IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब आमनेसामने, कोण जिंकणार सामना ?

भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होणार आहे. | ( IPL 2020 Kings XI Punjab vs Delhi Capitals )

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब आमनेसामने, कोण जिंकणार सामना ?
Follow us
| Updated on: Sep 20, 2020 | 5:41 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील दुसरा सामना आज ( 20 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात हा सामना खेळण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होणार आहे. दिल्लीच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे असणार आहे. पंजाबचं कर्णधारपद लोकेश राहुल सांभाळणार आहे. (IPL 2020 Kings XI Punjab vs Delhi Capitals)

पंजाब आणि दिल्लीचा या पर्वातील पहिला सामना असणार आहे. त्यामुळे पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. यामुळे दोन्ही संघात चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमकडे युवा नेतृत्व आहे. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल हे दोघे जागतिक ख्यातीचे खेळाडू आहेत. त्यामुळे या सामन्यात दोघांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा कस लागणार आहे.

दोन्ही संघांची यूएईमधील कामगिरी

यूएईमध्ये पंजाबची दमदार कामगिरी राहिली आहे. यूएईत 2014मध्ये आयपीएल स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील 20सामने खेळण्यात आले होते. त्यावेळेस प्रत्येक टीमने 5 सामने खेळले होते. पंजाबने या पाचही सामन्यात विजय मिळवला होता. तर दिल्लीचा 5 पैकी 3 सामन्यात पराभव तर 2 मॅचमध्ये विजय झाला होता.

दिल्लीवर पंजाब वरचढ

आयपीएलमध्ये आतापर्यंत या दोन्ही संघात एकूण 24 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पंजाबचा वरचश्मा राहिला आहे. पंजाबने दिल्लीविरोधातील 24 सामन्यांपैकी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसऱ्याबाजूला दिल्लीला 10 सामने जिंकण्यास यश आले आहे. या दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या मागील 5 सामन्यांपैकी 4 सामने पंजाबने जिंकलेत. तर शेवटचा सामना दिल्लीने जिंकला होता.

दिल्लीकडे फिरकीपटुची खाण

दिल्ली कॅपिटल्सकडे अनुभवी आणि चांगले फिरकीपटू आहेत. दिल्लीकडे रवीचंद्रन आश्विन, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल हे तगडे आणि प्रभावी फिरकीपटू आहेत. या तिघांच्या खांद्यावर दिल्लीच्या फिरकीची जबाबदारी असेल.

ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस गेल

पंजाबकडे ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस गेल यांच्यासारखे आक्रमक आणि स्फोटक खेळाडू आहेत. हे दोन्ही खेळाडू निर्णायकक्षणी संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता ठेवतात. ग्लेन मॅक्सवेलने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धातील वनडे सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याचा विश्वास दुणावलेला आहे. यामुळे दिल्लीसमोर या दोन्ही खेळाडूंना रोखण्याचे आव्हान असणार आहे.

इथे पाहता येणार लाईव्ह सामना

कोरोनामुळे क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद घेता येणार नाही. पण चाहत्यांना निराश होण्याचं कारण नाही. स्टार स्पोर्ट्सवर (Star Sports) थेट सामने पाहता येतील. तसेच मोबाईल युझर्सना डिज्नी हॉटस्टार अॅप (Dinsey Hotstar App)आणि जिओ अॅपवर (Jio App) लाईव्ह मॅच पाहता येईल. (IPL 2020 Kings XI Punjab vs Delhi Capitals)

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमेयर, खगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिछाने, कीमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नोर्तजे, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्क्स स्टोनिस आणि ललित यादव

किंग्स इलेव्हन  पंजाब : केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, शेल्डन कॉटरेल, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स निशाम, निकोलस पानन (विकेटकीपर), ईशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णप्पा गौतम, हरप्रीत बरार, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, सिमरन सिंह (विकेटकीपर), जगदीश सुचित, तजिंदर सिंह आणि हार्डस विलजोन.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | तीन युवा खेळाडू आयपीएल पदार्पणासाठी सज्ज, सामना पलटवण्याची क्षमता

IPL 2020 : यूएईचा कर्णधार कोहलीच्या मदतीला, RCB ची भन्नाट आयडिया

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.