Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPL 2020 : इरफान पठाणची शानदार कामगिरी, टी 20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय

इरफान पठाण लंका प्रीमियर लीग कँडी टस्कर्स संघाकडून खेळतोय.

LPL 2020 : इरफान पठाणची शानदार कामगिरी, टी 20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 5:10 PM

कोलंबो : टीम इंडियाचा माजी  गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) सध्या लंका प्रीमियर लीग (Lanka Premier League)मध्ये खेळतोय. इरफान या स्पर्धेत कॅंडी टस्कर्स (Kandy Tuskers) संघाचे प्रतिनिधित्व करतोय. इरफानने जाफना स्टालियंसविरोधात खेळताना अष्टपैलू कामगिरी केली. इरफानने जाफना स्टालियंस संघाविरोधात 19 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. या कामगिरीसह त्याने विक्रमी कामगिरी केली आहे. इरफान टी 20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रवींद्र जडेजानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. Irfan Pathan became the second Indian player after Ravindra Jadeja to score 2,000 runs and score 150 in T20 cricket.

इरफानने जाफनाविरोधात 25 धावा केल्या. यासह त्याने टी 20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. यासह इरफान टी 20 मध्ये 2 हजार धावा आणि 150 विकेट्स घेणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. इरफानच्या आधी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने अशी कामगिरी केली होती. रवींद्रने 227 टी 20 सामन्यात ही कामगिरी केली. तर इरफानने रवींद्रच्या तुलनेत फार आधी हा बहुमान मिळवला. इरफानने ही कामगिरी केवळ 180 टी 20 सामन्यांमध्ये करुन दाखवली. यासह इरफान टीम इंडियाकडून टी 20 मध्ये सर्वात वेगवान 2 हजार धावा आणि 150 विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे.

जाडेजाने एकूण मिळून आतापर्यंत टी 20 मध्ये 252 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2 हजार 568 धावा केल्या आहेत. तर 164 विकेट्स घेतल्या आहेत. तर इरफान आपल्या टी 20 कारकिर्दीत 180 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 2 हजार 9 धावा केल्या आहेत. तसेच 173 विकेट्स मिळवल्या आहेत. इरफानने जानेवारी 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र टी 20 क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचं इरफानने म्हटलं होतं.

इरफान पठाणची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द

इरफान पठाणने टीम इंडियाकडून 120 एकदिवसीय, 29 कसोटी आणि 24 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. इरफानने 120 एकदिवसीय सामन्यात 1 हजार 544 धावा केल्या आहेत. तसेच 173 विकेट्स घेतल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये 24 सामन्यात 172 धावांसह 28 विकेट्स मिळवल्या आहेत. तर कसोटीतील एकूण 29 मॅचेसमध्ये 1 हजार 105 धावांसह 100 बळी घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या :

टीम इंडियाचा ‘हा’ माजी अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरण्यास सज्ज, ‘या’ टी 20 लीगमध्ये खेळणार

Irfan Pathan became the second Indian player after Ravindra Jadeja to score 2,000 runs and score 150 in T20 cricket.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.