 27 जनांना बाद केलं आहे.

हर्षा भोगले यांची ड्रिम आयपीएल टीम : के. एल. राहुल, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जोफ्रा आर्चर, राशिद खान, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल.

संबंधित बातम्या

IPL मध्ये मोठे बदल, दोन नवे संघ सहभागी होणार, एका संघात 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडू खेळणार?

SRH च्या चाहत्यांना ‘या’ खेळाडूला गमावण्याची भीती, कर्णधार वॉर्नरकडून दिलासा

IPL 2020 | ईशान किशन भारतीय संघात धोनीची विकेटकीपरची जागा घेण्यासाठी सज्ज : एम एस के प्रसाद

(IPL 2020 : Harsha Bhogle did Not selected Purple Cap Winner in his Best XI or dream team)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.