IPL 2020 | अंतिम सामन्याआधी मुंबईला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, फायनलमध्ये खेळणार की नाही?

हा गोलंदाज सातत्याने मुंबईसाठी चांगली कामगिरी करत आहे.

IPL 2020 | अंतिम सामन्याआधी मुंबईला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, फायनलमध्ये खेळणार की नाही?
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 5:25 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील क्वालिफायर 1 (Qualifier 1) सामना गुरुवारी 5 नोव्हेंबरला खेळण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 57 धावांनी मात केली. या विजयासह मुंबईने फायलनमध्ये धडक मारली. मुंबईची फायलनमध्ये धडकण्याची ही सहावी वेळ ठरली. फायनलमध्ये मुंबईविरुद्ध कोणता संघ खेळणार हे अजून निश्चित झालं नाहीये. मात्र मुंबईला अंतिम सामन्याआधी मोठा झटका लागला आहे. मुंबईचा स्टार गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या चिंतेत भर पडली आहे. ipl 2020 mumbai indians star bowler trent bolt injured before final match

बोल्टला ग्रोईन इंज्युरीचा (Groin Injurey) त्रास झाला आहे. बोल्टच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली आहे. बोल्टने सामन्याच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकात दिल्लीच्या टॉपच्या बॅट्समनना शून्यावर बाद केलं. बोल्टने पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) हाती पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद केलं. यानंतर पाचव्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला पायचीत केलं. यासह त्याने पहिली ओव्हर डबल विकेट मेडन टाकली. यानंतर त्याने आणखी एक ओव्हर टाकली. मात्र सामन्याच्या 14 व्या ओव्हरमध्ये त्याला त्रास जाणवू लागला. यामुळे बोल्टला मैदानाबाहेर जावे लागले.

दुखापतीमुळे बोल्टला आपल्या कोट्यातील सर्व ओव्हर टाकता आल्या नाहीत. बोल्टने आपल्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 9 धावा दिल्या. यामध्ये त्याने पहिली डबल विकेट मेडन टाकली. फायनल सामन्याच्या पार्श्भूमीवर बोल्ट सारखा महत्वाचा गोलंदाज दुखापत झाल्याने मुंबईच्या पर्यायाने रोहितच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.

बुमराह-बोल्टची कमाल

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ट्रेन्ट बोल्ट ही जोडी आयपीएलच्या 13 व्या मोसमात दमदार कामगिरी करत आहेत. या दोघांनी आतापर्यंत या मोसमात एकूण 49 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये बुमराहच्या नावावर 27 तर बोल्टच्या नावावर 22 विकेट्सची नोंद आहे. बोल्टने केलेल्या कामगिरीसाठी त्याला या मोसमात 2 वेळा सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

बोल्टच्या दुखापतीबाबत रोहितकडून माहिती

बोल्टला झालेल्या दुखापतीबाबत हिटमॅन आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) माहिती दिली आहे. “मी बोल्टला पाहिलं. बोल्टला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची नाही. बोल्टला पुढील काही दिवस विश्रांती घेणार आहे. त्यानंतर तो नक्कीच अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरेल”, असा आशावाद रोहितने व्यक्त केला.

दरम्यान आज (6 नोव्हेंबर) एलिमिनेटर (Eliminator 2020) सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या एलिमिनेटर सामन्यातील विजेत संघाची गाठ क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) पडणार आहे.

संबंधित बातम्या :

Jasprit Bumrah | बुम बुम बुमराह ! जसप्रीतची विक्रमी कामगिरी, जबरदस्त कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज

IPL 2020 | आंतरराष्ट्रीय मैदानात उगवण्याआधीच सूर्यकुमारला नकोशा विक्रमाचे ग्रहण

Photo | हैदराबाद वरचढ ठरणार की बंगळुरु विजयश्री पटकावणार? दिल्लीशी कोणाची गाठ पडणार?

ipl 2020 mumbai indians star bowler trent bolt injured before final match

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.