MI vs DC IPL 2023 | मुंबई इंडियन्सचा शेवटच्या चेंडूवर विजयी ‘तिलक’, दिल्लीचा सलग चौथा पराभव

IPL 2023 MI vs DC | मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना जबरदस्त रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत आलेल्या सामन्याने क्रीडारसिकांची धाकधूक वाढली होती. अखेर हा सामना मुंबई इंडियन्सने जिंकला.

MI vs DC IPL 2023 | मुंबई इंडियन्सचा शेवटच्या चेंडूवर विजयी 'तिलक',  दिल्लीचा सलग चौथा पराभव
MI vs DC IPL 2023 | मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील पहिला विजय, दिल्लीची पराभवाची मालिका सुरुचImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 11:46 PM

मुंबई – दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबई 4 गडी गमवत शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. अतितटीच्या सामन्यात कोण बाजी मारणार? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता. शेवटच्या चेंडूवर दोन धावा आवश्यक असल्याने काही सांगता येत नव्हतं. पण टीम डेविडने नोर्तजेचा चेंडू फटकावला आणि दोन धावा काढल्या. हा रोमांच इथेच संपला नाही तर रनआउट की नाही असा प्रश्न उद्भवला होता. अखेर तिसऱ्या पंचांनी तपासलं आणि धावचीत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर मुंबईला विजयी घोषित करण्यात आलं.

मुंबईचा डाव

मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि इशान किशन जोडी मैदानात उतरली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली.  रोहित शर्माच्या चुकीच्या कॉलमुळे इशान किशन धावचीत झाला. त्याने 26 चेंडूत 31 धावा केल्या. त्यानंतरही रोहित शर्माने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याला तिलक वर्माची साथ मिळाली. सामना रंगतदार वळणावर आला असताना तिलक वर्माने आक्रमक खेळी केली. त्याने 29 चेंडूत 41 धावा केल्या.

सूर्यकुमार यादव या सामन्यातही काही खास करू शकला नाही. पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यामुळे मुंबईच्या संघावर दबाव वाढला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा  45 चेंडूत 61 धावा करून बाद झाला.  त्यामुळे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून टिम डेविडला संधी दिली.  टीम डेविड आणि कॅमरून ग्रीनने गेलेला सामना पुन्हा आणला असं म्हणायला हरकत नाही.

टिम डेविड आणि कॅमरून ग्रीननं मोक्याची क्षणी षटकार आणि चौकार मारल्याने सामना विजयी करण्यात यश आलं. टिम डेविडने 11 चेंडूत 13 धावा केल्या. तर कॅमरून ग्रीनने 8 चेंडूत 17 धावा केल्या.

दिल्लीचा डाव

दिल्लीकडून डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ही जोडी मैदानात आली. दोन्ही खेळाडूंनी सावध खेळीने सुरुवात केली. ही जोडी फोडण्यात ऋतिक शोकीनला यश आलं. पृथ्वी शॉ त्याच्या गोलंदाजीवर 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर डेविड वॉर्नर आणि मनिष पांडे जोडी मैदानात चांगली जमली. ऋतिकने आठव्या षटकातील एक चेंडू नो टाकला त्यावर फ्री हीट मिळाला. त्यावर स्ट्राईकला डावखुरा डेविड वॉर्नर होता. मात्र त्याने डावखुरा पद्धतीने फलंदाजी करण्याऐवजी उजव्या हाताने गोलंदाजीला सामोरा गेला. यामुळे मैदानात उपस्थित खेळाडूंसह समालोचकांना सुद्धा प्रश्न पडला नेमकं डेविड वॉर्नरला झालं तरी काय? पण फ्री हीट असलेला चेंडू वाया गेला. म्हणजेच त्या चेंडूवर षटकार किंवा चौकाराऐवजी एक धावेवर समाधान मानावं लागलं.

पियुष चावला याच्या गोलंदाजीवर मनिष पांडे बाद झाला. त्याने 18 चेंडूत 26 धावा केल्या. त्यानंतर यश धुल आला आणि हजेरी लावून गेला. रिले मेरेडिथच्या गोलंदाचीवर नेहन वधेराने त्याचा झेल घेतला. रोवमॅन पॉवेल काही खास करू शकला नाही. 4 धावांवर पियुष चावलानं त्याला पायचीत केलं. त्यानंतर आलेला ललित यादवही काही खास करू शकला नाही. 2 या धावसंख्येवर त्रिफळाचीत झाला.

डेविड वॉर्नर आणि अक्षर पटेल जोडीने चांगली फटकेबाजी केली. एका बाजूला 43 चेंडूत डेविड वॉर्नरने आपलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर अक्षर पटेलनं जलद अर्धशतक झळकावलं. त्याने 25 चेंडूत 54 धावा केल्या. अक्षर बाद झाल्यानंतर डेविड वॉर्नर 47 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवला यादवला भोपळाही फोडता आला नाही. धावचीत होत तंबूत परतला.

त्यानंतर अभिषेक पेरोल 1 धाव करून झेल बाद झाला. एनरिच नॉर्तजे 5 धावांवर त्रिफळाचीत झाला. एकाच षटकात 4 गडी बाद झाले. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारत्या आल्या नाहीत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.