IPL 2020, KXIP vs DC : शिखर धवनची ‘गब्बर’ कामगिरी, आयपीएलमधील 5 हजार धावा पूर्ण
शिखर धवनने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील 10 सामन्यात 465 धावा केल्या आहेत.
दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 37 वा सामना खेळला जात आहे. हा सामना किंग्जस इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत पंजाबला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीकडून गब्बर शिखर धवनने सलग दुसऱ्यांदा शतक ठोकलं. धवनने 57 चेंडूत ही शतकी कामगिरी केली. धवन 106 धावांवर नाबाद राहिला. त्याने या खेळीत 12 फोर आणि 3 सिक्स लगावले. धवनने या खेळीसह पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा धवन ओव्हरऑल पाचवा आणि चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. Shikhar Dhawan Became The Fifth Batsman To Complete 5000 Runs In The IPL
5th player to enter the 5⃣0⃣0⃣0⃣ run club in @IPL ?3rd fastest to reach the landmark ?? IPL superstar, @SDhawan25 ?#KXIPvDC #Dream11IPL #YehHaiNayiDilli pic.twitter.com/9hLuAgVc3U
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 20, 2020
काय आहे किर्तीमान?
शिखर धवनने आयपीएलध्ये 5 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. शिखर धवनने एकूण 169 सामन्यात ही कामगिरी केली आहे. धवनने आयपीएलमध्ये 126 च्या स्ट्राईक रेटने 5 हजार 44 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे.
5 हजारी मनसबदारी
आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 5 फलंदाजांनाच 5 हजार धावांचा टप्पा गाठता आला आहे. यामध्ये बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली, चेन्नईचा सुरेश रैना, हिटमॅन रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर आणि आता शिखर धवनने अशी कामगिरी केली आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नुकताच सर्वात कमी डावात 5 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे.
सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली – 5759 सुरेश रैना – 5368 रोहित शर्मा – 5158 डेविड वॉर्नर – 5037 शिखर धवन – 5044
यंदाच्या मोसमातील ‘गब्बर’ कामगिरी
शिखर धवनने यंदाच्या 13 व्या मोसमात धमाकेदार फलंदाजी केली आहे. धवनने यंदाच्या मोसमातील 10 सामन्यात 106 च्या स्ट्राईक रेटने दमदार 465 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये अग्रस्थानी
दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये 14 गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. दिल्लीने यंदाच्या मोसमात 9 पैकी केवळ 2 सामनेच गमावले आहेत. दिल्लीला पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमध्ये धडक मारण्याची संधी आहे. दिल्लीने अशी कामगिरी केल्यास, प्लेऑफमध्ये यंदाच्या मोसमात धडकणारी दिल्ली पहिलीच टीम ठरेल.
शिखरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची 10 वर्ष
शिखर धवनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला आज 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. शिखर धवनने आजच्याच दिवशी 10 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यामुळे शिखरसाठी आजचा दिवस अविस्मरणीय असा आहे.
10 years with Team India, 10 years playing for my country – there has been no greater honour. Representing my nation has given me memories for a lifetime, that I am always grateful for ? ?? pic.twitter.com/8ULk1gHgpZ
— Shikhar Dhawan (@SDhawan25) October 20, 2020
संबंधित बातम्या :
IPL 2020, SRH vs KKR : डेव्हिड वॉर्नरच्या आयपीएलमध्ये वेगवान 5 हजार धावा, विराट कोहलीला पछाडलं
Shikhar Dhawan Became The Fifth Batsman To Complete 5000 Runs In The IPL