IPL 2020, SRH vs RR : राहुल तेवतियाची धमाकेदारी खेळी, विजयानंतर म्हणाला………
राजस्थान रॉयल्सच्या राहुल तेवतियाला हैदराबादविरुद्ध केलेल्या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.(Rajasthan Royals Rahul Tewatiya)
दुबई : राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 5 विकेटने पराभव केला. राहुल तेवतिया (Rahul Tewatiya) -रियान पराग (Riyan Parag) या जोडीने राजस्थानला विजय मिळवून दिला. राहुल तेवतियाने राजस्थानला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी येते, तेव्हा आपण स्वत: आपल्यात असलेली हुशारी दाखवून द्यायला हवी, अशी प्रतिक्रिया राहुलने विजयानंतर दिली. (Rajasthan Royals Rahul Tewatiya)
तेवतिया काय म्हणाला ?
“आमच्या राजस्थान संघाची सलामी आणि मधल्या फळीतील फलंदाज फार मजबूत आहे. मात्र सलामी आणि मधल्या फळीतील फलंदाज बाद होतात, तेव्हा आपल्यावर संघासाठी चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी येते. अशा निर्णायक क्षणी स्वत: आपल्यात असलेले कौशल्य आणि हुशारी खेळातून दाखवून द्यायला हवी. आम्हाला फार चांगल्यारित्या प्रशिक्षण दिले गेलं आहे. तेव्हा निर्णायक आणि गरजेच्या वेळी या प्रशिक्षणाचा उत्तमरित्या उपयोग करायला हवा”, अशी प्रतिक्रिया राहुल तेवतियाने विजयानंतर दिली.
Our top order is very strong but when they get out, responsibility comes on us & we have to prove. We have been trained well & it should get reflected: Rahul Tewatia, Rajasthan Royals
Tewatia & Riyan Parag guided Rajasthan Royals to a five-wicket win over SunRisers Hyderabad https://t.co/wKliayx8Ya pic.twitter.com/IR2PVEV6jD
— ANI (@ANI) October 11, 2020
निर्णायक भागीदारी
राजस्थानला रियान पराग आणि राहुल तेवतिया या जोडीने विजय मिळवून दिला. या जोडीने निर्णायक क्षणी फटकेबाजी करत राजस्थानला विजयी आव्हानापर्यंत पोहचवले.राहुल तेवतिया-रियान पराग या जोडीने 6 व्या विकेटसाठी नाबाद 85 धावांची विजयी भागीदारी केली. रियान परागने नाबाद 42 धावा केल्या. यात रियानने 2 सिक्स आणि 2 फोर लगावले. तसेच राहुल तेवतियाने 28 चेंडूत 45 धावांची नाबाद खेळी केली. यात त्याने 2 सिक्स आणि 4 फोर लगावले. राहुल तेवतियाने केलेल्या या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
To every one that stood by us, this one's for you! ?#SRHvRR | #HallaBol | #IPL2020 | #RoyalsFamily pic.twitter.com/OyHAhYNuYf
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) October 11, 2020
तेवतियाने राजस्थानला विजय मिळवून देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी पंजाबविरुद्धच्या सामन्यात राहुलने राजस्थानला विजय मिळवून दिला होता. पंजाबविरुद्ध 27 सप्टेंबरला हा सामना खेळण्यात आला होता.
5 sixes, 1 over – A Tewatia special.
Rahul Tewatia blasted 5 sixes in one Cottrell over to change the game in a flash. Relive this game-changing moment over and over again.https://t.co/p5SKMwALlz #Dream11IPL #RRvKXIP
— IndianPremierLeague (@IPL) September 27, 2020
या सामन्यात तेवतियाने 18 व्या ओव्हरमध्ये शेल्डॉन कॉट्रेलच्या बोलिंगवर 5 सिक्स लगावले होते. त्याच्या या खेळीमुळे सामना राजस्थानच्या बाजूने झुकला. या पंजाबविरुद्धच्या सामन्यात तेवतियाने 31 बॉलमध्ये 7 सिक्सच्या मदतीने तडाखेदार 53 धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या :
IPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय
(Rajasthan Royals Rahul Tewatiya)