Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Auction : पहिल्या दिवशीच्या लिलावानंतर जाणून घ्या संघांची स्थिती, किती खेळाडू घेतले, किती पैसे शिल्लक?

दिल्ली कॅपिटल्सने सर्वाधिक खेळाडूंची खरेदी केली तर मुंबई इंडियन्सने सर्वात कमी खेळाडू विकत घेतले. सर्वच संघांनी आपल्या प्लॅनिंगनुसार खेळाडूंवर बोली लावली. त्यात काही संघांना यश मिळालं तर काही संघांना माघार घ्यावी लागली. पहिल्या दिवशीच्या लिलावानंतर संघांची स्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

IPL 2022 Auction : पहिल्या दिवशीच्या लिलावानंतर जाणून घ्या संघांची स्थिती, किती खेळाडू घेतले, किती पैसे शिल्लक?
आयपीएल लिलाव
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 12:31 AM

मुंबई : आयपीएल – 2022 च्या महालिलावाचा (IPL 2022 Mega Auction) पहिला दिवस शनिवारी संपला. पहिल्या दिवशी एकूण 97 खेळाडूंवर बोली लागली. त्यात 23 खेळाडूंना खरेदीदार मिळाले नाही तर 74 खेळाडूंची खरेदी पार पडली. नेहमीप्रमाणे यावेळीही लिलावादरम्यान काही आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळाल्या. सर्वच संघांनी आपल्या रणनितीनुसार खेळाडूंची खरेदी केली. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) सर्वाधिक खेळाडूंची खरेदी केली तर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सर्वात कमी खेळाडू विकत घेतले. सर्वच संघांनी आपल्या प्लॅनिंगनुसार खेळाडूंवर बोली लावली. त्यात काही संघांना यश मिळालं तर काही संघांना माघार घ्यावी लागली. पहिल्या दिवशीच्या लिलावानंतर संघांची स्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

चेन्नई सुपरकिंग्स :

चेन्नई सुपकिंग्सने 10 खेळाडूंची खरेदी केली. त्यांच्याकडे आता 20 कोटी 45 लाख रुपये शिक्लक आहेत. या संघाने 2 परदेशी खेळाडूंची खरेदी केली आहे. या संघाकडे आता ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, मोइन अली, महेंद्र सिंह धोनी, रविंद्र जडेजा, दीपक चहर, ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा, केएम आसिफ, तुषार देशपांडे हे खेळाडू आहेत.

दिल्ली कॅपिटल्स :

दिल्ली कॅपिटल्सने 13 खेळाडूंची खरेदी केली आहे. त्यांच्याकडे आता 16 कोटी 50 लाख रुपये शिल्लक आहे. या संघाने 4 विदेशी खेळाडूंची खरेदी केली आहे. या संघात आता डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिशेल मार्श, ऋषभ पंत, सरफराज खान, केएस भरत, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, अश्विन हेब्बार हे खेळाडू असतील.

गुजरात टायटन्स :

या संघाने एकूण 10 खेळाडूंची खरेदी केली आहे. त्यांच्याकडे आता 18 कोटी 85 लाख रुपये शिल्लक आहेत. या संघाने 4 परदेशी खेळाडूंची खरेदी केली आहे. या संघाकडे आता शुभमन गिल, जेसन रॉय, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्यूसन, आर साई किशोर, नूर अहमद यांचा समावेश असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स :

पंजाब नाईट रायडर्सने शनिवारी 9 खेळाडूंची खरेदी केली. त्यांच्याकडे आता 12 कोटी 65 लाख रुपये शिल्लक आहेत. या संघाने 3 परदेशी खेळाडूंची खरेदी केली. या संघाकडे आता व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयश अय्यर, शेल्डन जॅक्सन, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती हे खेळाडू असणार आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स :

या संघाने शनिवारी एकूण 11 खेळाडूंची खरेदी करण्यात आली. त्यांच्याकडे आता 6 कोटी 90 लाख रुपये शिक्कल आहेत. त्यांनी 4 परदेशी खेळाडूंची खरेदी केली. या संघात आता केएल राहुल, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, रवि बिश्नोई, अवेस खान, मार्क वुड, अंकित राजपूत हे खेळाडू असतील.

मुंबई इंडियन्स :

मुंबई इंडियन्सने शनिवारी 8 खेळाडूंची खरेदी केली. या संघाकडे आता 27 कोटी 85 लाख लार रुपये शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्सने 2 विदेशी खेळाडूंची खरेदी केलीय. या संघात आता रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, कीरोन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, एम आश्विन, बासिल थंपी हे खेळाडू असतील.

पंजाब किंग्स :

पंजाब किंग्सने शनिवारी 11 खेळाडू खरेदी केली. या संघाकडे आता 28 कोटी 65 लाख रुपये शिल्लक आहेत. या संघाने दोन परदेशी खेळाडूंची खरेदी केली आहे. या संघात शिखर धवन, मयांक अग्रवाल, जॉनी बेयरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंह, शाहरुख खान, हरप्रीत बराड, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंह, ईशान पोरेल हे खेळाडू असतील.

राजस्थान रॉयल्स :

राजस्थान रॉयल्सने शनिवारी 11 खेडाळूंची खरेदी केली. त्यांच्याकडे आता 12 कोटी 15 लाख रुपये शिक्कल आहेत. या संघाने 3 विदेशी खेळाडूंची खरेदी केली. तर संघात आता देवदत्त पडिक्कल, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर आश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, केसी करियप्पा हे खेळाडू असतील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी 11 खेळाडूंची खरेदी केली. त्यांच्याकडे आता 9 कोटी 25 लाख रुपये शिल्लक आहेत. या संघाने 4 परदेशी खेळाडूंची खरेदी केली. त्यांच्याकडे आता फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वनिन्दू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज, आकाश दीप हे खेळाडू असतील.

सनरायजर्स हैदराबाद :

सनरायजर्स हैदराबाद या संघाने शनिवारी 13 खेळाडूंची खरेदी केली. त्यांच्याकडे आता 20 कोटी 15 लाख रुपये शिल्लक आहेत. या संघाने 2 विदेशी खेळाडू घेतले. तर आता या संघात अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन, निकोलस पूरन, प्रियम गर्ग, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जे सुचित, श्रेयश गोपाल, कार्तिक त्यागी, टी नटराजन आणि उमरान मलिक हे खेळाडू असतील.

इतर बातम्या :

IPL 2022 Auction Highest Paid Players: आजच्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू, या खेळाडूंचा 10 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश

IPL 2022 Auction: वेगवान गोलंदाजांसाठी फ्रेंचायजींनी खर्च केला पाण्यासारखा पैसा, कोण कुठल्या संघाकडून खेळणार जाणून घ्या…

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.