Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय क्रिकेट संघाचा पहिला यष्टीरक्षक मराठमोळा; गरिबीमुळे करावी लागली सुरक्षारक्षकाची नोकरी

त्या काळात क्रिकेट जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर यष्टीरक्षक म्हणून जनार्दन नवले यांच्या नावाचा दबदबा होता. | Janardan Navle

भारतीय क्रिकेट संघाचा पहिला यष्टीरक्षक मराठमोळा; गरिबीमुळे करावी लागली सुरक्षारक्षकाची नोकरी
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 9:34 AM

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे पहिले यष्टीरक्षक (Wicket keeper) जनार्दन ज्ञानोबा नवले यांचा आज स्मृतीदिन आहे. काळाच्या ओघात ते क्रीडा रसिकांच्या विस्मरणात गेले असले तरी जनार्दन नवले यांची कहाणी खूपच रंजक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे ते पहिले यष्टीरक्षक होते. एवढेच नव्हे तर कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून पहिला चेंडू खेळण्याचा विक्रमही जनार्दन नवले यांच्या नावावर आहे. 1932 साली लॉर्डसवर झालेल्या कसोटी सामन्यात ते खेळले होते. (Janardan Navle India’s first Test wicketkeeper who also faced the first ball for them)

जनार्दन नवले यांचा जन्म 7 डिसेंबर 1902 रोजी फुलगाव येथे झाला होता. त्यांचे वडील शेतकरी आणि कापडाचे व्यापारी होते. त्या काळात क्रिकेट जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर यष्टीरक्षक म्हणून जनार्दन नवले यांच्या नावाचा दबदबा होता.

65 सामन्यांत 101 झेल आणि 36 स्टम्पिंग

पाच फूट चार इंच उंची असलेले जनार्दन नवले अत्यंत चपळ क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी 65 सामन्यांमध्ये 101 झेल टिपले असून 36 स्टम्पिंग केल्या होत्या. याशिवाय, ते जलदगती गोलंदाजांविरुद्ध समर्थपणे फलंदाजी करत. त्यांनी 19.18 च्या सरासरीने 1917 धावा केल्या होत्या. यामध्ये नऊ अर्धशतकांचा समावेश आहे.

जनार्दन नवले यांनी वयाच्या 15व्या वर्षी चौरंगी स्पर्धेत हिंदूज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघात ते सलामीवीर म्हणून खेळायचे. 17व्या वर्षी जनार्दन नवले यांनी या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात मुस्लिम्स संघाविरुद्ध 74 तर अंतिम सामन्यात पारसी संघाविरुद्ध 96 धावा केल्या होत्या.

पहिल्या कसोटी सामन्यात 25 धावा

जनार्दन नवले यांनी 1932 साली भारतीय संघाच्या पहिल्यावहिल्या कसोटी दौऱ्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात त्यांची निवड झाली. मात्र, इंग्लंड दौऱ्यावर ते फारशी चमक दाखवू शकले नाहीत. या सामन्यात त्यांनी दोन डावांत अनुक्रमे 12 आणि 13 धावा केल्या. या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला होता. तर नंतरच्या कारकीर्दीत 21 कसोटी सामन्यांमध्ये नवले यांनी केवळ एक अर्धशतक केले. मात्र, आपल्या यष्टीरक्षणाने त्यांनी साऱ्यांनाच प्रभावित केले.

उतारवयात जनार्दन नवले यांचे आयुष्य हालाखीत

इंग्लंड दौऱ्यानंतर जनार्दन नवले यांना भारतीय संघात कधीही स्थान मिळाले नाही. त्यामुळे जनार्दन नवले यांनी एका कारखान्यात सुरक्षारक्षकाची नोकरी धरली. मात्र, यामधून फारसे पैसे मिळत नसल्याने जनार्दन नवले यांचे आयुष्य हालाखीत गेले. अनेकांनी त्यांना मुंबई-पुणे महामार्गावर भीक मागतानाही बघितले होते. मात्र, याविषयी अधिकृत माहिती नाही. अखेर 7 सप्टेंबर 1979 रोजी जनार्दन नवले यांचे निधन झाले.

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.