INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाचा दुखापतग्रस्त शिलेदार ऑस्ट्रेलिया कसोटीपूर्वी सावरेल : राहुल द्रविड

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाचा दुखापतग्रस्त शिलेदार ऑस्ट्रेलिया कसोटीपूर्वी सावरेल : राहुल द्रविड
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 5:57 PM

सिडनी : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (INDIA TOUR AUSTRALIA)सिडनीत पोहचली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात हमरीतुमरी पाहयला मिळते. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच लक्ष एकदिवसीय आणि टी 20 मालिकेऐवजी कसोटी मालिकेकडे लागून राहिलं आहे. या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ishant sharma will recover from injury before the test series against australia said nca rahul dravid

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) दुखापतीतून सावरतोय, अशी माहिती राष्ट्रीय क्रिकेट ऍकेडमीचा अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडने (Rahul Dravid) दिली आहे. आयपीएलच्या 13 व्या मोसमादरम्यान इशांतला दुखापतीचा त्रास जाणवला. त्यानंतर इशांतला आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. दुखापतीमुळे इशांत शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी देण्यात आली नव्हती.

“राहुल द्रविड स्वतः इशांत दुखापत प्रकरणात प्रकरणात पुढाकार घेतला आहे. पारस महाब्रे यांच्याकडून द्रविड इशांतच्या दुखापतीबाबत प्रत्येक माहिती जाणून घेत आहेत. तसेच इशांत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी दुखापतीतून सावरेल. याबाबत द्रविडने बीसीसीआयला कल्पना दिली आहे”, अशी माहिती एएनआयशी झालेल्या विशेष संभाषणात एनसीएशी संबंधित सूत्रांनी दिली.

पायाच्या घोट्याला दुखापत

या वर्षी जानेवारीत इशांतला वडोदराविरुद्धच्या रणजी सामन्यात पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीचा त्रास इशांतला अजूनही होतोय. तसेच इशातंला आयीपीएलदरम्यान डाव्या बाजूच्या बरगडीला दुखापत झाली होती. त्यामुळे इंशातला पुढील सामन्यात मुकावे लागले होते. इशांतला 7 ऑक्टोबरला नेट्समध्ये सरावादरम्यान ही दुखापत झाली होती. इशांतच्या दुखापतीची माहिती दिल्ली कॅपिटल्सच्या ट्विटर हॅंडलवरुन देण्यात आली होती.

कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून

टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या टीम इंडियाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकते ऑस्ट्रेलियावर 2-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. दरम्यान यावेळेस विराट पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. बाबा होणार असल्या कारणाने बीसीसीआयने विराटला पालकत्वाची रजा मंजूर केली आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

आस्ट्रेलिया टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर .

भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

संबंधित बातम्या :

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

India Tour Australia | भारताकडे धुवाँधार बोलर्स, विराट सेनाच विजयी होणार, ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रशिक्षकाचा दावा

ishant sharma will recover from injury before the test series against australia said nca rahul dravid

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.