Super Over | मुंबई-पंजाबची सुपर ओव्हरही टाय, सुपर ओव्हरबद्दल रंजक गोष्टी, 47 वेळा पाठलाग करणाऱ्यांचा विजय
आयपीएलच्या 13 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 4 सुपर ओव्हर मॅच खेळण्यात आल्या आहेत.
मुंबई : क्रिकेटमधील झटपट प्रकार म्हणजेच टी-20. टी-20 क्रिकेट मधील अनेक सामने हे चुरशीचे तसेच अटीतटीचे होतात. टी 20 सामना बरोबरीत सुटल्यावर सुपर ओव्हर (Super Over) खेळवून निर्णय लावला जातो. आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) 18 ऑक्टोबरला 2 सामने खेळण्यात आले. या डबल हेडरमधील पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळला गेला. हा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सुपर ओव्हर खेळण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा विजय झाला. ipl 2020 t 20 cricket a total of 91 matches have been played in super overs
यानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध किंग्जस इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हर खेळण्यात आली. सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली. त्यामुळे अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा विजय झाला. त्यामुळे 24 तासांमध्ये तब्बल 3 सुपर ओव्हर सामने खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यामुळे रविवारी क्रिकेट चाहत्यांना सुपर डुपर सामन्यांचा आनंद घेता आला. या सुपर ओव्हर बद्दल आपण काही रंजक माहिती जाणून घेणार आहोत.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सुपर ओव्हर बरोबरीत सुटण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला.
तसेच आयपीएलमध्ये एका मोसमात 4 सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. आता आणखी काही सामने खेळायचे आहेत. त्यामुळे क्रिकेटचाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळू शकतो.
मुंबई इंडियन्सला सुपर ओव्हर स्पेशालिस्ट टीम समजलं जातं. याआधीच्या मोसमात मुंबईने खेळलेले सुपर ओव्हरमधील बहुतांश सामने जिंकले आहेत. मात्र मुंबईला यंदाच्या मोसमात सुपर ओव्हरमध्ये जिंकता आले नाही. मुंबईने यंदाच्या मोसमात बंगळुरु 1 आणि पंजाबविरुद्ध 2 असे एकूण 3 सुपर ओव्हर सामने खेळले आहेत.
टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 91 सुपर ओव्हर सामने खेळण्यात आले आहेत. या 91 सुपर ओव्हर सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा 44 वेळा विजय झाला आहे. तर 47 वेळा विजयी आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे.
यंदाच्या मोसमात 4 सुपर ओव्हर
आयपीएलच्या यंदाच्या म्हणजेच 13 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 4 सुपर ओव्हर सामने खेळले गेले. पहिला सुपर ओव्हर सामना किंग्जस इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. यामध्ये दिल्ली विजयी राहिली. दुसरा सुपर ओव्हर सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळण्यात आला. या सुपर ओव्हरमध्ये बंगळुरुने मुंबईचा पराभव केला. तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये कोलकाता विरुद्ध हैदराबाद आमनेसामने होते. यामध्ये कोलकाताने हैदराबादचा धुव्वा उडवला. तर चौथा आणि अखेरची सुपर ओव्हर मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यात खेळली गेली. यामधील दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा विजय झाला.
संबंधित बातम्या :
IPL 2020, MI vs KXIP, Super Over : ‘डबल धमाल’, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय
IPL 2020, SRH vs KKR Super Over : सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय
ipl 2020 t 20 cricket a total of 91 matches have been played in super overs