IPL 2020 | ‘आयपीएल 2020’ यूएईमध्ये रंगणार, तारखांची घोषणा

बीसीसीआय'ने 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल 2020 खेळवण्याचे निश्चित केले.

IPL 2020 | 'आयपीएल 2020' यूएईमध्ये रंगणार, तारखांची घोषणा
Follow us
| Updated on: Jul 24, 2020 | 1:31 PM

मुंबई : आयपीएल 2020 चा 13 वा मौसम यूएईमध्ये खेळवला जाणार आहे. ‘बीसीसीआय’ने 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल 2020 खेळवण्याचे निश्चित केले. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी तारखांची घोषणा केली, मात्र सरकारची मंजुरी प्रलंबित असल्याची माहिती आहे. (IPL 2020 to be held from September 19 to November 8 in UAE says Brijesh Patel)

आयपीएलचं बिगुल 19 सप्टेंबर म्हणजे आजपासून बरोबर 57 दिवसांनी वाजणार आहे. आयपीएलमधील सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजता (यूएईच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता) सुरू होण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे आयपीएलची संपूर्ण टुर्नामेंट रंगणार आहे.  क्रिकेटपटूना कमी थकवा, तर ब्रॉडकास्टरना अधिक कमाईसाठी उपयुक्त असतील, ब्रिजेश पटेल म्हणाले.

“विविध भागधारकांशी सल्लामसलत करुन, आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करुन आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्हाला सरकारकडून अधिकृत प्रतिसाद मिळाल्यानंतर औपचारिकरित्या प्रशासकीय समिती बोलविली जाईल. पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला हे होईल, अशी आम्हाला आशा आहे” असे ब्रिजेश पटेल म्हणाले.

‘आयपीएल 2020’ साठी यूएईच का?

भारताला कोरोनाचा मोठा फटका बसला असून बहुतांश शहरांना त्यातून सावरण्यासाठी मोठा काळ लागू शकतो, या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने ‘आयपीएल 2020’ भारताबाहेर नेण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या.

यूएईमध्ये क्वारंटाईनचे नियम कडक नाहीत, तेथील बाजारपेठा आणि मॉल्स आधीच खुले झाले आहेत. कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थिती आहे आणि पर्यटकांचेही स्वागत केले जात आहे. त्यातच यूएईमध्ये आयपीएल खेळवण्यास विरोध करणाऱ्या जनहित याचिकाही स्थानिक कोर्टात दाखल होण्याची चिन्हं कमी आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

यंदाच्या आशिया चषकाचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दिली होती.

क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली टी20 लीग ‘आयपीएल 2020’ मार्चपासून सुरु होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा हा ‘सण’ दोन  महिन्यात भेटीला येत आहे. (IPL 2020 to be held from September 19 to November 8 in UAE says Brijesh Patel)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.