IPL 2020 : हैदराबादच्या ताफ्यातील नव्या यॉर्कर किंगचा उदय, थंगारासू नटराजनने ट्रेन्ट बोल्ट, जेसन होल्डरला पछाडलं
थंगारासूने आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 16 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या.
दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad)विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली. दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे हैदराबादचे आव्हान संपुष्टात आले. मात्र या मोसमात आयपीएलमधील नव्या यॉर्कर किंगचा उदय झाला. हैदराबादच्या या गोलंदाजाने यॉर्करच्या बाबतीत जसप्रीत बुमराहसारख्या स्पेशालिस्ट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांना मागे टाकलंय. थंगारासू नटराजन (Thangarasu Natrajan) असं या गोलंदाजाचं नाव. थंगारासुने या मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. या मोसमात थंगारासू नवा यॉर्कर किंग म्हणून उदयास झाला. त्याने या मोसमात सर्वाधिक यॉर्कर टाकण्याचा विक्रम केला आहे. ipl 2020 sunrisers hyderabad bowler thangarsu natarajan new yorker king in ipl 13 season
सर्वाधिक यॉर्कर
थंगारासुने या मोसमात यॉर्कर बॉल टाकण्याच्या बाबतीत अनेक दिग्गज गोलंदाजांना मागे टाकलं. या मोसमात सर्वाधिक यॉर्कर टाकण्याचा विक्रम थंगारासुने आपल्या नावे केला आहे. थंगारासुने या मोसमात एकूण 54 वेळा यॉर्कर बॉल टाकला. सर्वाधिक वेळा यॉर्कर बॉल टाकण्याच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर जेसन होल्डर आणि ट्रेन्ट बोल्ट आहेत. होल्डरने या मोसमात एकूम 25 वेळा यॉर्कर बॉल टाकला आहे. तर ट्रेन्ट बोल्टने 22 वेळा यॉर्कर टाकण्याची किमया केली आहे.
माजी खेळाडूकडून कौतुक
टीम इंडियाच्या माजी खेळाडूने थंगारसूच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने ट्विट करत थंगारसूच्या या कामगिरीचं कौतुक केलंय. मी आतापर्यंत थंगारासूसारखा यॉर्कर टाकणारा आणखी दुसरा अनकॅप्ड गोलंदाज पाहिला नाही, अशा शब्दात इरफानने थंगारासूला शाबासकी दिलीय. अनकॅप्ड म्हणजे आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व न केलेला खेळाडू.
Never seen an uncapped fast bowler bowl as many perfect yorkers as #natarajan in the ipl. #bahotaalaa
— Irfan Pathan (@IrfanPathan) November 8, 2020
थंगारासूच्या या कामगिरीमुळे त्याची टीम इंडियासाठी निवड व्हावी, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे. जर जसप्रीत बुमराह आणि थंगारासू एकत्र आले, तर या दोघांच्या यॉर्करच्या कौशल्याचं टीम इंडियाला निश्चित फायदा होईल, असं मत क्रिकेट विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे.
थंगारासूने या मोसमातील एकूण 16 सामन्यात 8.19 च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट्स घेतल्या. थंगारसूसाठी ही कामगिरी महत्वपुर्ण ठरली. कारण थंगारसू दुखापतीमुळे 2 वर्षाच्या अंतराने आयपीएलमध्ये पुनरागमन केलं. तसेच थंगारसुने भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत हैदराबादच्या गोलंदाजाची सार्थपणे जबाबदारी पार पाडली. थंगारसूने डेथ ओव्हर्समध्ये (सामन्यातील शेवटची काही षटक) चांगली गोलंदाजी केली.
दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी थंगारसूला टीम इंडियामध्ये राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं आहे. टीम इंडिया आयपीएल समाप्तीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 2 महिन्याचा हा दौरा असणार आहे.
संबंधित बातम्या :
PHOTO | एकीकडे विजयाचा जल्लोष, दुसरीकडे पुत्रप्राप्तीचा आनंद, हैदराबादचा गोलंदाज बाबा बनला
India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर
ipl 2020 sunrisers hyderabad bowler thangarsu natarajan new yorker king in ipl 13 season