AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावाला, चढलीये का? मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा ‘तो’ Video Viral

Arjun Tendulkar Video Viral : IPL 2025 च्या दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या आयपीएल हंगामात अर्जुन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश आहे.

भावाला, चढलीये का? मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा 'तो' Video Viral
अर्जुनचा तेंडुलकरचा तो व्हिडिओ व्हायरलImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 18, 2025 | 3:40 PM
Share

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने दमदार पुनरागमन केले आहे. या संघाने मागील दोन्ही सामने खिशात घातले आहे. आयपीएलमधील यशस्वी संघात हा संघ पण एक आहे. या संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 5 वेळा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. हा संघ दरवर्षी स्टार खेळाडूसह तरुण खेळाडूंना पण संधी देण्यात येते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा पण या संघात आहे. तो गेल्या काही हंगामापासून या संघाशी जोडल्या गेला आहे. पण या हंगामात त्याला मैदानावर उतरवण्यात आलेले नाही. याच दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. काय आहे तो व्हिडिओ आणि त्यावर अशा कमेंट्स का देतायेत लोक?

अर्जुन तेंडुलकरचा हा Video व्हायरल

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओत तो एका कॅफेतून बाहेर पडताना आणि कारमध्ये बसताना दिसत आहे. कॅफेतून बाहेर पडल्यानंतर तो गडबडीत दिसत आहे. तो कारचा दरवाजा झटपट उघडण्याची घाई करताना दिसून येतो. या अवघ्या काही सेंकदाच्या व्हिडिओवर युझर्सने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

एका युझर्सने तो नशेत तर नाही ना? अशी कमेंट केली आहे. तर दुसर्‍याने भाई, पिला तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला आहे. तर याला अजून मैदानात उतरवले नाही, म्हणून तो चिडलाय, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओतून काही स्पष्ट होत नसले तरी युझर्सच्या तिखट कमेंटमुळे ते अर्जुन तेंडुलकर याला ट्रोल करत असल्याचे दिसून येत आहे.

वर्ष 2021 पासून मुंबई संघाचा भाग

अर्जुन तेंडुलकर हा वर्ष 2021 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला होता. पण त्या हंगामात जखमी झाल्याने त्याला खेळता आले नाही. त्यानंतर वर्ष 2022 च्या हंगामात त्याला मैदानात उतरवण्यात आले नाही. तर 2023 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सविरोधात त्याने आयपीएलमध्ये सामना खेळला. त्या हंगामात त्याने चार सामन्यात तीन जणांना तंबूत पाठवले होते. तर या आयपीएल हंगामात, 2024 मध्ये त्याला केवळ एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. पण यामध्ये त्याला कमाल दाखवता आली नाही. यंदा त्याला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. आतापर्यंत त्याला 11 खेळाडूच्या यादीत स्थान मिळाले नाही.

मुंबई इंडियन्सकडे या हंगामात अनेक दिग्गज गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर या सारखे दिग्गज खेळाडू हे गेल्या काही हंगामापासून मुख्य 11 मध्ये सहभागी आहेत. याशिवाय हार्दिक पंड्या आणि मिचेल सेंटनर यांनी पण विरोधी संघाला पाणी पाजले आहे. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर 11 जणांच्या यादीत येण्यासाठी सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.