IPL 2020, SRH vs KXIP Live : पंजाबचा सलग चौथा पराभव, सनरायजर्स हैदराबादची 69 धावांनी मात

या विजयासह सनरायजर्स हैदराबाद पॉइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. (Sunrisers Hyderabad Beat Kings Eleven Punjab By 69 runs)

IPL 2020, SRH vs KXIP Live : पंजाबचा सलग चौथा पराभव, सनरायजर्स हैदराबादची 69 धावांनी मात
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 11:59 PM

दुबई : सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punjab) 69 धावांनी पराभव केला आहे. हैदराबादने पंजाबला विजयासाठी 202 धावांचे आव्हान दिले होते. मात्र पंजाबने सर्वबाद 132 धावा केल्या. पंजाबला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आले नाही. पंजाबला फक्त 16.5 ओव्हरच खेळता आले. पंजाबकडून (Nicholas Pooran) निकोलस पूरनने धडाकेबाज 77 धावांची झुंजार खेळी केली. पूरनचा अपवाद वगळता इतर कोणत्याही खेळाडूला विशेष कामगिरी करता आली नाही. पंजाबच्या 3 खेळाडूंना भोपळा फोडण्यास अपयश आले. तसेच 5 खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. हैदराबादकडून रशिद खानने (Rashid Khan) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. पंजाबचा हा सलग चौथा पराभव ठरला. (Sunrisers Hyderabad Beat Kings Eleven Punjab By 69 runs) लाईव्ह स्कोअरकार्ड

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या पंजाबची सुरुवातच निराशाजनक झाली. पंजाबला पहिला धक्का मयंक अगरवालच्या रुपात लागला. मयंक 9 धावांवर रनआऊट झाला. यानंतर पंजाबने ठराविक अंतराने विकेट्स गमावले. सिमरन सिंह 11 धावांवर आऊट झाला. त्यानंतर कर्णधार लोकेश राहुलला आज विशेष काही करता आले नाही. लोकेशही 11 रन्सवर कॅचआऊट झाला.

निकोलस पूरनने पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने फटकेबाजी केली. 17 चेंडूत तडाखेबाज अर्धशतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला चांगली साथ मिळाली नाही. एका बाजूला विकेट जात होते. मात्र पूरन मैदानात ऊभा होता. मात्र एकामागोमाग विकेट गेले. निकोलस पूरनही बाद झाला. पंजाबकडून सर्वाधिक 77 धावांची झुंजार खेळी पूरनने केली. हैदराबादकडून रशिद खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर खलिल अहमद आणि थंगारसु नटराजन या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेत रशिदला चांगली साथ दिली. तर अभिषेक शर्माने कर्णधार राहुलची महत्वपूर्ण विकेट घेतली.

दरम्यान त्याआधी हैदराबादने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य ठरवला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (Dawid Warner) आणि जॉनी बेयरिस्टो (Johny Bairstow) या सलामी जोडीने हैदाराबादला धमाकेदार सुरुवात दिली. या सलामी जोडीने दीडशतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 160 धावा जोडल्या. या दरम्यान दोघांनी आपले अर्धशतक पूर्ण केले.

ही जोडी तोडायला पंजाबच्या रवी बिश्नोईला यश आले. बिश्नोईने कर्णधार वॉर्नरला 52 धावांवर बाद केले. यानंतर लगेचच जॉनी बेयरिस्टो आऊट झाला. तो नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. अवघ्या 3 धावांनी त्याचे शतक हुकले. बेयरिस्टोला 97 धावांवर रवी बिश्नोईने एलबीडब्ल्यू आऊट केले. बेयरिस्टोने या खेळीत 6 सिक्स आणि 7 फोर लगावले.

सलामी जोडी माघारी गेल्यानंतर हैदराबादचा डाव गडगडला. हैदराबादने एकामागोमाग विकेट्स गमावले. पंजाबच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादने लोटांगण घातलं. यामुळे हैदराबादची स्थिती 160/2 वरुन 199/6 अशी झाली. पंजाबच्या गोलंदाजांना हैदराबादला 201 धावांवर रोखण्यास यश आले. हैदराबादला 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 201 धावा केल्या. पंजाबकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंहने 2 तसेच मोहम्मद शमीने 1 विकेट घेत बिश्नोईला चांगली साथ दिली.

