IPL प्लेऑफचं गणित : मुंबईच्या विजयाकडे कोलकात्याचं लक्ष, हैदराबादसाठी ‘करो या मरो’ची स्थिती
आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना खेळवला जाणार आहे
दुबई : इंडियन प्रिमियर लीग (Indian Premier League) स्पर्धेत आता केवळ एकच साखळी सामना बाकी आहे. आयपीएलमध्ये आज (03 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हा सामना खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे आजच्या सामन्याचा निकाल प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ ठरवणार आहे. (IPL 2020 Playoffs scenario : Sunrisers Hyderabad and Kolkata Knight Riders depends on MIvsSRH Match)
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे तीन संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर प्ले ऑफमध्ये चौथं स्थान मिळवण्यासाटी हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये चुरस आहे. जरी कोलकात्याचे साखळी फेरीतले सर्व सामने संपले असले तरी, आजच्या सामन्यावर त्यांचंही भविष्य अवलंबून आहे.
प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ कोणता?
सनराइजर्स हैदराबाद
13 सामने, 12 गुण, नेट रनरेट +0.555
बाकी सामने : मुंबई इंडियन्स
डेव्हिड वार्नरच्या या संघाचं भवितव्य त्यांच्याच हातात आहे. हा संघ 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. या संघाचे गुण कमी असले तरी नेट रनरेटच्या बाबतीत हा संघ मुंबईनंतर दुसऱ्या नंबरवर आहे. त्यामुळे या संघाला केवळ आजचा सामना जिंकायचा आहे. हैदराबादने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं तर हा संघ गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचेल आणि त्यांना प्लेऑफचं तिकीटही मिळेल. जर हैदराबादचा संघ पराभूत झाला तर त्यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागेल.
कोलकाता नाईट रायडर्स
14 सामने, 14 गुण, नेट रनरेट -0.214
आयपीएलमध्ये आज होणारा सामना मुंबई आणि हैदराबादमध्ये असला तरी, या सामन्याच्या निकालावर कोलकाता संघाचं भवितव्य अवलंबून आहे. मुंबईने हैदराबादला हरवलं तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्ले ऑफचं तिकीट मिळेल. या सामन्यात हैदराबादने मुंबईला पराभूत केलं तर हैदराबादचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल. परिणामी कोलकात्याचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईचा विजय व्हावा, यासाठी कोलकात्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.
संबंधित बातम्या
दिनेश कार्तिकची विक्रमाला गवसणी, कॅप्टन कूल धोनीचा विक्रम मोडित
रोहित शर्माने पुनरागमनाची घाई करु नये, रवी शास्त्री यांचा सल्ला
आयपीएलच्या 13 व्या मोसमातील चेन्नईचे आव्हान संपुष्टात, धोनीच्या नावे खराब विक्रमाची नोंद
युवराज सिंहचा रोहित-ऋषभला फिटनेसवरुन टोला
(IPL 2020 Playoffs scenario : Sunrisers Hyderabad and Kolkata Knight Riders depends on MIvsSRH Match)