IPL 2022 points table मध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…
IPL 2022 points table: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) शनिवारी सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीच्या पाच सामन्यात दहा संघ परस्परांना भिडले. पाच दिवसात वेगवेगळे उत्कंठावर्धक सामने प्रेक्षकांना पहायला मिळाले.
मुंबई : क्रिकेट म्हटलं की कधी एखादा संघ पुढे असतो आणि कधीकधी एखादा संघ मागेही असतो. अशा परिस्थितीत लखनऊ सुर जायंट्सच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या (CSK) मोठ्या विजयानंतर गुणतालिकेचे गणित काय सांगते हा मोठा प्रश्न आहे. यात काही बदल आहे का? तर पहिल्या स्थानी असलेल्या संघाची स्थिती काय आहे? लखनऊने चेन्नईलाच हरवून काय फायदा झाला? किंवा सलग दुसऱ्या पराभवानंतर सीएसकेचे समीकरण काय आहे? 31 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (wankhede Stadium) खेळवल्या गेलेल्या सामन्यानंतर हे सर्व प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि त्यांची उत्तरे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलवर एक नजर टाकल्यास तुम्हालाही तुमच्या आवडीच्या खेळाडूविषयी जाणून घेता येईल, त्याच्या क्रिकेटमधील सहभागाविषयी देखील आपल्याला पाहता येईल.
धावसंख्येचा पाठलाग करताना संघर्ष
चेन्न्ई सुपर किंग्ज विरद्ध लखनऊ सुपर जायंट्सने 31 मार्चला खेळवलेला सामना 3 चेंडू बाकी असताना 6 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना सुपर किंग्जने 20 षटकांत 7 बाद 210 धावा केल्या. प्रत्युत्तरात सुपर जायंट्सने हे लक्ष्य 19.3 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएलमधील कोणत्याही संघाने दिलेला हा दुसरा सर्वोच्च पाठलाग आहे. सीएसके विरुद्ध सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे.
IPL पॉइंट टेबलची स्थिती
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
फक्त धावगतीत फरक
आता गुणसंख्येकडे येऊया. गुणसंख्येत लखनऊ सुपर जायंट्सच्या मोठ्या विजयाचा विशेष परिणाम झालेला नाही. राजस्थान रॉयल्स अजूनही अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्स त्याच्या अगदी मागे म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्ज आणि चौथ्या क्रमांकावर गुजरात टायटन्स आहे. या सर्व संघांनी आतापर्यंत 1-1 सामने खेळले असून त्यात विजय मिळवून 2 गुण मिळवले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यातील रँकिंगमधील फरक त्यांच्या रनरेटबद्दल आहे. पाचव्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स, सहाव्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स, सात्व्या क्रमांकावरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात समान फरक आहे. हे असे संघ आहे ज्यांनी आतापर्यंत 2-2 सामने खेळले आहेत आणि एक जिंकला आहे. एक गमावला देखील आहे. अशा परिस्थितीत त्यांचे गुणही समान आहेत.
इतर बातम्या
Suicide | रानडुक्कर शिकार प्रकरणात रंगेहाथ अटक, आरोपीची शेतात आत्महत्या