AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहितनंतर रिषभ पंतकडून डच्चू, ‘या’ खेळाडूची धोनीसमोर अग्निपरीक्षा

आयपीएलच्या 14 व्या मोसमात(IPL 2021) आज चेन्नई (chennai super kings) विरुद्ध हैदराबाद (sunrisers hyderabad) अशी लढत रंगणार आहे.

रोहितनंतर रिषभ पंतकडून डच्चू, 'या' खेळाडूची धोनीसमोर अग्निपरीक्षा
एम एस धोनी
| Updated on: Apr 28, 2021 | 7:33 PM
Share

दिल्ली : सध्या देशात आयपीएलचा (IPL 2021) फीवर पाहायला मिळतोय. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू ही स्पर्धा गाजवतायत. तसेच बरेचसे अनकॅप्ड खेळाडूदेखील लक्षवेधी कामगिरी करुन प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. तर काही खेळाडू कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच आज दिल्लीतल्या फिरोज शाह कोटला मैदानावर या स्पर्धेतील 23 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Superkings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या दोन संघांमध्ये खेळवला जात आहे. आजच्या या सामन्यात हैदराबादकडून खेळणारा फलंदाज जगदीश सूचित (Jagadeesha Suchith) याची परीक्षा आहे. (Jagadeesha Suchith test Against MS Dhoni Chennai Superkings VS Sunrisers Hyderabad in IPL 2021)

या खेळाडूला सर्वात आधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्या टीममधून वगळं होतं. यानंतर, ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्सने त्याला डच्चू दिला. त्यानंतर तो डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) सनरायझर्स हैदराबाद संघात दाखल झाला. त्यानंतर आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या चेन्नई विरुद्ध हैदराबाद या सामन्यात महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि त्याची टीम सूचितची परीक्षा घेणार आहे. जगदीश सूचित या 27 वर्षीय फिरकी गोलंदाजाने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात किफायतशीर गोलंदाजी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आयपीएलच्या लिलावात हैदराबादने त्याला आपल्या संघात सामील करुन घेतलं होतं.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात जगदीश सुचित केवळ एक सामना खेळला आहे, परंतु या सामन्यात त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात छाप पाडली आहे. सुचितने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात केवळ 6 चेंडूत नाबाद 14 धावा फटकावल्या होत्या. तर 4 षटकं गोलंदाजी करत त्यामध्ये त्याने केवळ 21 धावा दिल्या होत्या. परंतु त्याला एकही बळी मिळवण्यात यश आलं नाही. परंतु सुचितच्या गोलंदाजीमुळे निर्माण झालेला दबाव दिल्ली कॅपिटलच्या फलंदाजांवर स्पष्ट दिसत होता. त्यामुळे जगदीशची गोलंदाजी सुरु असताना दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना विकेट्स मिळत होत्या.

सूचितची आयपीएल कारकीर्द

जगदीशा सुचित सर्वात आधी मुंबई इंडियन्स संघात होता. सुरुवातीची दोन वर्ष तो मुंबई इंडियन्स संघात होता. त्यानंतर 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने सूचितला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. परंतु त्यानंतर दिल्लीने सूचितला रामराम केला. 2021 च्या लिलावात हैदराबादने सूचितला आपल्या संघात सामावून घेतलं. सूचितला आयपीएलमध्ये आतापर्यंत 16 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यात त्याने 12 विकेट्स मिळवल्या आहेत. 14 धावांत 2 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

इतर बातम्या

IPL 2021 | ‘सर’ रवींद्र जाडेजाला मोठ्या विक्रमाची संधी, मनिष पांडेही किर्तीमान रचणार

IPL 2021, CSK vs SRH Head to Head Records | डेव्हिड वॉर्नर विरुद्ध महेंद्रसिंह धोनी आमनेसामने, हैदराबाद मात करणार की चेन्नई विजयी ‘पंच’ लगावणार?

IPL 2021 : ‘असं वाटतंच नाही की तो निवृत्त झालाय’, डिव्हिलिर्सच्या बहारदार खेळीचं विराटकडून भरभरुन कौतुक!

(Jagadeesha Suchith test Against MS Dhoni Chennai Superkings VS Sunrisers Hyderabad in IPL 2021)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.