IPL 2021 : डिव्हिलियर्सची दिल्लीविरुद्ध तुफानी खेळी, डेव्हिड वॉर्नर म्हणतो, ‘माझा आयडॉल…!’

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला (David Warner) एबीच्या खेळीमुळे अत्यानंद झाला. 'दिग्गज माझा आयडॉल...' असं म्हणत त्याने एबीबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त केलं. (IPL 2021 RCB vs DC David Warner Comment on Ab De villiers Fantastic Inning)

IPL 2021 : डिव्हिलियर्सची दिल्लीविरुद्ध तुफानी खेळी, डेव्हिड वॉर्नर म्हणतो, 'माझा आयडॉल...!'
डिव्हिलियर्सच्या खेळीवर वॉर्नरची खास कमेंट...
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 7:09 AM

अहमदाबाद :  रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC ) या संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात बंगळुरुच्या ए बी डिव्हिलियर्सने (Ab De Villiers) दिल्लीच्या बोलिंगची पिटाई केली. त्याने केवळ 42 चेंडूत 75 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीने हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला (David Warner) अत्यानंद झाला. ‘दिग्गज माझा आयडॉल…’ असं म्हणत त्याने एबीबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त केलं. (IPL 2021 RCB vs DC David Warner Comment on Ab De villiers Fantastic Inning)

डिव्हिलिर्सची शानदार खेळी, आयपीएलमध्ये 5000 रन्स पूर्ण

बंगळुरुच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल लवकर तंबूत परतले. 60 रन्सवर तीन विकेट, अशी बंगळुरुची अवस्था झाली होती, त्यावेळी डिव्हिलियर्सने बॅटिंग करायला मैदानावर पाय ठेवला. त्याने बंगळुरुच्या डावाला आकार दिला. केवळ 42 चेंडूत त्याने शानदार 75 रन्सची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि उत्तुंग 5 षटकार लगावले. डिव्हिलियर्सच्या खेळीमुळे बंगळुरुला 172 धावा करता आल्या.

डिव्हिलियर्सच्या खेळीवर वॉर्नरचं ट्विट

ए बी डिव्हिलियर्सने दिल्लीविरोधात शानदार खेळी करत आयपीएल कारकीर्दीतील 5 हजार रन्स पूर्ण केले. त्याने ही कमाल 161 डावांत केली. डेव्हिड वॉर्नर नंतर दुसरा परदेशी खेळाडू ज्याने हा रेकॉर्ड केला. वॉर्नरने देखील एबीच्या डावाने गहिवरला. त्याने ट्विट करत एबीच्या खेळीचं कौतुक केलं. ‘लिजेंड, माय आयडॉल’, असं म्हणत त्याने एबी डिव्हिलियर्स प्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला.

बंगळुरुचा दिल्लीवर केवळ 1 रन्सने विजय

बंगळुरु विरुद्ध दिल्ली या तुल्यबळ सामन्यात बंगळुरुने दिल्लीवर अवघ्या एका रन्सने निसटता विजय मिळवला. बंगळुरुने डिव्हिलियर्सच्या खेळीच्या जोरावर दिल्लीला 172 धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु दिल्लीला निर्धारित 20 षटकांमध्ये 4 बाद 170 धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला 14 रन्सची गरज होती. मात्र मोहम्मद सिराजने टिच्चून बोलिंग केली. त्याने यॉर्कर खूप नजाकतीने टाकले. तरीही पंतने त्याला दोन चौकार ठोकले. अखेर दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये 12 रन्सच करता आल्या. शेवटी बंगळुरुचा 1 रन्सने विजय झाला. यावेळी रिषभ पंत खूपच निराश झाला होता तर विराटला गगनात आनंद मावत नव्हता.

(IPL 2021 RCB vs DC David Warner Comment on Ab De villiers Fantastic Inning)

हे ही वाचा :

DC vs RCB IPL 2021 Match 22 Result : थरारक सामन्यात विराटसेनेचा दिल्लीवर अवघ्या 1 धावेने विजय

Video : ‘बहुत तेज घुमाया ये तो….’ मॅक्सवेलचा षटकार पाहून रिषभ पंतलाही आश्चर्य, स्टम्पमागून हिंदी कॉमेन्ट्री!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.