IPL 2022: ‘एलआयसी’चं आयपीएल कनेक्शन: कोणत्या संघात कुणाचा किती वाटा?

खेळाडूंच्या खरेदीसाठी संघ मालक कोट्यावधी रुपये आणतात तरी कुठून असा प्रश्न नेहमीच चर्चिला जातो. देशातील बडे प्रस्थ, उद्योजक, अभिनेते कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक संघामध्ये करतात.

IPL 2022:  ‘एलआयसी’चं आयपीएल कनेक्शन: कोणत्या संघात कुणाचा किती वाटा?
IPL Auction
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 6:39 PM

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (INDIAN PREMIER LEAGUE) यंदाच्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पूर्ण झाला आहे. जगभरातील खेळाडूंच्या लिलावाकडं (PLAYER AUCTION) क्रीडावर्तृळाचं लक्ष वेधलं गेलं होतं. चेन्नईत पार पडलेल्या खेळाडू निवडीच्या प्रक्रियेत संघ मालक बाह्या सरसावून लिलावाच्या मैदानात उतरले होते. पसंतीच्या खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची उड्डाणे करण्यात आली. मात्र, खेळाडूंच्या खरेदीसाठी संघ मालक कोट्यावधी रुपये आणतात तरी कुठून असा प्रश्न नेहमीच चर्चिला जातो. देशातील बडे प्रस्थ, उद्योजक, अभिनेते कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक संघामध्ये करतात. यंदाच्या हंगामात एलआयसी (LIFE INSURANCE CORPORATION) आणि आयपीएल कनेक्शनची जोरदार चर्चा आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) आयपीएलमध्ये विजयाचा चौकार लगाविणारी चेन्नई सुपर किंग्‍समध्ये पैसा लावला आहे. चेन्नई सुपर किंग्समध्ये एलआयसीची 7 टक्के भागीदारी आहे.

आयपीएल संघात शाहरुख खान पासून डी-मार्टचे दमानी यांची गुंतवणूक

>> नेमकी कोणत्या संघात कुणाची किती भागीदारी जाणून घेऊया

• मुंबई इंडियन्सची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीजकडं आहे. मुंबई संघासाठी सबकुछ रिलायन्स अशी स्थिती आहे. संघात सह-भागीदारांची संख्या शून्य आहे. संघात शंभर टक्के भागीदारी रिलायन्सची आहे. • सनराईज हैदराबाद- मुंबई इंडियन्स प्रमाणं हैदराबाद संघात एकमेव भागीदार आहे. सन टीवी नेटवर्ककडं सनराईज हैदराबादची संपूर्ण मालकी हक्क आहे. • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे संपूर्ण हक्क यूनाइटेड स्प्रिट्सकडं आहेत. • चेन्नई संघात भागीदारांची संख्या एकाहून अधिक आहे. इंडिया सीमेंट्स 30.1% ,शारदा लॉजिस्टिक्‍स 6.9%, LIC 6.0% , राधाकृष्‍ण दमानी 2.4% आणि नॉन-प्रमोटर ग्रुप 54.6% • पंजाब किंग्स संघाचे चार मालक आहेत. यामध्ये सर्वाधिक पैशांची गुंतवणूक डाबर ग्रुपने केली आहे. वाडिया ग्रुप आणि एपीजे ग्रुपने संघात सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. पंजाब संघात गुंतवणूक पुढीलप्रमाणं- डाबर 46%, वाडिया ग्रुप 23%, प्रीटी झिंटा 23% , एपीजे ग्रुप 8% • दिल्ली कॅपिटल्‍स संघाचे दोन मालक आहेत. GMR ग्रुप आणि JSW ग्रुप. दोन्ही संघ मालकांची भागीदाराची टक्केवारी 50%-50% आहे. • कोलकाता नाइट राइडर्सची सूत्रं बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानकडं आहेत. शाहरुखची रेड चिली एंटरटेनमेंट 55% आणि मेहता ग्रुप 45% यांची संयुक्त भागीदारी कोलकाता संघात आहे.

कमाईचं गणित?

आयपीएल संघ मालकांना उत्पन्नाचे विविध मार्ग आहेत. प्रसारण विक्रीचा मार्ग सर्वाधिक कमाईचा मानला जातो. आयपीएल संघ मालकांना उत्पन्नाच्या विविध मार्गात टॉप ठरणारा मार्ग म्हणजे मीडिया प्रसारण हक्क. आयपीएलच्या सर्वोच्च टीआरपीमुळे जगभरातील प्रसारण कंपन्या बीसीआयकडे प्रसारण हक्कासाठी बोली लावतात. आतापर्यंत सोनी एंटरटेन्मेंटने 8200 कोटी, स्टार इंडिया 16,347 कोटी रुपयांत प्रसारण हक्क खरेदी केले होते. बीसीसीआयला प्रसारण हक्कांच्या विक्रीतून कोट्यावधी रुपये मिळतात. बीसीसीआय-संघ मालक प्रसारण विक्री रक्कम वाटून घेते.

इतर बातम्या :

Glenn Maxwell: भारताचा जावई बनणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची लग्नपत्रिका तुम्ही बघितली?

IPL Mega Auction 2022: ऑक्शन संपलं, आता कॅप्टन निवडण्याची वेळ, जाणून घ्या कोठ कुठल्या संघाचं बनणार कर्णधार

ऑस्ट्रेलियाच्या ‘विराट कोहली’वर संक्रांत, IPL कारकिर्दीला ग्रहण? कोट्यवधीच्या बाजारात एक पैसा इज्जतीसाठी का तरसला?

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.