IPL 2020, SRH vs DC : सनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी शानदार विजय

दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग तिसरा पराभव ठरला.

IPL 2020, SRH vs DC : सनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी शानदार विजय
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 11:21 PM

दुबई : सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 88 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 220 धावांचे आव्हान दिले होते. मात्र दिल्लीला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आले नाही. दिल्लीचा डाव 131 धावांवरच आटोपला. दिल्लीकडून ऋषभ पंतने 36 धावा केल्या. तर हैदराबादकडून रशिद खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची खराब सुरुवात झाली. सातत्याने चांगली कामगिरी करणारा शिखर धवन आज शून्यावर आऊट झाला. त्यानंतर दिल्लीला दुसरा धक्का 14 धावांवर लागला. मार्कस स्टोइनिस 5 धावांवर बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिमरॉन हेटमायरने दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 40 धावा जोडल्या. मात्र रशिद खानने दिल्लीला 54 धावांवर तिसरा धक्का दिला. शिमरॉन हेटमायर 16 धावांवर बाद झाला. हेटमायर मागोमाग रशिदने रहाणेला बाद केले. त्यामुळे दिल्लीची स्थिती 55-4 अशी स्थिती झाली. यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने दिल्लीला झटके दिले. दिल्लीकडून ऋषभ पंतने 35 चेंडूत 36 धावांची खेळी केली. त्याने यामध्ये 3 फोर आणि 1 सिक्स लगावला. दिल्लीच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

हैदराबादकडून रशिद खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर थंगारसु नटराजन आणि संदीप शर्मा या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर शहाबाज नदीम, जेसन होल्डर आणि विजय शंकर या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडले. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 219 धावा केल्या. हैदराबादकडून ऋद्धीमान साहाने 45 चेंडूत 12 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने धमाकेदार 87 धावा केल्या. तर कर्णधार बर्थडे बॉय डेव्हिड वॉर्नरने 34 चेंडूत तडाखेदार 66 धावा केल्या. यामध्ये त्यानी 8 फोर आणि 2 सिक्स लगावले. तर मनिष पांडेने नाबाद 44 तर केन विलियम्सनने नाबाद 11 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नोर्तजे आणि रवीचंद्रन आश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतला. IPL 2020 SRH vs DC Live Score Update Today Cricket Match Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals लाईव्ह स्कोअरकार्ड

[svt-event title=”हैदराबादचा शानदार विजय” date=”27/10/2020,11:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला नववा धक्का” date=”27/10/2020,10:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला आठवा झटका” date=”27/10/2020,10:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला सातवा धक्का” date=”27/10/2020,10:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला सहावा झटका” date=”27/10/2020,10:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला पाचवा धक्का” date=”27/10/2020,10:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”9 ओव्हरनंतर दिल्ली” date=”27/10/2020,10:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हेटमायर पाठोपाठ अंजिक्य रहाणे आऊट, दिल्लीला चौथा धक्का” date=”27/10/2020,10:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला तिसरा धक्का, शिमरॉन हेटमायर आऊट” date=”27/10/2020,10:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर दिल्ली” date=”27/10/2020,9:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”5 ओव्हरनंतर दिल्ली” date=”27/10/2020,9:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला दुसरा धक्का” date=”27/10/2020,9:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला पहिला धक्का” date=”27/10/2020,9:24PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात” date=”27/10/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 220 धावांचे आव्हान” date=”27/10/2020,9:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादच्या 200 धावा पूर्ण” date=”27/10/2020,8:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला दुसरा धक्का” date=”27/10/2020,8:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”27/10/2020,8:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”13 ओव्हरनंतर हैदराबाद” date=”27/10/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”11 ओव्हरनंतर हैदराबाद” date=”27/10/2020,8:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Iऋद्धीमान साहाचे अर्धशतक” date=”27/10/2020,8:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कर्णधार डेव्हिड वॉर्नर आऊट” date=”27/10/2020,8:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वॉर्नर-साहा सलामी जोडीची शतकी भागीदारी ” date=”27/10/2020,8:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची शानदार सुरुवात” date=”27/10/2020,8:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे 25 चेंडूत धमाकेदार अर्धशतक” date=”27/10/2020,7:59PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर हैदराबाद” date=”27/10/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादच्या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी ” date=”27/10/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 1 ओव्हरनंतर” date=”27/10/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात” date=”27/10/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असे आहेत दोन्ही संघ” date=”27/10/2020,7:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली प्लेइंग इलेव्हन” date=”27/10/2020,7:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असा आहे हैदराबादचा संघ” date=”27/10/2020,7:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीने टॉस जिंकला ” date=”27/10/2020,7:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

दिल्लीला प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. दिल्लीचा मागील दोन सामन्यात पराभव झाला आहे. कोलकाता आणि पंजाबने दिल्लीला पराभूत केलं आहे. त्यामुळे दिल्ली हैदराबादविरुद्धचा सामना जिंकून प्ले ऑफमधील स्थान कायम करण्याचा प्रयत्नात असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादची प्ले ऑफमध्ये पोहचण्याची शक्यता जर तरची आहे.

हैदराबाद दिल्लीवर वरचढ

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत हैदराबाद आणि दिल्ली एकूण 16 सामन्यात आमनेसामने आले आहेत. यामध्ये हैदराबादचा वरचष्मा राहिला आहे. हैदराबादने 16 पैकी 10 सामन्यात दिल्लीवर विजय मिळवला आहे. तर दिल्लीला 6 मॅच जिंकता आल्या आहेत. दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये 14 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबाद पॉइंट्सटेबलमध्ये 8 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), कगिसो रबाडा, मार्कस स्टोयनिस, संदीप लामिछाने, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, अमित मिश्रा, एनरिच नोर्तजे आणि डॅनियल सॅम्स

सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कप्तान), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनिष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन अॅलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी.

संबंधित बातम्या :

IPL 2020, DC vs SRH : दिल्लीच्या विजयाचा रथ सनरायजर्स हैदराबादने रोखला, 15 धावांनी दिल्लीचा पराभव

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

IPL 2020 SRH vs DC Live Score Update Today Cricket Match Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.