[svt-event title=”हैदराबादचा पंजाबवर 69 धावांनी विजय” date=”08/10/2020,11:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मोहम्मद शमी आऊट” date=”08/10/2020,11:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निकोलस पूरन आऊट, पंजाबच्या विजयाच्या आशा मावळल्या ” date=”08/10/2020,11:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 14 ओव्हरनंतर” date=”08/10/2020,11:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला सहावा धक्का” date=”08/10/2020,11:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला पाचवा झटका” date=”08/10/2020,10:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पूरन-मॅक्सवेल जोडी फुटली ” date=”08/10/2020,10:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबचा 10 ओव्हरनंतर स्कोअर” date=”08/10/2020,10:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निकोलस पूरनचे दमदार अर्धशतक ” date=”08/10/2020,10:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लोकेश राहुल बाद, पंजाबला तिसरा धक्का” date=”08/10/2020,10:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबचा 5 ओव्हरनंतर स्कोअर” date=”08/10/2020,10:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबचा दुसरा गडी बाद” date=”08/10/2020,10:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबची खराब सुरुवात, मयंक अगरवाल धावबाद” date=”08/10/2020,9:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला विजयासाठी 202 धावांचे आव्हान” date=”08/10/2020,9:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 20 ओव्हरनंतर” date=”08/10/2020,9:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला सहावा धक्का” date=”08/10/2020,9:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला पाचवा झटका” date=”08/10/2020,9:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला चौथा धक्का, अब्दुल समद बाद ” date=”08/10/2020,9:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मनिष पांडे आऊट, राजस्थानला तिसरा धक्का” date=”08/10/2020,9:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जॉनी बेयरस्टो बाद ” date=”08/10/2020,9:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”धमाकेदार सुरुवातीनंतर हैदराबादला पहिला धक्का” date=”08/10/2020,8:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 7 ओव्हरनंतर” date=”08/10/2020,8:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये हैदराबादच्या धावा” date=”08/10/2020,8:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची दमदार सुरुवात” date=”08/10/2020,7:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”डेव्हिड वॉर्नर-जॉनी बेयरस्टो जोडीची सलामी अर्धशतकी भागीदारी ” date=”08/10/2020,7:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बेयरस्टोचे 3 चौकार” date=”08/10/2020,7:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची सावध सुरुवात” date=”08/10/2020,7:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 2 ओव्हरनंतर” date=”08/10/2020,7:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात” date=”08/10/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”08/10/2020,7:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबचे 11 शिलेदार” date=”08/10/2020,7:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचे अंतिम 11 खेळाडू” date=”08/10/2020,7:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला” date=”08/10/2020,7:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

किंग्जस इलेव्हन पंजाबचा खेळलेल्या 5 पैकी 4 सामन्यात पराभव झालाय. त्यामुळे पंजाब पॉइंट्सटेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादने 5 सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय तर 3 सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे हैदराबाद 4 पॉइंट्ससह 6 व्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांना आयपीएलच्या यंदाच्या पर्वात विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात नक्की कोणता संघ वरचढ ठरतो, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.

हैदराबाद पंजाबवर वरचढ

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत पंजाब आणि हैदराबादचा एकूण 14 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये हैदराबादचा वरचष्मा राहिला आहे. हैदराबादने 10 सामन्यात पंजाबवर मात केली आहे. तर केवळ 4 सामन्यात पंजाबला विजय मिळवता आला आहे.

सनराइजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप, संजय यादव, फॅबियन एलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टैनलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी

किंग्स इलेवन पंजाब : केएल राहुल(कर्णधार), मयंक अगरवाल, शेल्डन कॉट्रेल, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स नीशाम, निकोलस पूरन, ईशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णप्पा गौतम, हरप्रीत बराड, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकांडे, रवि बिश्नोई, सिमरन सिंह, जगदीश सुचित, तजिंदर सिंह आणि हार्डस विलोजेन.

संबंधित बातम्या :

IPL 2020, CSK vs KKR : कोलकात्याचा ‘सुपर’ विजय, चेन्नईचा 10 धावांनी पराभव

IPL 2020 : ‘या’ कारणांमुळे Rajasthan Royals ची पिछेहाट; कर्णधार स्मिथचं स्पष्टीकरण

IPL 2020 : कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतरही विक्रम, विकेटकीपर म्हणून सर्वाधिक झेलचा विक्रम धोनीच्या नावे

(Sunrisers Hyderabad Beat Kings Eleven Punjab By 69 runs)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.