T20 World Cup : भारत पाकिस्तान फायनल मॅचबाबत विचारलेल्या प्रश्नावर जॉस बटलर भन्नाट उत्तर, म्हणाला…
एडलेडच्या मैदानात इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनली दुसरी मॅच होणार आहे.
सिडनी : विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) आज पहिली सेमीफायनलची मॅच न्यूझिलंड (NZ) आणि पाकिस्तान (PAK) यांच्यात होणार आहे. तसेच दुसरी मॅच टीम इंडिया (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल मॅच व्हावी असं अनेकांना वाटतं आहे, तसं अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर देखील केलं आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्या विश्वचषक स्पर्धेतील पहिली मॅच एकदम रोमांचक झाली होती. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल मॅच व्हावी असं वाटतं आहे.
एडलेडच्या मैदानात इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनली दुसरी मॅच होणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंडचे या दोन्ही टीमनी आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज शेन वॉटसन याला सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल मॅच व्हावी असं वाटतंय.
ज्यावेळी इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर याला मीडियाने प्रश्न विचारले, त्यावेळी तो म्हणला की, आम्ही टीम इंडियाला पराभूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच सुरुवातीला आम्ही फलंदाजी केली तर मोठी धावसंख्या उभी करु, दुसऱ्यांदा फलंदाजी केली तर धावसंख्येचा कसल्याही परिस्थितीत पाठलाग करू असं उत्तर दिलं.
भारत पाकिस्तान फायनल मॅचबाबत विचारलेल्या प्रश्नावर जॉस बटलर भन्नाट उत्तर दिले. तो म्हणाला की भारत पाकिस्तान मॅच आम्हाला पाहायची नाही. भारत पाकिस्तानच्या चाहत्यांची पार्टी खराब करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार असल्याचे इंग्लंडच्या कर्णधाराने सांगितले.