IPL 2020 | अजित आगरकरची बेस्ट प्लेईंग इलेव्हन, बुमराह, सूर्यकुमारला स्थान, मात्र रोहित, विराट बाहेर

या संघात मुंबईच्या 4, दिल्लीच्या 3, बंगळुरुचे 2, हैदराबाद आणि कोलकाताच्या प्रत्येकी 1 खेळाडूचा समावेश आहे .

IPL 2020 | अजित आगरकरची बेस्ट प्लेईंग इलेव्हन, बुमराह, सूर्यकुमारला स्थान, मात्र रोहित, विराट बाहेर
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 4:06 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) मात करत विजेतेपद पटकावलं. मुंबईची आयपीएल विजेतेपद पटकावण्याची ही पाचवी वेळ ठरली. यानंतर टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी तसेच क्रिकेट रसिकांनी आपली आयपीएलच्या 13 व्या मोसमातील बेस्ट टीम निवडली. त्यातच आता टीम इंडियाचा माजी खेळाडू अजित आगरकरने (Ajit Agarkar) आपला आयपीएलचा संघ जाहीर केला आहे. आगरकरने आपल्या संघामध्ये अनुभवी आणि दमदार कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना डच्चू दिला आहे. तर या मोसमात चमकदार कामगिरी केलेल्या युवा खेळाडूंना त्याने स्थान दिलंय. आगरकरने स्टार स्पोर्ट्सच्या एका विशेष कार्यक्रमादरम्यान आपल्या बेस्ट आयपीएल टीमची निवड केली आहे. ipl 2020 indian former player ajit agarkar select best ipl 2020 playing eleven team

अशी आहे आगरकरची टीम

सलामीवीर म्हणून वॉर्नर-धवन.

आगरकरने सलामीवीर म्हणून सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि दिल्लीचा ‘गब्बर’ शिखर धवनला (Shikhar Dhawan) पसंती दिली आहे. वॉर्नरने या मोसमात आयपीएल कारकिर्दीतील सर्वात कमी डावात वेगवान 5 हजार धावा करण्याचा पराक्रम केला. तर शिखरने या मोसमात आयपीएलच्या इतिहासात कोणालाच न जमलेली कामगिरी केली. शिखरने या मोसमात सलग 2 सामन्यात सलग 2 शतकं लगावली.

आगरकरने वनडाऊन म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर मुंबईच्या इशान किशनला (Ishan Kishan) संधी दिली आहे. इशानने या मोसमात सर्वाधिक सिक्स लगावण्याची कामगिरी केली. तसेच त्याने दिल्लीविरुद्धच्या अंतिम सामन्यात 33 धावांनी महत्वपूर्ण नाबाद खेळी केली.

चौथ्या क्रमांकावर मुंबईकर सूर्या

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians)आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी दिली आहे. तर सूर्यकुमार यादव सलग 3 मोसमांपासून 400 पेक्षा धावा केल्या आहेत. या मोसमात सूर्या चांगलाच तळपलेला दिसला. त्याने फिल्डिंगमधूनही आपली चमक दाखवून दिली. मुंबईसाठी त्याने अनेक वेळा निर्णायक क्षणी महत्वाची कामगिरी केली. अंतिम सामन्यात आपल्या विकेटचं बलिदान देत, रोहित शर्माला त्याने वाचवले.

‘मिस्टर 360’ एबी डी

पाचव्या क्रमांकावर आगरकरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मिस्टर 360 एबी डी व्हीलियर्सला (Mister 360 AB Devillers) समाविष्ट केलंय. एबीने या मोसमात नेहमीप्रमाणे आपल्या बॅटिंगने जादू दाखवली. एबीने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत बंगळुरुला विजय मिळवून दिला. तसेच त्याने फिल्डिंगनेही चमक दाखवली. मात्र बंगळुरुचे एलिमिनेटर सामन्यातच आव्हान संपुष्टात आले.

सहाव्या आणि सातव्या क्रमांकावरच्या खेळाडूवर मोठी जबाबदारी असते. टीमची सलामी जोडी आणि मध्यक्रम अयशस्वी ठरल्यास सर्व भिस्त या क्रमांकावरच्या खेळाडूंवर असते. त्यानुसारच आगरकरने सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अशाच आक्रमक आणि तडाखेदार अष्टपैलू खेळाडूंना स्थान दिलंय. मार्कस स्टोयनिस (Marcus Stoinis)आणि हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) स्थान दिलं.

‘कुंग फु पांड्या’ (Kung Fu Pandya) आणि स्टोयनिस

मुंबईचा अष्टपैलू आक्रमक खेळाडू हार्दिक पांड्याला सहाव्या क्रमांकावर संधी दिली आहे. हार्दिकला यावेळेसे गोलंदाजीने विशेष काही करता आले नाही. मात्र त्याने आक्रमक फलंदाजी केली. विशेष म्हणजे डेथ ओव्हर्समध्ये मोक्याच्या क्षणी फटकेबाजी केली. तसेच दिल्ली कॅपिटल्सचा ऑलराऊंडर मार्कस स्टोयिनिसने चांगली कामगिरी केली.

वेगवान गोलंदाजीची भिस्त बुमराह-रबाडाकडे

आगरकरने वेगवान गोलंदाजीसाठीची जबाबदारी मुंबईच्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि दिल्लीच्या कगिसो रबाडाला (Kagiso Rabada) दिली आहे. रबाडा या मोसमातील पर्पल कॅपचा (Purple Cap Holder 2020) मानकरी ठरला. एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. तसेच बुमराहने या मोसमात अनोखा विक्रम केला. बुमराह आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा एकमेव भारीय गोलंदाज ठरला. बुमराहने या मोसमात 27 विकेट्स घेतल्या.

फिरकीच्या जादूसाठी चहल-चक्रवर्ती

बंगळुरुचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कोलकाताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्थीला (Varun Chakaravarthy) आगरकरने आपल्या संघात स्थान दिलं आहे. युझवेंद्रने बंगळुरुला गरजेच्या वेळेस विकेट्स मिळवून दिल्या. तर वरुणने दिल्लीविरुद्ध 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. वरुणची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली होती. मात्र दुखापतीमुळे त्याला मुकावे लागले. त्यामुळे वरुणच्या जागी टी नटराजनला संधी देण्यात आली आहे.

दरम्यान आयपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात नियमितप्रमाणे मार्च महिन्यात होईल, असा आशावाद बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केला. तसेच या आगामी मोसमात संघसंख्या वाढणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

प्लेइंग इलेव्हन : डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, एबी डी व्हीलियर्स, हार्दिक पांड्या, मार्कस स्टॉयनिस, जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा, युजवेंद्र चहल आणि वरुण चक्रवर्ती

संबंधित बातम्या :

IPL 2020 | ‘दस का दम’ आयपीएलच्या 13 व्या मोसमात धडाकेबाज कामगिरी करणारे टॉप 10 खेळाडू

IPL 2021 मध्ये मोठे बदल, दोन नवे संघ सहभागी होणार, एका संघात 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडू खेळणार?

IPL 2020 | नजफगढचा नवाब वीरेंद्र सेहवागची आयपीएल 2020 मधील ड्रीम टीम, ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी निवड

ipl 2020 indian former player ajit agarkar select best ipl 2020 playing eleven team

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.