Syed Mushtaq Ali T20 Trophy| ज्युनिअर अझरुद्दीनचा झंझावात, 11 सिक्स, 9 फोर, क्रिकेट बोर्डाकडून मोठा सन्मान
मोहम्मद अझरुद्दीनने मुंबईविरोधात 13 जानेवारीला 54 चेंडूत 9 फोर आणि 11 सिक्ससह नाबाद 137 धावांची खेळी केली होती.
मुंबई : सध्या देशांतर्गत सर्वात मोठी टी स्पर्धा अर्थात सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धा (Syed Mushtaq Ali T20 Trophy) खेळण्यात येत आहे. या स्पर्धेत 13 जानेवारीला मुंबई विरुद्ध केरळ यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यात केरळच्या युवा मोहम्मद अझरुद्दीन (Mohammed Azharuddeen)शानदार 137 धावांची नाबाद शतकी खेळी केली. अझरुद्दीनच्या या कामगिरीमुळे केरळाचं नाव देशभरात गाजलं. या खेळीसाठी केरळ क्रिकेट बोर्ड अझरुद्दीनचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती (KCA) केसीएचे सचीव श्रीजीत वी नायर (Sreejith v nair) यांनी दिली आहे. (kerala cricket association will honor young Mohammad Azharuddin who scored a century in syed mushtaq ali t20 trophy 2021)
केरळ क्रिकेटसाठी ही ऐतिहासिक क्षण आहे. या शतकी खेळीसाठी आम्ही अझरुद्दीनचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने 137 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सन्मान राशी म्हणून प्रति धावानुसार हजार रुपये यानुसार एकूण 1 लाख 37 हजार इतकी रक्कम देणार आहोत, अशी माहिती नायर यांनी दिली.
? in 37 balls! ??
Sensational stuff this is from Mohammed Azharuddeen. ??
What a knock this has been from the Kerala opener! ?? #KERvMUM #SyedMushtaqAliT20
Follow the match ? https://t.co/V6H1Yp60Vs pic.twitter.com/Nrh88uOOFU
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 13, 2021
अझरुद्दीनने मुंबईविरोधात 13 जानेवारीला 54 चेंडूत 9 फोर आणि 11 सिक्ससह नाबाद 137 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे त्याने ही शतकी खेळी विजयी आव्हानाचे पाठलाग करताना केली. मुंबईने केरळाला 197 धावांचे आव्हान दिले होते.
अझरुद्दीन आणि रॉबिन उथप्पा या केरळाच्या सलामी जोडीने शानदार सुरुवात केली. या जोडीने 129 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर उथप्पा बाद झाला. यानंतर अझरुद्दीनने वनडाऊन आलेल्या संजू सॅमसनसह दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. अझरुद्दीनने अवघ्या 37 चेंडूमध्ये शानदार शतक झळकावलं. विजयाजवळ असताना संजू सॅमसन बाद झाला. मात्र यानंतर सचिन बेबीसह अझरुद्दीनने केरळला शानदार विजय मिळवून दिला.
Star of the night – Mohammed Azharuddeen – lit up the Wankhede Stadium with a 54-ball 137* that helped Kerala secure a clinical 8-wicket win over Mumbai.??#KERvMUM #SyedMushtaqAliT20
Watch how all the action unfolded ??https://t.co/VWU9MHY0S6 pic.twitter.com/Zr7DgLCYlK
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 13, 2021
अझरुद्दीनच्या या शानदार आणि तडाखेदार खेळीचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आलं. अझरुद्दीनचं टी 20 क्रिकेटमधील हे सर्वात तिसरं वेगवान शतक ठरलंय. याआधी रिषभ पंत आणि रोहित शर्माने अशी कामगिरी केली आहे.
या निर्णयाचं स्वागत
महिला टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच आणि सनरायजर्स हैदराबादचे फिल्डिंग कोच बीजू जॉर्ज यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. “या अशा वेळेस अझरुद्दीनचे प्रशिक्षक बिजूमोन, मजार मोइदू आणि फिलिप यांचही स्मरण करायला हवं”, अशी प्रतिक्रिया बीजू जॉर्ज यांनी दिली.
संबंधित बातम्या :
Mumbai vs Haryana | हरियाणाचा 8 विकेट्सने शानदार विजय, मुंबईचा सलग तिसरा पराभव
syed mushtaq ali trophy | अझरुद्दीन आणि सचिनची मॅचविनिंग पार्टनरशीप; अझरच्या खेळीने सेहवागही भारावला
(kerala cricket association will honor young Mohammad Azharuddin who scored a century in syed mushtaq ali t20 trophy 2021)