Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर, मुंबई इंडियन्स ‘या’ संघासोबत सलामीला भिडणार

आयपीएलमधील आठ संघात प्राथमिक फेरीत एकूण 46 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी 24 सामने दुबईत, 20 अबुधाबीत, तर 12 शारजा येथे होतील.

IPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर, मुंबई इंडियन्स 'या' संघासोबत सलामीला भिडणार
Follow us
| Updated on: Sep 16, 2020 | 8:19 PM

मुंबई : बहुप्रतीक्षित IPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि उपविजेते चेन्नई सुपरकिंग्ज या संघात सलामीचा सामना रंगणार आहे. यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबीत 19 सप्टेंबरला हा सामना रंगणार आहे. पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6:00 वाजता) सुरू होईल. (IPL 2020 Matches Full Schedule Fixtures IPL Timetable Venue List)

शनिवारी टूर्नामेंट सुरु झाल्यानंतर रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना होईल. हा दुबईतील पहिलाच सामना असेल. तर तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे.

ज्या शनिवार-रविवार एकाच दिवशी दोन सामने असतील, तेव्हा आधीचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता) सुरु होईल. तर दुसरा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार  6:00 वाजता) सुरु होईल.

आयपीएलमधील आठ संघात प्राथमिक फेरीत एकूण 46 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी 24 सामने दुबईत, 20 अबुधाबीत, तर 12 शारजा येथे होतील.

19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा13 वा हंगाम रंगणार आहे. एकूण 51 दिवस यूएईमध्ये क्रिकेटचा उत्सव साजरा होईल. सहा वर्षानंतर पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेचं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. याआधी लोकसभा निवडणुकांमुळे 2014 मध्ये आयपीएलच्या सातव्या हंगामाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा आयपीएल हंगाम यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचा 13 वा हंगाम 29 मार्च ते 24 मे दरम्यान खेळवला जाणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. (IPL 2020 Matches Full Schedule Fixtures IPL Timetable Venue List)

संबंधित बातम्या :

चेन्नईची दुसरी विकेट! रैनापाठोपाठ आणखी एका दिग्गज खेळाडूची माघार

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हुकमी गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

(IPL 2020 Matches Full Schedule Fixtures IPL Timetable Venue List)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.