IPL Auction 2022 : रग्गड कमाई करणाऱ्या आयपीएल खेळाडूंना इनहॅन्ड किती मिळतात? टॅक्स किती बसतो?
खेळाडूंवर बोलीवेळी कोट्यावधी रुपयांचा वर्षाव होत असला तरी प्रत्यक्षात खेळाडूंच्या हातात तेवढीच रक्कम मिळत नाही. खेळाडूंना अन्य नागरिकांप्रमाणेच टॅक्स द्यावा लागतो.
नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीगच्या (INDIAN PREMIER LEAGUE) आगामी सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. संघ मालकांकडून खेळाडूंवर बोलीसाठी कोट्यावधींची उड्डाणे सुरू आहेत. चेन्नईत जगभरातील 298 खेळाडूंच्या निवडीसाठी 8 संघ मालक ठाण मांडून बसले आहेत. आतापर्यंत अनेक खेळाडूंवर 5 कोटी रुपयांहून अधिक बोली लावण्यात आली आहे. तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ ठरले आहेत. इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला (MOIN ALI) चेन्नई सुपरकिंग्सने तब्बल 7 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. चेन्नईन पंजाब किंग्सला जोरदार टक्कर देत बोलीचं पारड आपल्या बाजून पालटवलं. पंजाबने झिया रिचर्डसनला 14 कोटी,राजस्थान रॉयल्सनं (RAJASTHAN ROYALS) क्रिस मॉरिसला 16.25 कोटीत खरेदी केलं. खेळाडूंवर लावण्यात येणारी कोट्यावधी रुपयांची बोली सर्वसामान्यांना अचंबित करणारी ठरत आहे.
भारतीय खेळाडूंना टॅक्स-
खेळाडूंवर बोलीवेळी कोट्यावधी रुपयांचा वर्षाव होत असला तरी प्रत्यक्षात खेळाडूंच्या हातात तेवढीच रक्कम मिळत नाही. खेळाडूंना अन्य नागरिकांप्रमाणेच टॅक्स द्यावा लागतो. बोलीवेळी मिळणाऱ्या रक्कमेतून टीडीएसची कपात केली जाते. भारतीय खेळाडूंना लिलावातून मिळणाऱ्या रकमेतून टीडीएसची कपात केली जाते. एकूण रकमेच्या दहा टक्के टीडीएसच्या नावे वजा केले जातात. यानंतर खेळाडूंना आयटीआर दाखल करावा लागतो. यामध्ये खेळाडूंचे इतर उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब असतो. त्यामुळे खेळाडूंना निव्वळ उत्पन्नाच्या आधारावर कर द्यावा लागतो. टीडीएसची गणना केवळ बोली रकमेच्या आधारावरच केली जाते.
विदेशी खेळाडूंच्या टॅक्सचं गणित?
भारताबाहेरील खेळाडूंना भारतात मिळणाऱ्या उत्पन्नावर 20 टक्के टीडीएस द्यावा लागतो. मात्र, विदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूप्रमाणे टीडीएस व्यतिरिक्त अन्य कोणताही कर अदा करावा लागत नाही. विदेशी खेळाडूंना केवळ भारतातील उत्पन्नावरच कर द्यावा लागतो. त्यांना आयटीआर दाखल करण्याची आवश्यकता नसते.
काँट्रॅक्ट कशाचा?
सनदी लेखापाल सौरभ शर्मा यांच्या मते, कर कपातीनंतर नेमका किती पैसा मिळतो याचा प्रत्यक्ष अंदाज लावणे कठीण आहे. बोली रक्कम बेस प्राईस स्वरुपात असते. खेळाडूंचे कंपनीसोबत विविध प्रकारचे करार असतात. खेळाडूंसोबत केलेल्या करारानुसार त्यांना पैसे मिळतात. कोणत्याही खेळाडूचा प्लेईंग- 11 मध्ये सहभाग न झाल्यास त्याला वेगळे पैसे दिले जाते. खेळाडूंच्या करारावरच त्यांना मिळणाऱ्या रकमेचे स्वरुप ठरतं.