CSK Released Players IPL 2021 : चेन्नईकडून केदार जाधवला नारळ, आता बोली कोण लावणार?

IPL Chennai Super Kings Released Players 2021 : आयपीएल 2020 मध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्स संघाने करारमुक्त केलं आहे.

CSK Released Players IPL 2021 : चेन्नईकडून केदार जाधवला नारळ, आता बोली कोण लावणार?
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 7:56 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील आठ संघांकडून त्यांच्या संघाकडील खेळाडू आणि संघातून मुक्त करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलमधील आठ संघ चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजस्र बंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स या संघांनी अनेक खेळाडूंना मुक्त केलं आहे, तर काही खेळाडूंना त्यांनी संघात कायम ठेवलं आहे. (IPL Retained and Released Players 2021, Chennai Super Kings releases Kedar Jadhav)

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील भारतीय क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे वेध लागले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयपीएलसाठी लिलावाची प्रक्रिया पार पडते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे लिलावाची प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत लांबली आहे. दरम्यान, इंडियन प्रिमियर लीगच्या 14 व्या मोसमासाठी पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये (प्राथमिक लिलाव) चेन्नई सुपरकिंग्सने अनेक खेळाडूंना संघमुक्त करण्याचा (रिलीज करण्याचा) निर्णय घेतला आहे.

‘या’ खेळाडूंना चेन्नईने संघात कायम ठेवलं

आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावापूर्वी सर्व फ्रेंचायझींना ते कोणत्या खेळाडूंना त्यांच्या संघात कायम ठेवणार आणि कोणत्या खेळाडूंना करारमुक्त करणार, याबाबतची यादी बीसीसीआयला पाठवावी लागते. चेन्नई सुपरकिंग्सने ही यादी बीसीसीआयला पाठवली आहे. त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, फॅफ ड्यू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, इम्रान ताहीर, अंबाती रायुडू, एन जगदीसन, ऋतुराज गायकवाड, के आसीफ, रवींद्र जाडेजा, जोश हेझलवूड, कर्ण शर्मा, दीपक चाहर, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एनगिडी, सॅम कुरन या खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तर केदार जाधव, पियूष चावला, मुरली विजय, हरभजन सिंह, शेन वॉटसन, मोनू सिंग या खेळाडूंना संघमुक्त केलं आहे.

केदारची सुमार कामगिरी

शेन वॉट्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याला सीएसकेने संघमुक्त केलं आहे. तर हरभजन सिंहने स्वतःच संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही. उर्वरित खेळाडूंना त्यांच्या सुमार कामगिरीमुळे संघाने करारमुक्त केलं आहे. त्यातही प्रामुख्याने केदार जाधव याने त्याच्या नावाला साजेशी कामगिरी केली नव्हती. त्यामुळे त्याला काही सामन्यांमधून वगळण्यात आलं होतं. केदारला पुढील वर्षी संघात घेऊ नका अशी मागणी सीएसकेच्या चाहत्यांकडून होत होती. आयपीएल 2020 दरम्यान सुमार कामगिरीमुळे केदारला ट्विटरवर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. तसेचआता केदार सध्या सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचं प्रतिनिधीत्व करत आहे. या स्पर्धेतही त्याने निराशाजनक कामगिरी कायम ठेवली आहे. त्यामुळे त्याला संघाने करारमुक्त केलं आहे.

हेही वाचा

RR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड

IPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले?

Kedar Jadhav | आधी सोशल मीडियावर ट्रोल, आता केदार जाधवच्या नावे नकोसा विक्रम

(IPL Retained and Released Players 2021, Chennai Super Kings releases Kedar Jadhav)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.