IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?
आयपीएलचा 13 वा मोसम अंतिम टप्प्यात पोहचला आहे.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमांचं आयोजन यूएईत केलं गेलं. शारजा, अबुधाबी आणि दुबई येथे साखळी फेरीतील सामन्यांचे आयोजन करण्यात आलं. आयपीएलचा 13 वा मोसम अंतिम टप्प्यात पोहचला आहे. प्ले ऑफ सामन्यांना आजपासून (5 नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. तर अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. अशातच आता आयपीएलच्या 14 व्या मोसमाबद्दल (IPL 2021) महत्वाची माहिती समोर येत आहे. याबाबत बीसीसीआयचा अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने (Saurav Ganguly) माहिती दिली आहे. ipl 2021 indian premier league 14th season will start in 4 months
आयपीएल भारतात होणार : गांगुली
“सालाबादप्रमाणे आयपीएल स्पर्धेचं आयोजन मार्च ते मे दरम्यान केलं जातं. मात्र यंदा कोरोनामुळे स्पर्धा काही महिने पुढे ढकलावी लागली. तसेच धोका टाळण्यासाठी यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं. मात्र आयपीएलच्या पुढील मोसमाचं म्हणजेच IPL 2021 चं आयोजन भारतात होईल”, असा आशावाद गांगुलीने व्यक्त केला आहे.
गांगुली काय म्हणाला?
“आयपीएलच्या 14 व्या मोसमापर्यंत कोरोनाची लस येईल, अशी आशा करुयात. असं झाल्यास आपण आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजन नक्कीच भारतात करु. तसं शक्य न झाल्यास आपल्याकडे यूएईचा पर्याय उपलब्ध आहे”, असं गांगुली म्हणाला.
पुढील आयपीएल स्पर्धा 4 महिन्यानंतर
साधारणपणे 1 वर्षाच्या अंतराने आयपीएल स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. मात्र कोरोनामुळे यंदा आयपीएल स्पर्धा 5 महिन्याच्या विलंबाने सुरु झाली. त्यामुळे जर आयपीएलच्या पुढील हंगामाला नेहमीप्रमाणे सुरुवात झाली, तर क्रिकेटप्रेमींना पुढील 4 महिन्यांनी पुन्हा आयपीएलचा आनंद घेता येणार आहे. जर असं झालं तर आयपीएलच्या 14 व्या पर्वाला मार्चपासून सुरुवात होऊ शकते.
प्ले ऑफ स्पर्धेला सुरुवात
आयपीएलच्या 13 व्या मोसमातील प्ले ऑफ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. या प्ले ऑफमध्ये आज क्वालिफायर 1 मॅच खेळण्यात येणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे.
A look at the Road To The Final for #Dream11IPL 2020 pic.twitter.com/Zrz7Su7qa4
— IndianPremierLeague (@IPL) November 3, 2020
असे आहे प्ले-ऑफचे वेळापत्रक
क्वालिफायर 1 – 5 नोव्हेंबर (दुबई) एलिमिनेटर- 6 नोव्हेंबर (अबुधाबी) क्वालिफायर 2- 8 नोव्हेंबर (अबुधाबी) फायनल-10 नोव्हेंबर (दुबई)
संबंधित बातम्या :
IPL 2020 | बीसीसीआयकडून प्ले-ऑफचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ ठिकाणी होणार अंतिम सामना
IPL 2020 : Qualifier सामन्यात कांटे की टक्कर, मुंबई-दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्ये ‘या’ खेळाडूंना संधी
ipl 2021 indian premier league 14th season will start in 4 months