IPL 2021 Auction | लिलावाच्या आधी धोनीच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का, चेन्नईची 12 वर्षांपासूनची पंरपरा खंडीत

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीची बोली प्रक्रियेचा (ipl auction 2021) कार्यक्रम 18 फेब्रुवारीला चेन्नईत पार पडणार आहे.

IPL 2021 Auction | लिलावाच्या आधी धोनीच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का, चेन्नईची 12 वर्षांपासूनची पंरपरा खंडीत
चेन्नईचा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 8:58 PM

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया (IPL 2021 Auction) 18 फेब्रुवारीला पार पडणार आहे. हा बोली प्रक्रियेचा कार्यक्रम चेन्नईत आयोजित करण्यात आला आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी 292 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यापैकी 62 खेळाडूंचीच निवड करण्यात आली आहे. दरम्यान या आधी चेन्नईचा कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) चाहत्यांसाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. धोनी या वर्षातील लिलाव प्रक्रियेतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीये. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. यामुळे चेन्नई फ्रँचायजीच्या 12 वर्षांपासूनच्या परंपरेला ब्रेक लागला आहे. (ipl auction 2021 chennai super kings captain ms dhoni and stephen fleming not present to ipl auction)

कोरोनामुळे यंदा मेगा ऑक्शनऐवजी छोटेखानी मिनी ऑक्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी संबंधित सर्व संघांचे महत्वाचे व्यक्ती चेन्नईत दाखल झाले आहेत. पण धोनी या लिलाव प्रक्रियेत उपस्थित राहणार नाही.

तसेच चेन्नईचा मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग देखील उपस्थित नसणार असल्याची माहिती चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी दिली. बोली प्रक्रियेचा कार्यक्रम चेन्नईत पार पडणार आहे. सीएसकेचं हे होम ग्राऊंड आहे. यामुळे धोनी आपल्या होम ग्राऊंडवर होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल, अशी आशा सर्व धोनी चाहत्यांना होती. पण अखेर धोनी उपस्थित राहणार नसल्याची माहिती माध्यमांमध्ये आली. त्यानंतर धोनी चाहत्यांचा हिरमोड झाला.

फ्लेमिंग 2009 पासून लिलावाच्या कार्यक्रमाला उपस्थित असायचा. पण आता कोरोनामुळे नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. लिलावाच्या एक दिवसासाठी फ्लेमिंगला काही दिवस क्वारंटाईन राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो उपस्थित राहणार नाही. दरम्यान फ्लेमिंग टीम मॅनेजमेंटच्या संपर्कात असणार आहे, याबाबतचे वृत्त इनसाईड स्पोर्ट्सने दिलं आहे.

पॉन्टिंग आणि श्रेय्यस अय्यर अनुपस्थित

दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पॉन्टिंग आणि कॅप्टन श्रेयस अय्यर हेदेखील या लिलावात सहभागी होणार नाहीत. या दोघांच्या अनुपस्थितीत मोहम्मद कैफ आणि प्रवीण आमरे हे लिलाव टेबलवर उपस्थित राहतील.

चेन्नई सुपरकिंग्जसने कायम ठेवलेले खेळाडू

फॅफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, एन. जगदीसन, रवींद्र जाडेजा, सॅम कुरन, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, लुंगी एनगीदी, इमरान ताहीर, जोश हेजलवुड, मोनू कुमार, रविश्रीनिवासन साई किशोर, के.एम. आसिफ, शेन वॉटसन, करन शर्मा आणि मिचेल सॅटनर.

चेन्नई सुपरकिंग्जने करारमुक्त केलेले खेळाडू

हरभजन सिंग, मुरली विजय, पियुष चावला आणि केदार जाधव.

संबंधित बातम्या :

IPL 2021 Auction | अझरुद्दीन ते देवधर, झंझावाती फलंदाजी करणाऱ्यांवर फ्रँचायजींचा डोळा

IPL Auction 2021: हे सहा खेळाडू ठरू शकतात कोट्याधीश, आयपीएल लिलावात कोण होणार मालामाल?

IPL Auction 2021 Live Streaming | लिलाव कधी, कुठे, किती संघ सहभागी, कोणाकडे किती रक्कम?

(ipl auction 2021 chennai super kings captain ms dhoni and stephen fleming not present to ipl auction)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.