IPL 2020, RR vs MI : राजस्थानच्या बेन स्टोक्स-संजू सॅमसनचा मुंबईवर ‘हल्ला बोल’, 8 विकेट्सने मात
नाबाद 107 धावा करणारा बेन स्टोक्स ठरला 'मॅन ऑफ द मॅच'.
अबुधाबी : राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) बेन स्टोक्स-संजू सॅमसन (Ben Stokes-Sanju Samson) या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 152 धावांच्या भागीदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 8 विकेट्सने मात केली आहे. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान राजस्थानने 18.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केले. राजस्थानकडून बेन स्टोक्सने नाबाद 107 धावा केल्या. तर संजू सॅमसनने 54 धावा करत स्टोक्सला चांगली साथ दिली. मुंबईकडून जेम्स पॅटिन्सनने 2 विकेट्स घेतल्या.
Top effort from @benstokes38 107* and Samson 54* as they steer @rajasthanroyals to an 8-wicket win against #MI.#Dream11IPL pic.twitter.com/IuHBbTgEDa
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या राजस्थानची निराशाजनक सुरुवात राहिली. रॉबिन उथप्पाच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का लागला. उथप्पा 13 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ मैदानात आला. स्टीव्हने काही वेळ मैदानात घालवला. मात्र स्टीव्हलाही जेम्स पॅटिन्सनने 11 रन्सवर आऊट केले. त्यामुळे राजस्थानची 4.4 ओव्हरमध्ये 44-2 अशी परिस्थिती झाली.
त्यानंतर मैदानात आलेल्या संजू सॅमसनच्या सोबतीने सलामीवीर बेन स्टोक्सने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तर दुसऱ्या बाजूने संजू सॅमसननेही स्टोक्सला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 152 धावांची नाबाद भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान संजू सॅमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच स्टोक्सनेही सिक्स मारत शतक पूर्ण केले. स्टोक्सने 59 चेंडूत दमदार शतक पूर्ण केलं. स्टोक्सने एकूण 60 चेंडूत नाबाद 107 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 सिक्स आणि 14 फोर लगावले. तर संजू सॅमसननेही 54 धावांवर नाबाद राहिला. त्याने या खेळीत 3 सिक्स आणि 4 फोर फटकावले. मुंबईकडून जेम्स पॅटिन्सनने 2 विकेट्स घेतल्या. पॅटिन्सनचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.
त्याआधी मुंबईने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 5 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 195 धावा केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक नाबाद 60 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने 40 रन्स केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईची निराशाजनक सुरुवात राहिली. मुंबईला 7 धावांवर पहिला धक्का क्विंटन डी कॉकच्या रुपात लागला. क्विंटन 6 धावांवर आऊट झाला. त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव दोघांनी चांगली खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. ही जोडी कार्तिक त्यागीने मोडली. कार्तिकने इशान किशनला 37 धावांवर बाद केलं. किशनने 36 चेंडूत 37 धावा केल्या. यामध्ये किशनने 4 फोर आणि 1 सिक्स लगावला. इशाननंतर सूर्यकुमार यादव 40 धावावंर बाद झाला. त्याने या खेळीत 26 चेंडूत 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 40 धावा केल्या. कर्णधार कायरन पोलार्डला आज विशेष करता आले नाही. पोलार्ड 6 रन्स करुन माघारी परतला.
