IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातून 10 स्टार खेळाडूंची तडकाफडकी माघार, एका भारतीयाचाही समावेश, काय आहे कारण?

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासात आतापर्यंत इतक्या खेळाडूंनी कधीच माघार घेतली नव्हती.

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातून 10 स्टार खेळाडूंची तडकाफडकी माघार, एका भारतीयाचाही समावेश, काय आहे कारण?
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासात आतापर्यंत इतक्या खेळाडूंनी कधीच माघार घेतली नव्हती.
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 4:16 PM

मुंबई : कोरोना विषाणूनंतर 2 वर्षांनी (Corona Virus) आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं (Indian Premier League) भारतात आयोजन करण्यात आलं. आयोजकांकडून सर्व खबरदारी घेऊन या मोसमाचं आयोजन करण्यात आलं आहे. खेळाडूंना कोणतीही बाधा होऊ नये, यासाठी बायो बबलची व्यवस्था करण्यात आली. मात्र त्यानंतरही या 14 व्या हंगामातून वेगवेगळ्या संघांच्या एकूण 10 खेळाडूंनी विविध कारणांमुळे तडकाफडकी माघार घेतली आहे. (ipl 2021 10 players withdrew from the 14th season of indian premier league due to personal reasons corona and bio bubble)

काय आहे कारण?

महाराष्ट्रासह देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दररोज देशात लाखोंमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे खेळाडूंना सुरक्षिततेसाठी बायो बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र या बायो बबलमध्ये राहणं खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरत आहे. तसेच याचा परिणाम थेट खेळाडूंच्या मानसिकतेवर होत असल्याचंही काही खेळाडूंच म्हणंन आहे. यामुळे या 10 खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे तसेच दुखापतीमुळे या हंगामातून माघार घेतली आहे.

खेळाडूंची नावं

विशेष म्हणजे माघार घेतलेल्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. तर टीम इंडियाचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन हा एकमेव भारतीय आहे. खेळाडूंनी दुखापतीमुळे, वैयक्तिक कारणांमुळे तसेच बायो बबलमधील वातावरणामुळे माघार घेतली आहे.

जोफ्रा आर्चर (Jofra Archer), बेन स्‍टोक्‍स (Ben Stokes), लियाम लिविंगस्‍टोन (Liam Livingstone) अँड्रयू टाय (Andrew Tye), सनरायजर्स हैदराबादचा मिचेल मार्श (Mitchell Marsh), चेन्‍नई सुपर किंग्‍सचा जोश हेजलवुड (Josh Hazlewood), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा जोश फिलिप (Josh Phillipe), केन रिचर्डसन (Kane Richardson), अॅडम जैम्‍पा (Adam Zampa) आणि दिल्‍ली कॅपिट्ल्‍सचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनचा (Ravichandran Ashwin) समावेश आहे.

आयपीएलमधून माघार घेतलेले खेळाडू

1.  मिचेल मार्श : डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात मिचेल मार्श सनरायजर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करतो. मार्शने बायो बबलमधील थकावटीचं कारण देत मोसमाच्या सुरुवातीआधीच माघार घेतली होती.

2. जोश हेझलवुड : ऑस्‍ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करतो. हेझलवूडने मार्शप्रमाणे हंगामाच्या काही दिवसांपूर्वी आपलं नाव मागे घेतलं होतं. हेझलवूडनेही बायो बबलचं कारण दिलं होतं.

3. जोश फिलिप : ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर फलंदाज जोश फिलीपने मागील मोसमात बंगळुरुकडून शानदार कामगिरी केली होती. मात्र त्याने यावेळेस वैयक्तिक कारणामुळे आपलं नाव मागे घेतलं आहे.

4. बेन स्‍टोक्‍स : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स. स्टोक्स आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्समधून खेळतो. मात्र स्टोक्सला या 14 व्या पर्वातील पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. या दुखापतीमुळे स्टोक्सला माघार घ्यावी लागली. त्यामुळे स्टोक्सला मैदानात कमॅबक करण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.

5. जोफ्रा आर्चर : इंग्लंडचा वेगवान बोलर आणि राजस्‍थान रॉयल्‍सचा हुकमाचा एक्का म्हणजे जोफ्रा आर्चर. आर्चरला या मोसमात एकही सामना खेळता आला नाही. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकेदरम्यान आर्चरला दुखापत झाली होती. यातून आर्चर अखेरपर्यंत सावरला नाही. दुखापतीतून पूर्ण पणे फिट न झाल्याने परिणामी आर्चरला आपलं नाव मागे घ्यावे लागले.

6. लियाम लिविंगस्‍टोन : इंग्लंडचा खेळाडू आणि राजस्थान रॉयल्सचा फलंदाज लियाम लिविंगस्टोनने बायो बबलमधील वातावरणामुळे माघार घेतली आहे.

7. रवीचंद्रन अश्विन : टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आणि दिल्‍ली कॅपिटल्‍सचा प्रमुख शिलेदार रवीचंद्रन अश्विन. अश्विन या मोसमातून माघार घेणारा एकमेव भारतीय आहे. अश्विनचे कुटुंबिय आणि नातेवाईकांचा कोरोनासोबत संघर्ष सुरु आहे. अशा वेळात आपण आपल्या जवळच्या व्यक्तिंसोबत असायला हंव, या हेतूने अश्विनने माघार घेतली आहे.

8. अँड्रयू टाय : ऑस्‍ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्रयू टायने वैयक्तिक कारणाने आयपीएलमधून माघार घेतल्याचं सांगितलं आहे.

9. केन रिचर्डसन : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू केन रिचर्डससने वैयक्तिक कारण सांगत माघार घेतली आहे.

10. अ‍ॅडम झॅम्‍पा : विराट कोहलीच्या नेतृत्वात अ‍ॅडम झॅम्‍पा बंगळुरुकडून खेळतो. पण झॅम्‍पाने वैयक्तिक कारण देत माघार घेतली आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2021 : आर अश्विनचा आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय, ट्विट करुन घोषणा, दिल्लीला धक्का!

IPL 2021: परदेशी खेळाडूंची माघार, अश्विनची एक्झिट; कोरोनामुळे आयपीएल स्पर्धेवर परिणाम होणार का?

(ipl 2021 10 players withdrew from the 14th season of indian premier league due to personal reasons corona and bio bubble)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.