IPL 2020 Qualifier 1 MI vs DC | मी मुंबईकर, माझा मुंबईलाच पाठिंबा, जिंकणार तर मुंबईच, पण… : सुनील गावसकर

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील पहिला क्वालिफायर सामना मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात खेळण्यात येणार आहे.

IPL 2020 Qualifier 1 MI vs DC | मी मुंबईकर, माझा मुंबईलाच पाठिंबा, जिंकणार तर मुंबईच, पण... :  सुनील गावसकर
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 5:41 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील प्ले ऑफ सामन्यांना आजपासून (5 नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. प्ले ऑफमधील क्वालिफायर 1 ( Qualifier 1 ) सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. हा सामना कोणता संघ जिंकणार, याबाबत कोणलाच अंदाज बांधता येत नाहीये. मात्र या क्वालिफायर 1 सामन्याबद्दल टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि आयपीएलमध्ये समालोचक असेलेले लिटील मास्टर अर्थात सुनील गावसकर (Little Master Sunil Gavaskar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ipl 2020 qualifier 1 mi vs dc im from mumbaikar heart says mumbai will win but mind said sunil gavaskar

गावसकर काय म्हणाले?

“मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यातील क्वालिफाय 1 सामना चुरशीचा होईल. दिल्लीत मुंबईचे 3 खेळाडू आहेत. यामध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) या तगड्या खेळाडूंचा समावेश आहे. जर या तिनही खेळाडूंनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली, तर मुंबईला विजयासाठी संघर्ष करावा लागेल”, असं गावसकर यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

“गोलंदाजीच्या बाबतीत मुंबईकडे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) हे वेगवान गोलंदाज आहेत. तर दिल्लीकडे कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि एनरिक नोर्तजे (Anrich Nortje) आहे. तसेच दिल्लीच्या गोटात चतुर रवीचंद्रन आश्विनचा (Ravichandran Ashwin) समावेश आहे. फिरकीपटू अक्षर पटेलला (Axar Patel) पीचकडून मदत मिळाली तर, तो मुंबईसाठी डोकेदुखी ठरु शकतो”, अशी भितीही गावसकर यांनी व्यक्त केली. “मी मुंबईकर आहे. त्यामुळे माझं मन म्हणत की मुंबईचाच विजय होणार. पण मला याबाबत खात्री नाही”, असही गावसकर म्हणाले.

पराभूत संघाला आणखी एक संधी

क्वालिफाय 1 सामना हा पॉइंट्सटेबलमधील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघात खेळण्यात येतो. यानुसार यंदाच्या मोसमातील पहिला क्वालिफाय सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. या क्वालिफायर 1 सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला फायनलमध्ये पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळते.

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील पराभूत संघाला 8 नोव्हेंबरला होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier 2) खेळण्याची संधी मिळेल. दुसरा क्वालिफायर सामना हा एलिमिनेटर (Eliminator) सामन्यातील विजेता संघ विरुद्ध क्वालिफायर 1 मधील पराभूत संघात खेळण्यात येतो.

एलिमिनेटर सामना 6 नोव्हेंबरला अबुधाबीत 7 वाजून 30 मिनिटांनी खेळण्यात येणार आहे. तर दुसरा क्वालिफायर सामन्याला 8 नोव्हेंबरला अबुधाबीत 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

प्ले-ऑफचे वेळापत्रक

क्वालिफायर 1 – 5 नोव्हेंबर (दुबई) एलिमिनेटर- 6 नोव्हेंबर (अबुधाबी) क्वालिफायर 2- 8 नोव्हेंबर (अबुधाबी) फायनल-10 नोव्हेंबर (दुबई)

संबंधित बातम्या :

IPL 2020 | बीसीसीआयकडून प्ले-ऑफचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ ठिकाणी होणार अंतिम सामना

IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?

IPL 2020 : Qualifier सामन्यात कांटे की टक्कर, मुंबई-दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्ये ‘या’ खेळाडूंना संधी

ipl 2020 qualifier 1 mi vs dc im from mumbaikar heart says mumbai will win but mind said sunil gavaskar

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.