IPL 2021 : रवींद्र जाडेजा CSK च्या कॅम्पमध्ये दाखल, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता!
खापतीमुळे बर्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर असलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) कॅम्पमध्ये दाखल झाला आहे.
मुंबई : दुखापतीमुळे बर्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर असलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. अंगठ्याच्या दुखापतीतून सावरत जडेजा मुंबईत सुरु असलेल्या चेन्नईच्या शिबिरात दाखल झाला. (IPL 2021 Ravindra jadeja Join Csk Camp)
जाडेजा CSK च्या कॅम्पमध्ये दाखल
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांच्या अधीन राहून तो 7 दिवस दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये अलगीकरणात राहणार आहे. यावर्षी जानेवारीत झालेल्या सिडनी कसोटी सामन्यात जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्यांच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया झाली, ज्यामुळे तो मागील काही महिने क्रिकेट खेळू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या मायदेशात चाललेल्या मालिकेतही त्याने सहभाग घेतला नाही.
या दुखापतीमुळे एकावेळी त्याच्या आयपीएलमध्ये सहभागाबद्दलही शंका निर्माण झाली होती. परंतु काल त्याने मुंबईतल्या चेन्नईच्या कॅम्पमध्ये सहभाग नोंदवला. रवींद्र जडेजाने मुंबईतील चेन्नईच्या शिबिरात जाण्यापूर्वी बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव केला. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांच्या म्हणण्यानुसार, “जाडेजाचा फॉर्म चांगला असून दुखीपतीनंतर आयपीएलमध्ये पहिला सामना खेळेल, असा त्याला विश्वास आहे.
चेन्नईचा उपकर्णधार कोण?
आयपीएल 2021 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जसमोर सर्वात मोठा प्रश्न संघाचा उपकर्णधार कोण? आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून संघाच्या उप-कर्णधारपदाची भूमिका बजावत असलेला सुरेश रैना या हंगामात अद्याप त्याच्या नावाला फ्रँचायझीने मान्यता दिलेली नाही. अशा परिस्थितीत रविंद्र जडेजाची सीएसकेचा नवा उप-कर्णधार म्हणून नियुक्ती होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांच्या म्हणण्यानुसार, “रैनाला अद्याप त्याचं जुनं स्थान देण्यात आलेलं नाही. जेव्हा टूर्नामेंट जवळ येईल तेव्हा आम्ही उप-कर्णधाराच्या नावाची घोषणा करू.”
आयपीएलचा थरार 9 एप्रिलपासून…
आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स (Muambai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals challengers banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
हे ही वाचा :