झटपट विकेट्स गमावल्यानंतर हार्दिक पांड्या आणि सौरभ तिवारीने काही ओव्हर फटकेबाजी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. सौरभ तिवारी फटकेबाजीच्या नादात 34 धावांवर बाद झाला. त्याने 24 चेंडूत 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 34 धावा केल्या. सौरभनंतर कृणाल पांड्या मैदानात आला. कृणालच्या सोबतीने हार्दिकने तुफान फटकेबाजी केली. हार्दिकने 21 चेंडूत नाबाद 60 धावांची आक्रमक खेळी केली. यामध्ये 7 सिक्स आणि 2 फोर लगावले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागीने 1 विकेट घेतली. IPL 2020 RR vs MI Live Score Update Today Cricket Match Rajasthan Royals vs Mumbai Indians Live स्कोअर
[svt-event title=”राजस्थानचा मुंबईवर धमाकेदार विजय” date=”25/10/2020,11:29PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : राजस्थानच्या बेन स्टोक्स-संजू सॅमसनचा मुंबईवर ‘हल्ला बोल’, 8 विकेट्सने मात https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बेन स्टोक्सचे शानदार शतक” date=”25/10/2020,11:28PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : बेन स्टोक्सचे 59 चेंडूत शानदार शतक https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 24 धावांची गरज” date=”25/10/2020,10:51PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : राजस्थान 172-2 (16 Over) बेन स्टोक्स-86*, संजू सॅमसन-51*. राजस्थान मजबूत स्थितीत, विजयासाठी 24 चेंडूत 24 धावांची आवश्यकताhttps://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”संजू सॅमसनचे शानदार अर्धशतक” date=”25/10/2020,10:46PM” class=”svt-cd-green” ]
.@IamSanjuSamson joins the party with a well made FIFTY. His 13th in IPL.#Dream11IPL pic.twitter.com/STN4Qq1AdY
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी” date=”25/10/2020,10:41PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : तिसऱ्या विकेटसाठी बेन स्टोक्स-संजू सॅमसन जोडीची शतकी भागीदारी https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राजस्थान मजबूत स्थितीत” date=”25/10/2020,10:36PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : राजस्थान 125-2 (13 Over) बेन स्टोक्स-63*, संजू सॅमसन-29*https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राजस्थान 12 ओव्हरनंतर” date=”25/10/2020,10:29PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : राजस्थान 107-2 (12 Over) बेन स्टोक्स-56*, संजू सॅमसन-19*https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बेन स्टोक्सचे अर्धशतक” date=”25/10/2020,10:20PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : बेन स्टोक्सचे 28 चेंडूत शानदार अर्धशतक https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राजस्थान 8 ओव्हरनंतर” date=”25/10/2020,10:09PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : राजस्थान 75-2 (8 Over) बेन स्टोक्स-44*, संजू सॅमसन -4*https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर राजस्थान” date=”25/10/2020,9:59PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : राजस्थान 55-2 (6 Over) बेन स्टोक्स-30*, संजू सॅमसन -0*https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राजस्थानला दुसरा धक्का” date=”25/10/2020,9:52PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : राजस्थानला दुसरा धक्का, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आऊट https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”3 ओव्हरनंतर राजस्थान” date=”25/10/2020,9:43PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : राजस्थान 29-1 (3 Over) बेन स्टोक्स-16*, स्टीव्ह स्मिथ -0*https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राजस्थानला पहिला धक्का” date=”25/10/2020,9:38PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : राजस्थानला पहिला धक्का,रॉबिन उथप्पा आऊट https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राजस्थानला विजयासाठी 196 धावांचे आव्हान” date=”25/10/2020,9:16PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : हार्दिक पांड्याची तडाखेदार खेळी, राजस्थानला विजयासाठी 196 धावांचे आव्हानhttps://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”हार्दिक पांड्याचे तडाखेदार अर्धशतक” date=”25/10/2020,9:13PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : हार्दिक पांड्याचे तडाखेदार अर्धशतक https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईचा अर्धा संघ तंबूत” date=”25/10/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : मुंबईला पाचवा धक्का, सौरभ तिवारी आऊट