IPL 2020 | हिंमत असेल तर माझ्यापेक्षा चांगलं खेळून दाखव, हिटमॅन रोहितचं गब्बर धवनला आव्हान
पॉइंट्सटेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. (Rohit Sharma challenges Shikhar Dhawan)
दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हे दोन्ही संघ आतापर्यंत यशस्वी ठरले आहेत. मुंबईचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा (Hitman Rohit Sharma) आणि दिल्लीचा गब्बर शिखर धवन (Gabbar Shikhar Dhawan) हे दोन्ही सलामीवीर चांगली कामगिरी करत आहेत. मात्र असे असले तरी, हिटमॅनने गब्बरला आव्हान दिले आहे. तुझ्यात हिंमत असेल तर माझ्यापेक्षा चांगलं खेळून दाखव, अस थेट आव्हानाच रोहितने शिखर धवनला दिलं आहे. (Rohit Sharma challenges Shikhar Dhawan)
रोहितने शिखरला एका व्हिडिओद्वारे हे चॅलेंज दिले आहे. रोहितने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत रोहित एकाहाताने बॅटवर चेंडू टोलवतोय. तुझ्यात हिंमत असेल, तर माझ्यापेक्षा चांगलारित्या चेंडू टोलवून दाखव. असं म्हणत रोहितने शिखरला हे आव्हान दिलं आहे. या चॅलेंजच ‘सही है चॅलेंज’ असं नाव आहे. त्यामुळे आता रोहितने दिलेलं हे चॅलेंज शिखर धवन स्वीकारणार का, याकडे गब्बर समर्थकांचं लक्ष आहे.
.@SDhawan25, can u do better than this? I nominate you for #TheSahiHaiChallenge. #MutualFundsSahiHai @MFSahiHai pic.twitter.com/Wcd8eOc14o
— Rohit Sharma (@ImRo45) October 9, 2020
पॉइंट्सटेबलमध्ये दिल्ली-मुंबई अव्वल
पॉइंट्सटेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली आणि मुंबईने यंदाच्या मोसमात आतापर्यंत प्रत्येकी 6 सामने खेळले आहेत. या 6 पैकी दिल्लीने 5 तर मुंबईने 4 सामने जिंकले आहेत. दिल्लीच्या नावावर 10 तर मुंबईच्या नावावर 8 पॉइंट्स आहेत. मुंबई आणि दिल्ली रविवारी 11 ऑक्टोबरला भिडणार आहेत. हे दोन्ही संघ आतापर्यंत यशस्वी राहिले आहेत. त्यामुळे रविवारच्या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
रोहितची आयपीएल कारकिर्द
रोहित शर्मा आयपीएलमधील यशस्वी कर्णधार राहिला आहे. रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला 4 वेळा आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं आहे. रोहितने नुकतेच आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच षटकारांचं द्विशतक झळकावलं आहे. रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये 194 सामने खेळले आहेत. यात त्याने 131 च्या स्ट्राईक रेटने 5 हजार 109 धावा केल्या आहेत. यामध्ये 38 अर्धशतक आणि 1 शतकी खेळीचा समावेश आहे. नाबाद 109 ही रोहितची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. तसेच बोलिंगनेही रोहितने चमक दाखवली आहे. रोहितने आतापर्यंत एकूण 15 विकेट घेतले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये एका हॅट्रिकचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
IPL2020 : हिटमॅन रोहित शर्मा पाचहजारी मनसबदार, आयपीएलमध्ये भन्नाट कामगिरी
IPL 2020, KKR vs MI | आयपीएल कारकिर्दीत हिटमॅन रोहित शर्माचं षटकारांचं द्विशतक
(Rohit Sharma challenges Shikhar Dhawan)