Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 | “त्याने चेन्नईसाठी सर्व काही दिलं”, गौतम गंभीरकडून धोनीचं कौतुक

चेन्नईचा यंदाच्या मोसमात 12 सामन्यांपैकी 8 सामन्यात पराभव झाला आहे.

IPL 2020 | त्याने चेन्नईसाठी सर्व काही दिलं, गौतम गंभीरकडून धोनीचं कौतुक
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 7:40 PM

मुंबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. आयपीएलच्या इतिहासात हे असं पहिल्यांदाच घडलं. चेन्नईची निराशाजनक कामगिरी आणि धोनीच्या निर्णयांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. “त्याने चेन्नईसाठी आपलं सर्व काही दिलं आहे, अशा शब्दात टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) धोनीचं कौतुक केलं आहे.” चेन्नईचा यंदाच्या मोसमात 12 सामन्यांपैकी 8 सामन्यात पराभव झाला आहे. तर 4 सामन्यात विजय झाला आहे. IPL Mahendra Singh Dhoni has sacrificed everything for Chennai Super Kings says Gautam Gambhir

“धोनीने चेन्नईसाठी सर्व काही दिलं”

“धोनीने संघासाठी खूप काही केलं आहे. तसेच धोनीला संघ मालकांनीही चांगली वागणूक दिली आहे. अशीच वागणूक प्रत्येक संघाने आपल्या कर्णधाराला द्यायला हवी. धोनीने त्याच्या नेतृत्वात चेन्नईला 3 वेळा आयपीएलंच जेतेपद मिळवून दिलं आहे. तसेच 2 वेळा चॅम्पियन्स लीगमध्येही विजय मिळवून दिला आहे. धोनी संघाशी निष्ठावान राहिला. धोनीने चेन्नईसाठी सर्वस्व अर्पण केलं आहे”, असं गंभीर इएसपीएन क्रिकइन्फो सोबत बोलत होता.

गंभीर काय म्हणाला?

“धोनी आणि चेन्नईचं घट्ट नातं आहे. टीम मॅनेजमेंट आणि धोनी यांचा एकमेकांवर विश्वास आहे”, असं गंभीर म्हणाला. “चेन्नई आयपीएलमधील यशस्वी टीमपैकी एक आहे. कर्णधार आणि मालकांमध्ये असलेल्या चांगल्या संबंधांमुळे चेन्नई यशस्वी टीमपैकी एक आहे. टीम मॅनेजमेंटने धोनीला पूर्ण स्वतंत्र दिलं आहे. तसेच धोनीला टीमच्या मालकांनी योग्य तो सम्मान दिला आहे. धोनीला पुढील मोसमातही टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली, तर मला आश्चर्य वाटणार नाही”, असं गंभीर म्हणाला. “धोनी जेव्हा पर्यंत वाटेल, तेव्हा पर्यंत खेळू शकतो. कदाचित पुढील हंगामात चेन्नईमध्ये नवे चेहेरे पाहायला मिळतील”, असंही गंभीरने नमूद केलं.

गौतम गंभीरने आपल्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला 2 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. गंभीरने 2012 आणि 2014 मध्ये कोलकातावा विजेतपद मिळवून दिलं. आयपीएलमधील मुंबई, चेन्नईनंतर कोलकाता ही सर्वात यशस्वी टीम आहे. गंभीरने आयपीएलमध्ये एकूण 154 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 123.88 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 217 धावा केल्या. यामध्ये 36 अर्धशतकांचा समावेश आहे. 93 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. दरम्यान गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो राजकारणात सक्रीय झाला आहे.

संबंधित बातम्या :

MS Dhoni | यंदा साखळी फेरीतच गारद, पुढील IPL मध्ये धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार? CEO म्हणाले…

IPL 2020 | पाचव्या क्रमांकाआधी बॅटिंगसाठी ये, टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूचा धोनीला सल्ला

संजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर भडकला

IPL Mahendra Singh Dhoni has sacrificed everything for Chennai Super Kings says Gautam Gambhir

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.