https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”17 ओव्हरनंतर मुंबई” date=”25/10/2020,8:58PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : मुंबई 138-4 (17 Over) सौरभ तिवारी-33*, हार्दिक पांड्या-8*https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबई 15 ओव्हरनंतर” date=”25/10/2020,8:46PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : मुंबई 116-4 (15 Over) सौरभ तिवारी-16*, हार्दिक पांड्या-3*https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”14 ओव्हरनंतर मुंबई” date=”25/10/2020,8:42PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : मुंबई 108-4 (14 Over) सौरभ तिवारी-10*, हार्दिक पांड्या-1*https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईला चौथा धक्का” date=”25/10/2020,8:38PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : मुंबईला चौथा धक्का, कर्णधार कायरन पोलार्ड आऊट https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईला तिसरा धक्का” date=”25/10/2020,8:34PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RR vs MI Live : मुंबईला तिसरा धक्का, सूर्यकुमार यादव आऊट https://t.co/1Sbuh6pic2 #IPL2020 #RR #MI #RRvsMI #MIvsRR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईला दुसरा धक्का” date=”25/10/2020,8:32PM” class=”svt-cd-green” ]
Match 45. 10.4: WICKET! I Kishan (37) is out, c Jofra Archer b Kartik Tyagi, 90/2 https://t.co/zppwj1LdxA #RRvMI #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”10 ओव्हरनंतर मुंबई” date=”25/10/2020,8:31PM” class=”svt-cd-green” ]
At the halfway mark #MumbaiIndians are 89/1
Live – https://t.co/5N6wUjva9S #Dream11IPL pic.twitter.com/EDMZq0acWR
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर मुंबई” date=”25/10/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]
#MumbaiIndians have got off to a great start here in Abu Dhabi.
At the end of the powerplay they are 59/1
Live – https://t.co/5N6wUjva9S #RRvMI pic.twitter.com/59T3Lax49a
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईला पहिला धक्का” date=”25/10/2020,8:28PM” class=”svt-cd-green” ]
Match 45. 0.5: WICKET! Q de Kock (6) is out, b Jofra Archer, 7/1 https://t.co/zppwj1LdxA #RRvMI #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”असे आहेत दोन्ही संघ” date=”25/10/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]
A look at the Playing XI for #RRvMI#Dream11IPL pic.twitter.com/pLrxoa2eNx
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईची टीम” date=”25/10/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]
Match 45. Mumbai Indians XI: Q de Kock, I Kishan, S Yadav, S Tiwary, H Pandya, K Pollard, K Pandya, J Pattinson, R Chahar, T Boult, J Bumrah https://t.co/zppwj1LdxA #RRvMI #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राजस्थानची टीम” date=”25/10/2020,7:14PM” class=”svt-cd-green” ]
Match 45. Rajasthan Royals XI: R Uthappa, B Stokes, S Samson, J Buttler, S Smith, R Parag, R Tewatia, J Archer, S Gopal, A Rajpoot, K Tyagi https://t.co/zppwj1LdxA #RRvMI #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईने टॉस जिंकला” date=”25/10/2020,7:12PM” class=”svt-cd-green” ]
Captain Pollard wins the toss and #MumbaiIndians will bat first against #RR #Dream11IPL pic.twitter.com/hH033wUaio
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[/svt-event]
मुंबईने यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले आहेत. यापैकी 7 सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे, तर 3 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई पॉइंट्सटेबलमध्ये 14 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे.
With 10 points to their name, #KXIP are now positioned at 5 on the points table.#Dream11IPL pic.twitter.com/t0SFFkR3fI
— IndianPremierLeague (@IPL) October 24, 2020
मुंबई विरुद्ध राजस्थान
आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान आणि मुंबई एकूण 21 सामन्यात आमनेसामने भिडले आहेत. या 21 पैकी 11 सामन्यात मुंबईने राजस्थानवर विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 मॅचेसमध्ये मुंबईला पराभवाची धूळ चारली आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020, MI vs RR : मुंबई इंडियन्सचा राजस्थानवर 57 धावांनी ‘रॉयल’ विजय
IPL 2020 RR vs MI Live Score Update Today Cricket Match Rajasthan Royals vs Mumbai Indians Live